Skip to main content

एक प्रश्न : मदत करा

लेखक साहना यांनी बुधवार, 17/01/2018 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
समजा दोन सरकारी स्कीम्स आहेत. ह्यांतील कुठली स्कीम जास्त चांगली आहे असे तुम्हाला वाटते ? १. फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती २. फक्त अल्पसंख्यांक लोंकासाठी पण फक्त मुलींसाठी शिष्यवृत्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे ! सोर्स : https://twitter.com/realitycheckind/status/953285874136969217 आणखीन : https://twitter.com/TormundsMember0/status/953390737281908736

(भिती तुझ्याउरी पण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 17/01/2018 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही. या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा? धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती. या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा? फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला . मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा? सोडून नेक वाट,चळते बुद्धी​ जराशी. मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा? जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे. नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा! आता मौनवदनी, सोडून देतं आहे. विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा! मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे. हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा. थांबवू कसातरी मग मी?

तरही गज़ल : या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/01/2018 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल ! ताईने दिलेली ओळ होती... या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला ********************* नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला बा निसर्गा का असा छळवाद तू रे मांडला? बरसणे त्या पावसाचे फक्त आठवते मला ओळखीचा चोर कोणी मान अलगद कापतो त्याच खांद्य
काव्यरस

प्रश्न साधासाच होता...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 16/01/2018 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न साधासाच होता, त्याने उत्तर टाळले.. आणि अबोलीचे फूल तिच्या केसात माळले. त्याचा रोजचाच खेळ, चार दाणे पक्ष्यांसाठी.. पाखरांच्या नकळत, त्याने हक्काने पाळले. क्षणभर विसावला जीव बकुळीच्या खाली.. सडे अनाम दु:खाचे तिने पायाशी ढाळले. आहे सुखाचा पाऊस, डोळे भरले कशाने? वेडे मन तुझे का ग मृगजळास भाळले?
काव्यरस

लास-वेगस.... माहिती हवी आहे.

लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 15/01/2018 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी ला लास-वेगस ला जायचा प्लॅन आहे. हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग झाले आहे. ग्रँड कॅनियॉन ला भेट द्यायचा विचार आहे. काही टिप्स ?

चलत-चित्र पद्मावतीची (रड)कथा आणि वर"करणी" स्वातंत्र्य...!

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 15/01/2018 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
तसे या विषयावर लिहिणारच नव्हतोत, परंतु मि पा वर चर्चा भीमा कोरेगाव वर लेख वाचले, मांदियाळीत चर्चा बहुत होते जाणवले, ततपश्चात "लिहून पाहू" ने झपाटले, आणि शेवटी टंकले...! तसे ऐतिहासिक संदर्भ पाहता आमच्या भूतकाळात आम्ही सदर ईसमाचे चित्रपट पाहिलेले नाहीत. (किंबहुना थेटरात जाऊन पाहिलेले नाहीत म्हणणे जास्त उचित). बाजीराव मस्तानी वा रामलीला चा एकही प्रसंग आमुच्या डोळ्यांसमोरून गेल्याचे आम्हास स्मरत नाही. हे त्यांचे बहुचर्चित चित्रपट.

अभिजात(चारोळी)

लेखक पराग देशमुख यांनी सोमवार, 15/01/2018 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
छंदात बांधण्याचे, गेले सखे दिवस ते | मज अभिजात जे उमजले, ते मुक्त छंद होते....||

तो,ती आणि अबोल प्रेम

लेखक mr.pandit यांनी सोमवार, 15/01/2018 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने 'तुझ्यावर प्रेम आहे' म्हटल तर ती खळखळुन हसते हो किंवा नाही काहीही सांगत नाही फक्त्त् थोडी अबोल होते ती अबोल झाली की त्याच्याही जीवाची तगमग होते त्याची होणारी तगमग पाहुन ती पुन्हा खळखळुन हसते. त्याच्या या प्रेमापुढे नेहमी अस्वस्थ् उदास होते ती तिचही आहे त्याच्यावर प्रेम् पण सांगत नाही ती तिच्या अशा वागण्याने तो ही हतबल निराश होतो आता थांबायला हव आपण अस वाटुनही पुन्हा अडकतो याचा शेवट कसा होईल हे न त्याला माहीत् न् तिलाही पण खुप प्रेम आहे तुझ्यावर हे सांगायचय् कधीचे तिलाही - निखिल १५-०१-२०१८
काव्यरस

लोकसंस्कृतीचा आदिम नाद (भाग पहिला)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/01/2018 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे लोकपरंपरेतून लोकसंस्कृती उदयास येत असते. लोकश्रध्देच्या सेतूंवरून मार्गक्रमणा करत ग्रामीण लोक आपले आयुष्य व्यतीत करीत असतात. हा समग्र पट म्हणजे लोकधारा. गावांत सर्व जाती-जमातीचे लोक परंपरेने गुण्यागोविंदाने राहत आणि मामधरमच्या (नामधारी) नात्यागोत्याने एकमेकांशी बांधील असत. गावात कोणी आदिवासी असो की परंपरेने चुकीच्या लोकसमजूतीने नाकारलेले लोक. गावाबाहेर वस्ती करणारा कोणीही माणूस आपल्या आईला काकू म्हणत असे व आपण एखाद्या आदिवासी स्त्रीला मावशी म्हणायचो.

वलय (कादंबरी) - प्रकरण ३

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 15/01/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण २ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41793 --- प्रकरण 3 सुप्रिया राजेशला ड्रॉप करून सिद्धिविनायकनगरला “लीएरा विमेन्स हॉस्टेल” वर पोहोचली. ते एक “सेल्फ कुकिंगची” सोय असलेले वर्किंग विमेन्स होस्टेल होते. तिच्या दोन रूममेट्स होत्या. सोनी बनकर आणि रागिणी राठोड. सुप्रियाने चावीने रूम उघडली. कॉमन किचन, हॉल आणि तीन स्वतंत्र बेडरूम, बाथरूम अशी रचना होती त्यांच्या रूमची! तिने आपली पर्स ड्रेसिंग टेबलवर ठेवली आणि आरशात पाहिले. चेहरा बराच काळवंडलेला वाटत होता. सोनी आली असेल असा विचार करून तिने सोनीच्या बेडरूमवर टकटक केले.