Skip to main content

"मोदी" हे फक्त आडनाव आहे

लेखक खिलजि यांनी सोमवार, 19/02/2018 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , मोदी हे फक्त आडनाव आहे खोऱ्याने ओढत जा तुम्ही , जोपर्यंत हातात टिकाव आहे वाव आहे , अजूनही सुधारायला ( स्वतःला ) वाव आहे धंद्याला लावणाऱ्यांचा देशाबाहेर एक गाव आहे पळून जाण्यासाठी पैलतीरी , सरकारी नाव आहे ललित गेला , विजय गेला , निरव शांतता झाली येतील हळूहळू बिळातून बाहेर एकेक साल्यांच्या मनातच काळे डाव आहेत सर्व साले एकजात बरबटलेले म्हणूनच सुधारायला वाव आहे वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , " मोदी " हे फक्त आडनाव आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस

साताऱ्याच्या वेढयात औरंगझेब - अजिंक्यताऱ्याची कहाणी

लेखक मनो यांनी सोमवार, 19/02/2018 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी या शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या संशोधनावर आधारित ही बातमी प्रसिद्ध होत आहे. पॅरिसच्या राष्ट्रीय संग्रहालयात मला मराठयांच्या इतिहासातील एक सुवर्णपान ज्याला म्हणता येईल अश्या साताऱ्याच्या वेढ्याचे चित्र सापडले. त्यावर पुढील संशोधन करताना आणि चित्राची सत्यता तपासताना यासंबंधीत जुनी माहिती सापडली. ही माहिती आणि ते चित्र एकत्रित स्वरूपात इथे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आणि इतिहासप्रेमी वाचकांसाठी इथे देत आहे. हा लेख मूळ स्वरूपात सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.

माझी ओळख ( आयडी:आलमगिर)

लेखक आलमगिर यांनी सोमवार, 19/02/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, मी आलमगीर (प्रणव जोशी). खरा सांगायचं तर हा माझा तिसरा मिपा आयडी आहे. आधीचे दोन्ही आयडी ( औरंगजेब आणि प्रणव जोशी) हे पासवर्ड विसरल्यामुळे मला बंद करावे लागले. म्हणून आता हा तिसरा आयडी. ( हा डू-आयडी नाही ना म्हणता येणार?) पुढचे काही दिवस मी माझे जुनेच लेख ह्या आयडी वर पुनर्लेखन करून लिहिणार आहे. त्यानंतर पुढची कथा मालिका चालू होईल आशा आहे कि आपण सर्व माझ्या लेखांवर प्रतिक्रिया द्याल. धन्यवाद आपला , प्रणव जोशी

स्वराज्याचे शिलेदार

लेखक खिलजि यांनी सोमवार, 19/02/2018 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
तोबरे भरुनी निघाले सारे स्वराज्याचे शिलेदार शिवशाहीचा घोष दुमदुमे मांडला झेंड्यांचा बाजार भगवे निघाले , नभी फडफडले उद्या निघतील हिरवे न लाल धर्मावरून पेटतो इथे जहालांसंगे मवाल जर द्याल इजाजत करतो इथे मी, तुम्हांसी एक सवाल धर्म वेगळे मान्य मलापण रक्त का साऱ्यांचे लाल ? भगवा मनात माझ्या भगवा तनात माझ्या सोनेरी तेज जो देई तो सूर्यही भगवा माझा सिद्धेश्वर विलास पाटणकर C
काव्यरस

सायकोसोशल

लेखक वनफॉरटॅन यांनी सोमवार, 19/02/2018 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
Jason, you're too fucking metal man Too metal for your own good You guys want some more don't ya we're just getting warmed up now man कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची 'अमान्यता' ह्यांनी फाट्यावर मारली.

वलय (कादंबरी) - प्रकरण १३

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 19/02/2018 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १२ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42012 --- प्रकरण 13 आठ दिवसांनी कारने रागिणी हॉस्टेलवर गेली. सोनी बाहेरच कट्ट्यावर सिगारेट पित बसली होती. “ओह माय गॉड सोनी. तू सिगारेट प्यायला लागलीस? सो बॅड!” सोनी उठून उभी राहिली पण तीने सिगारेट पिणे चालूच ठेवले आणि निराशेने ती म्हणाली, “केव्हा आलीस? खूप वेळ लावलास या वेळेस रागिणी?” “हो. मी आता सूरज सोबत त्याच्या फ्लॅटवर शिफ्ट होणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिप! त्याने मला एक कारसुद्धा भेट दिली आहे! बाहेर उभी आहे.” सोनी जवळ कट्ट्यावर बसत रागिणी म्हणाली. “वाव! ग्रेट.

सोसायटी प्रश्न २०१८

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 18/02/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला ९ फ्लॅट ची अपार्टमेंट अग्रीमेंट तो sale झाली होती फक्त २०१४ मध्ये अपार्टमेंट डीड पण २०१२ पासून चैर्मन महिना मेन्टेन्स घेत आहेत ,पावती देत नाहीत ,काय करावे ? खरड वहीच्या चर्चेतून धागा बनत आहे कृपया डॉक्टर साहेब व बाकी साहेब यांनी मार्ग दर्शन करावे

वेदांग शिरोडकर

लेखक arunjoshi123 यांनी शनिवार, 17/02/2018 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारंभ: एच् ब्लॉक, रुम नंबर ११७. हॉस्टेलच्या ४-५ मजली इमारतीच्या तळमजल्यावर लोखंडी जाळीच्या गेटपासून पहिलीच रुम मी पसंद केली होती. भूकंप झाला तर सर्वात अगोदर इमारतीपासून शक्य तितक्या दूर धूम ठोकता यावी असा माझ्या लातूरकडच्या भूकंपकंपित मनाचा हिशेब त्यामागे होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठवाड्याचा कोटा कमी असल्यानं त्यामानानं चांगले मार्क असूनही मला उशिरा, म्हणजे दुसर्‍या यादीत, १-२ महिन्यांनी, हॉस्टेलरुम अलॉट झाली होती. रुमच्या लोकेशनवर मी खुष असलो तरी मात्र तिथला व्यत्यय नि वर्दळ यांच्यामुळं शिरोडकरला ती आवडत नसे.

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

लेखक परशुराम सोंडगे यांनी शनिवार, 17/02/2018 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
***************** अजून एका स्वांतञ्यासाठी....!! ************************* मातीची महती गात. तुक्याचे अभंग घोकत. रक्ताचं पाणी करतं नुसता घाम गाळत राहूनचं रान हिरवं गार करायचं पण मातीचं तरी मोल असत का आमच्या जिण्याला तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू नाही तरी या देशाचा शेतकरीराजा अाहे असं समजून हा देश क्रषीप्रधान अाहे म्हणून नुसत्या टिरी बडवून का घ्यायच्या? शेती तंत्रज्ञान , नवीन शोध,कार्यशाळा वैगेर असे खास थाट करून भाषण छान होतील पण रान नसतात पिकत अशा क्रत्रीम अवसानाने अाणि हे समजून घ्या तज्ञाच्या मेंदूला राबवून नाही निघत घाम नि रक्ताचे ही नाही होत पाणी घ

मूठ / कर्ज

लेखक संदीप-लेले यांनी शुक्रवार, 16/02/2018 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूठ झाकली मूठ म्हणे सव्वा लाखाची दाबली मूठ ती मात्र तिजोरी कुबेराची कर्ज अर्जावर अर्ज तरी नाही गरिबाला कर्ज हात करा ओले मिळेल अर्जाशिवाय कर्ज