Skip to main content

मराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
अहिराणी भाषेचा गोडवा लोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे.

मराठी दिन २०१८: टापा (मावळी)

लेखक भीडस्त यांनी गुरुवार, 01/03/2018 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
टापा सांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा.

प्रेमळ दूध

लेखक खिलजि यांनी बुधवार, 28/02/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचं प्रेम दुधासारखे सफेद होते मस्त पैकी उतू जात होते आनंदाची साय जाऊन जाऊन भांडण एवढे वाढते कि त्याचे घट्ट दही होते विचारांची पकड सैल होतं जाते रंगवलेलं काय वेगळंच पण घडत मात्र दुसरंच असते आता प्रेम, प्रेम नसते , तर त्याच ताक झालेलं असते हेवेदावे मांडले जातात , वादावर वाद घातले जातात भावना घुसळून घुसळून वर येतात " शिल्लक राहिलेल्या आठवणी " प्रेम आता प्रेम नसतं, तर बनतं त्याचं लोणी असंच काही काळ साठवलं जातं "मी कशाला जाऊ ?
काव्यरस

गाडीच्या इंजिनात शिरणारे उंदीर कसे रोखावेत?

लेखक सतिश पाटील यांनी बुधवार, 28/02/2018 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात मी १० -१२ दिवस बाहेर असल्याने गाड़ी पार्किंग मधेच उभी होती, हीच संधी साधून २ लहान डुकराएवढ्या उंदीर/घुशिंनी गाडीच्या इंजिनात संसार थाटला होता. गाड़ी चालू होत न्हवती म्हणून बाजुच्या ग्यारेज मधून मेकनिक आणून तपासले असता समजले की, उंदीर मामाने वायरिंग कुरतडली आहे. ब्याट्रीतुन इंजिनला पॉवर सप्लाय होत न्हवता. पण धक्का मारून चालू होत होती. दुसरया दिवशी ऑफिसला सुट्टी घेउन ग्यारेज मधे काम करुण घेतले. त्यानंतर व्यवस्थित चालली.

मराठी दिन २०१८: समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... (उखाणे)

लेखक नूतन यांनी बुधवार, 28/02/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता....

कथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना. उखाण्यात पतीचं नाव घेण्याची सुरुवात सहसा मुलीच्या लग्नापासून होते. (अर्थात नाव घेण्यात पुरुषांचाही समावेश असतोच).

मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 28/02/2018 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
माले का मालूम भाऊ? 'कोनं बगरवलन बे माह्या सपनाईचा कचरा? डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो जाराले सोपा जाते. कोनं बगरवलन बे?' माले का मालूम भाऊ! 'साला सपना त सपना सपन्याचा कचरा बी डबल मेहनत कराले लावते!' येवड्या जल्दीमदि कोटी चाल्लास गा? पिक्चर पावाले कोनाय हिरोहिरोईन? भाई अना कतरीना मानुसमाऱ्या वाघ हिंडून रायला ना बे? माले का मालूम भाऊ! टायगर त कसाबी जिंदा रायल, पर तू जिंदा रायसीन का? 'गारा पडतीन म्हून माहीत नोहोता माहित राहून बी का तोफ झाडला रायता मना' अगा बंड्या, गारा काहून पडते गा?' ​'​माले का मालूम भाऊ!​'​ अबे विकास!
काव्यरस

वलय (कादंबरी) - प्रकरण १७ आणि १८

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 28/02/2018 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १६ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42100 प्रकरण 17 सकाळी दहा वाजता आईने बनवलेलं भाजणीचं थालीपीठ हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबत खातांना राजेश आईला म्हणाला, “मस्त झालंय थालीपीठ आणि ठेचा! आणि सोबत ताजं दही असल्याने झकास बेत आहे. आता दुपारी तीनेक वाजेपर्यंत तरी भूक लागणार नाही. मी नाश्टा झाला की धर्मापूरला जाऊन येतो जरा.” “अरे राजेश! काय नुसता फिरत असतोस? आजच्या दिवस आराम केला असतास, मग उद्या गेला असतास. आज आपल्या गावातल्या नदीवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संध्याकाळी जाऊ आपण!” “आई!

माझ्या आठवणी

लेखक प्रणया यांनी मंगळवार, 27/02/2018 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिटलेल्या नयनांची ओलावते पापणी आसवांनी सांगितले न दिसे तू मज या क्षणी मग आठवणींचा पाऊस पडू लागला मनी अन् अधरांवर हास्याची अलगद सुरु झाली पेरणी चालले होते चार पाऊले, पावलांवर तुझ्या ठेऊनी न उरले तुझे असे काही, मज तुझ्यात सामावुनी मग वाटले, तुझ्या निश्चयी पाऊलखुणांना साथ देत होती माझ्या पैंजणांची गाणी न पाहता मज चालताना, काय पाहिले मागे वळूनी न बोलताच तेव्हा, शब्दांचे काम केले भावनांनी काय उमगले बोलणे तुझे, ना जानो मज त्यावेळी पण वाटले हाती न घेता हात, जोडले भाग्यरेखांनी पाहता हे सारे, पारव्याची कुजबुज वाऱ्याच्या कानी कोणते नाते यांचे, विणले जात आहे रेशीमधाग्यांनी समजावे सारे मज, एवढ्यात नाही

माय गे माय...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 27/02/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली. डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं. गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले. पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली, "एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "
काव्यरस