Skip to main content

आनंदाचं रोपटं

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 10/06/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाचं रोपटं आमच्या घराबाहेर एक कुठलं तरी रोपटं आलंय. नको नको म्हणून आलेलं अगदीच unwanted child म्हणा ना. पण ते झाड. झाड कसलं रोपटं म्हणा ना मला खूप खूप आनंदी वाटतंय. काल अचानक आलेला पाउस सोसाट्याचा वारा त्याने खूप enjoy केलंय. आजचा मळभ-उन्हाचा खेळ ते स्वत: खेळतंय. मला ते रोपटं मनापासून आवडलेय. शेजारी राहायला आलेलं एखादं गोंडस मूल आपल्याला कसं आवडतं ना तसेच ते मला आवडलंय. ते माझं गोड आनंदाचे रोपटं आहे. आज सकाळी आमच्या वॉचमनच्या मुलीसाठी मी चॉकलेट दिलेय. आज माझा दुपारचा जेवणाचा डबा मी सहकारी मित्रांबरोबर शेयर केलाय. घरी बायकोला फोन करून आजचं जेवण खूप सुंदर झालंय म्हणून सांगितले आहे.

बागेतले आवाज

लेखक जेडी यांनी शनिवार, 09/06/2018 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते .

फलीत

लेखक कहर यांनी शनिवार, 09/06/2018 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले अर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा तीच कविता भासते आहे अशी विपरीत का बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा जे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का उतरता उन्माद कळले एकटाच रणांगणी मित्र नाही आप्त नाही ही म्हणावी जीत का ओळ आहे खूप
काव्यरस

मा फलेषु ....

लेखक सचिन बोकिल यांनी शनिवार, 09/06/2018 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या खाण्याशी संबंधित आठवणींमध्ये एक कप्पा फळं आणि त्यांच्याशी निगडीत आठवणीनी व्यापला आहे. फळं तरी आणि किती प्रकारची ! वेगवेगळी फळं आणि ती खाण्याच्या वेळा आणि प्रकार ह्याची माझ्या मनामध्ये अशी काही सांगड बसली आहे की जर मी तसा केला नाही तर मला ते फळ खाल्ल्यासाखंच वाटत नाही ! फळ हे मला तरी कधीच ते केवळ गोड किंवा आंबट किंवा तुरट आहे म्हणून किंवा त्यातून विटामिन्स मिळतात म्हणून खावसं वाटलं नाही. त्याचे रंग, वास आणि खाताना येणारा अनुभव हे पैलू माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. आणि आठवणी तरी किती ..

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 09/06/2018 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ?

मिरगाचा पाऊस -अप्लाईड खगोलशास्त्र

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 08/06/2018 16:18 या दिवशी प्रकाशित केले.

तीन वर्षापुर्वी बांबु लागवडीच्या वेळी गावातील काही स्थानिकांशी या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणुन चर्चा केली. त्यावर त्यांनी एक सृष्टीचा एक अलिखित नियमच सांगितला. कोणतेही झाड, रोप लावायचे असेल तर ते मिरगात च लावायचे. मिरीग जरी कोरडा गेला तरी रोपांची लागवड मिरगातच करायची. त्यानुसार आम्ही आमच्या कॅम्पसाईटवर बांबुची लागवड मिरगामध्ये केली. ज्या बांबुच्या रोपाला पुढ्च्या वर्षी फुलोरा आला, तेवढे सोडुन जवळ जवळ ९५% बांबुची रोपे जगली व पुढच्या वर्षी अगदी एप्रिल मे महिन्यामध्ये सुध्दा आमच्या बांबुंना जमीनीमधुन नवीन कोंब आले.

जेंव्हा माझे लेख चोरीला जातात

लेखक शाली यांनी शुक्रवार, 08/06/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
देहूतील ब्रम्हवृंदातील 'सालोमालो' हे बऱ्यापैकी बडे प्रस्थ. छान वाडा-हुडा, पैसा-अडका असलेली व्यक्ती. साहित्याची ऊत्तम जाण. आवडही. पण या सालोमालोंना काही सरस्वती प्रसन्न होईना. त्यांना फार वाटे की संस्कृतात श्लोक रचना करावी, प्राकृतात काव्यरचना करावी. पण त्यांना काही ते साधेना. हजार प्रयत्न करुनही सालोमालोंच्या काव्यात ओढाताण केलेली जाणवे. सफाईदारपणा, सहजता काही येईना. कालांतराने सालोमालोंच्या लक्षात आले की आपल्या नशिबी काही काव्यलेखन नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच प्रसन्न करुन घेता येते, सरस्वती नाही. पण सालोमालोंचा अंतरात्मा काही त्यांना चैन पडू देईना.