macOS आणि iOS-4 (AutoResponder)
macOS च्या Mail App मध्ये AutoResponder कसे सेट करायचे ते या लेखात पाहुयात.
AutoResponder मुळे तुम्ही "out of office" मेसेज सेट करु शकता. जेंव्हा तुम्ही ऑफीसमध्ये नसता किंवा काही कारणामुळे तुम्ही तुमचा inbox ॲक्सेस करु शकत नाही तेव्हा AutoResponder चा ऊपयोग होतो. मला शक्यतो ईतक्या मेलला ऊत्तरे द्यावी लागत नाही. निदान अगदी त्वरीत ऊत्तर द्यावे असे फार क्वचित मेल माझ्या इनबॉक्समध्ये येतात. पण माझ्या मित्रमंडळींमध्ये आणि काही क्लाएंटमध्येही एक दोन जण असे आहेत की त्यांच्या मेलला ऊत्तर नाही दिले की त्यांचा इगो दुखावतो. त्यामुळे मला AutoResponder ऊपयोगाला येते.
मिसळपाव