Skip to main content

घे मिठीत

लेखक आकाश५०८९ यांनी मंगळवार, 24/07/2018 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
घे मिठीत, घे मनात जसा असेन मी माझ्यापुरताही सखे माझा नसेन मी रितेपण प्यालातले माझ्यात ओतले ओत लोचनांनी मद्य तेव्हा भरेन मी नको स्पर्धा, नको जीत अन्‌ हारही तू जिंकशील कशी जेव्हा हरेन मी मला विसरल्याचेही विसरलीस तू तू लाग आठवावया तुला सुचेन मी थांबवले मृत्योस तुला भेटण्या मी तू ये सखे लवकरी खोटा ठरेन मी आहे आकाश मी माझ्याचसारखा जसा तुला हवा तसा कसा असेन मी ---- आकाश

लाख अंतरे..

लेखक आकाश५०८९ यांनी मंगळवार, 24/07/2018 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
लाख अंतरे अन्‌ अंतरी तू ऐलतिरी मी, पैलतिरी तू म्हणाली विलग होता ओठ हे झाले कॄष्ण मी, हो बासरी तू आकाश......... लाख अंतरे

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 24/07/2018 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहील्या भागात मला माझ्या भटकंती दरम्यान भेटलेल्या माणसांविषयी, दिसलेल्या गावांविषयी, सह्याद्री विषयी लिहीले. या भागात अजून काही शब्दचित्रे: पहील्या भागाची ही लिंक ---------------- शब्दचित्र चौथे: संतोष जंगम - मु. पो. चकदेव पर्वत किवा वळवण गाव किंवा पुणे किंवा मुंबई किंवा कुठेही वर्ष बहुदा २०१४. वार्षिक मेगा रेंज ट्रेक ठरलेला. थोडासा अवघड, दुर्गम भागात. पहील्या दिवशीचा मुक्काम चकदेव पायथ्याच्या वळवण गावात करायचे प्लॅनिंग होते. कुणाकडे ते ठरले नव्हते. तसे वळवण गावात कोणालाच ओळखत नव्हतो.
Taxonomy upgrade extras

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी सोमवार, 23/07/2018 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना उत्तराखण्ड! हिमालय! पिथौरागढ़! सुमारे अडीच वर्षांनंतर पुन: एकदा हिमालयाने बोलावलं! नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ मध्ये पिथौरागढ़मध्ये फिरलो. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. हा एक छोटा पण खूप सुंदर प्रवास झाला. त्यात दोन छोटे ट्रेक केले आणि पिथौरागढ़मधील काही‌ गावांमध्ये फिरलो. माझी बायको मूलत: पिथौरागढ़ची आहे, त्यामुळे तिथल्या एका लग्न समारंभाच्या निमित्ताने जाणं झालं. कौटुंबिक प्रवास, लोकांच्या भेटी व कमी सुट्ट्या ह्यामुळे ही भ्रमंती एक आठवड्याचीच झाली. पण परत एकदा हिमालय आणि विशेषत: हिवाळ्यातली हिमालयातली थंडी व रोमांच अनुभवता आलं.

स्पर्श ...तसाही आणि असाही ..

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 23/07/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श ...तसाही आणि असाही .. मी परत एकदा बँकेच्या पासबुकात निरखून बघितलं . फाईल मधल्या सगळ्या ठेवींच्या नोंदी बघितल्या.परत एकदा कागदावर केलेली आकडेमोड तपासून बघितली. पुढच्या तीन महिन्यांचे होणारे खर्च आईकडून तपासून घेतले. मला आपला रक्तदाब एकदम वाढलाय कि काय असे वाटायला लागले. हृदयातील धडधड एकदम मला स्वतःलाच एकू यायला लागली आहे ,असे वाटायला लागले. .... गेले २/३ तास माझा आणि माझ्या आईचा प्रयत्न चालला होता कि महिन्याचा खर्च कमी कसा करता येईल?दुधाचे बिल,वाण्याचे सामान,वीज ,बस चा खर्च,मोबाईल चे बिल,सोसायटी चार्जेस , पेट्रोल चा खर्च सगळे विचारात घेतले होते.

पाऊस आला

लेखक Secret Stranger यांनी सोमवार, 23/07/2018 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला पाऊस आला येऊन माझ्या सोबत बसला, ऐकून आपले प्रेम-तराणे क्षणभर तो ही तुझ्यात रमला.. आला आला पाऊस आला वाट तुझी मग पाहू लागला, सोबत माझी करता-करता तो ही झाला चिंब ओला.. आला आला पाऊस आला मनात थोडा हिरमुसलेला, तू नसल्याचे निमित्त सांगून माझ्यावर मग रुसून बसला.. आला आला पाऊस आला मनास माझ्या भिजवून गेला, विरहाच्या या अवघड वेळी तुझी आठवण देऊन गेला..

मृत्यु दर्शन

लेखक तिमा यांनी सोमवार, 23/07/2018 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बर्‍याच जणांना, आयुष्यात कधीतरी, जवळून मृत्यु दर्शन झाले असेल. मलाही ते बर्‍याच वेळा झाले आहे. निव्वळ, दोरी बळकट, म्हणून त्या प्रसंगांतून सहीसलामत सुटलो आहे. त्यातील पांच ठळक घटना, अगदी नुकत्या घडलेल्या गोष्टीप्रमाणे लख्ख आठवतात. लहान असतानाची गोष्ट आहे. आमच्या घरापासून मालाडजवळचा मार्वे किनारा, २-३ किलोमीटरवर होता. एका संध्याकाळी, आम्ही आणि शेजारचे एक कुटुंब, तिथे पायीच जायला निघालो. मार्वे रोडला लागल्यावर, थोड्याच वेळांत, मागच्या बस स्टॉपवर एक बस येताना दिसली. आई आणि शेजारच्या बाईंना चालायचे नव्हते, म्हणून माझ्या वडिलांना सांगून त्या बसपर्यंत धावत गेल्या.

तो आणि ती... जांबवती! (भाग 9)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/07/2018 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995 तो आणि ती......

विठूबंदी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 22/07/2018 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री) विठूबंदी धाडा रे कुणीतरी, विठूला सांगावा, आरक्षणाचा कांगावा, फार झाला। मागे होते एकदा मराठा मंत्री सोळा, आरक्षणाचा गोळा, तेव्हाका नाही। मुख्यमंत्र्यांना यंदा, नाही महापूजा, कारण बलभूजा, जातीभेद। संत सांगो गेले, वारकरी एकता धर्म भेदाभेद अमंगळ जर्म जळो जळो। नावडतीचे तुम्हा, जरी अळणी मीठ, निषेधाचे व्यासपीठ, इथे नव्हे। समतेचे वाळवंट, एकमेका लोटांगणे, तिथे धटिंगणे, कशासाठी? जिथे सर्वकाळ नामाचा जागर सत्तेचे गाजर, तिथे कायी? किती काळ देवा राहशील मूक तिच तिच चूक जन्मोजन्मी। सांगे "बाजीगर
काव्यरस

पाऊस !

लेखक मनमेघ यांनी शनिवार, 21/07/2018 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजून भिजून, गात्री- झेलून झेलून पाणी झाडाशी बसून, गोड- सुरात गातोय कोणी. कातर कातरवेळी लकेर लकेर ओठी पालवी पालवी जशी पानाच्या फुलते देठी. सळसळ सळसळ पानी चाहूल, जिवाला भूल मोकळ्या मोकळ्या वाटा वाटांत ओलेते सल... गारवा, गारवा रात्री हवेत वेगळा नाद... दुरून, दुरून आली कुणाची? कुणाची साद? ... झाडाशी झाडाशी खोल, थरथर थरथर देही डोळ्यांत, डोळ्यांत दोन पाऊस झाला प्रवाही ! ~ मनमेघ