Skip to main content

सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 15/08/2018 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही सोडियम काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते. सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत व प्रमाण: स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो.

कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/08/2018 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी? एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते? की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता? की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती? बँक अधीकार्‍याच्या मते लुट ही कमी रकमेच्या अनेक व्यवहारांनी केली गेली जसे १०० डॉलर ते २००० डॉलर वैगेरे. आणि ते ही पेट्रॉल पंप , एटीएम मधून.

एका चेक इन ची चित्तारकथा

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 14/08/2018 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
एका चेक इन ची चित्तारकथा कालच गोव्यावरुन मुंबई वर हवाई प्रवास करण्याचा योग आला. येताना बरोबर ताज्या पाले भाज्या, फळ भाज्या, शेंग भाज्या, पाणशेंगा (गोव्यात ज्याला नुसत्ये असे म्हणतात आणि इथे मुंबईत मासे म्हणतात) नारळ, बिस्किट, चकली, शेव,लाडू, इत्यादी इत्यादी पदार्थ आणले. मासे बर्फ घालून व्यवस्थित पैक केले होते. विमान तळावर बैगेज स्क्रीन करण्या साठी टाकल. ऑफीसरने मत्स्य पेटी बाजूला काढली. हे गोवन लोक ( ज्यात मीही येतो) माश्यासाठी साले काहीही करतील.

फिशिंग अलर्ट माझा अनुभव डॉ. स्पर्शिका जोशी

लेखक श्वेता२४ यांनी मंगळवार, 14/08/2018 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपावर फिशिंग अलर्ट संदेश वाचला आणि खूप दिवसापासून चुटपुट लागून राहिलेल्या भावनांना वाट मिळाली आणि जी माहिती किंवा लेख सगा सरांनी दाखवला(हा लेख कोणीतरी मायबोलीवर लिहिला आहे) तो पाहून मी उडालेच. कारण मी पण अगदी याच अनुभवातून गेले आहे. सबब समस्त मिपाकरांना सावध करण्यासाठी खासकरून महिला सदस्यांसाठी हा लेख. डॉ. स्पर्शिका जोशी यांनी मला 7 जुलै च्या आसपास व्यनि केला की त्यांना माझ्या काही पाककृती आवडल्या. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मी टिचकी मारली पण एक अशा आशयाचा संदेश झळकला कि त्यांना कुणीही प्रति संदेश पाठवू शकत नाही. मला हे विचित्र वाटलं.

मैत्र - ३

लेखक शाली यांनी मंगळवार, 14/08/2018 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी एक एक करुन सगळे शामच्या ओट्यावर हजेरी लावत. मग ‘भविष्यात काय करायचे?’ हा विषय सोडून सगळ्या विषयांवर गप्पा चालत. दोन एक तास मग आमचा ओटाकट्टा रंगे. विनोदी विषय निघाला की काकूंना फार त्रास व्हायचा आमच्या हसण्याचा आणि गंभीर विषय निघाला की इन्नीला त्रास व्हायचा. कारण मग तिला किमान दोन वेळा तरी चहा करावा लागे. त्यातही आमचे चहा कमी आणि नखरेच जास्त असत. धोंडबाला बशीच हवी असे तर दत्त्याला वाटीत जास्तीची साखर हवी असे. शाम्याला वरुन थोडी दुधाची साय लागे चहात.

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 14/08/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
(थोड्याकाळाचा ब्रेक घेतल्यावर परत दोन नवीन शब्दचित्र लिहितोय) पहील्या दोन भाग इथे पाहता येतील - सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १ सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २ --------------- सह्याद्रीतील शब्दचित्रे: काल परवाच गाडीने एका ठिकाणी जाण्याची वेळ आली होती. जायचे होते ते ठिकाणाचा नक्की रस्ता माहीत नव्हता.
Taxonomy upgrade extras

करामत - एक लघुकथा

लेखक अनिंद्य यांनी सोमवार, 13/08/2018 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
* * * दंग्यात लुटल्या गेलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी छापे मारायला सुरवात केली. लोक घाबरले, लुटीचा माल रात्रीच्या अंधारात घराबाहेर फेकू लागले. काहींनी तर स्वतःचाच माल फेकून दिला, उगाच पोलिसांचे झेंगट नको म्हणून. * * * एका माणसाची मात्र पुरती गोची झाली. त्याच्याकडे साखरेच्या दोन गोण्या होत्या, किराणा मालाचे दुकान लुटताना त्याचा हाती तेव्हढेच लागले. रात्रीच्या अंधारात एक गोणी त्याने शेजारच्या विहिरीत कशीबशी ढकलली, पण दुसरी ढकलतांना तोल गेला आणि तोही विहिरीत ! आवाज ऐकून लोक गोळा झाले. दोरखंड टाकून दोन उत्साही वीर विहिरीत उतरले, त्याला बाहेर काढले.

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान

लेखक मार्गी यांनी सोमवार, 13/08/2018 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर ३० नोव्हेंबर २०१७ ची सकाळ. आज सद्गडहून निघायचं आहे. गामधून समोर काल बघितलेलं ध्वज मंदीर दिसतं! हे ह्या परिसरातलं सर्वोच्च स्थान आहे. तिथे काल मोबाईलला नेपाळी नेटवर्क मिळालं होतं.

खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 13/08/2018 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच माझी गेले दोन महिने चाललेली जीवनसत्वांची लेखमाला संपली ( https://www.misalpav.com/node/42796). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची. खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत.

आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र २

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 13/08/2018 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा पहिला धागा : आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र *************************************************************************************** मानवी इतिहास युद्धांनी भरलेला आहे. मात्र त्या इतिहासात फक्त मानवांनी मानवांशी केलेल्या युद्धांचाच समावेश असतो. परंतू, मानवाला रोज इतर जीवांबरोबरही लढा द्यावा लागतो... सर्वसाधारणपणे, त्याला युद्ध न म्हणता "रोगाशी सामना" असे म्हटले जाते. पण, तरीही हे युद्धही काही कमी महत्त्वाचे नाही. किंबहुना, व्यक्तिगत स्तरावर ते जीवनमरणाचा प्रसंग असू शकते...