ओ "स्त्री" रक्षा करना..
.
टिपिकल पुरुषी अहंकारातुन स्त्री वर होणारे अत्याचार दर्शविणार्या निघालेल्या चित्रपटांची सूची भरमसाठ निघेल. पण हीच पार्श्वभूमी वापरुन एक हॉरर कॉमेडीशैलीतला चित्रपट बनवणे हे एखाद्याच्या डोक्यात येणे हीच मुळात एक दाद देण्यासारखी गोष्ट आहे. परवाच सौसमवेत "स्त्री" पाहीला.
प्रेक्षकांना गृहीत धरुन बनवलेल्या चित्रपटांच्या पठडीतुन स्त्री चित्रपट वेगळा ठरतो.
संपूर्ण कथा चार दिवसात घडते. चंदेरी नामक गाव आहे तिथे दरवर्षी चार दिवस ग्रामदेवतेची जत्रा भरत असते पण त्याच चार दिवसात रात्री अपरात्री एकट्याने फिरणार्या पुरुषांना एक हडळ केवळ त्यांचे कपडे मागे ठेवुन पळवुन नेत असते.
मिसळपाव