Skip to main content

Nandini's Diary

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 02/10/2018 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
किती महिने झाले असावेत? सात, आठ? ख्रिसमसची सुट्टी संपून नुकतंच क्लिनिक पुन्हा सुरु झालं होतं. स्कॉटलंडमधल्या या लहानश्या शहरात ख्रिसमसच्या काळात सगळं ठप्पच असतं. जानेवारीत आळोखे पिळोखे देत शहर पुन्हा जागं होतं. त्याच दरम्यान कधीतरी ती पहिल्यांदी आली. रोज घरी जाण्याआधी पुढच्या दिवसाच्या पेशंट्सच्या फाईल्स वरून नजर फिरवते तशी तिचीही फाईल बघितली. वय पन्नाशीच्या पुढे, एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारी एलिझाबेथ - लिझ. तिच्या घराच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथे येणारे बरेच लोक त्या रस्त्यावर आजूबाजूला गाड्या पार्क करत. आसपास राहणार्या लोकांना हा तसा त्रासच होता.

राधिकेचा फोन

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/10/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो गुरुनाथ: हं, बोल राधिका राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे. गुरुनाथ: का! म्हणून? राधिका: तुझे शयना सोबतचे संबंध बघून मला नेहमीच वाटायचे माझा नवरा बाहेरख्याली, व्याभिचारी आहे. आज कोर्टाचा कोर्टाचा निकाल वाचला. माझे डोळे उघडले. त्या शयानाला धडा शिकविण्यासाठी, काय काय केले मी. ते आठवून माझी मलाच लाज वाटते. मला आधीच का कळले नाही, माझा गुरु कधीच चूक वागू शकत नाही. हे असेच आहे, जसे घरात रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला कि आपण हॉटेल मध्ये जातोच ना. आता मी कधीच तुमच्या आड येणार नाही.

मन

लेखक संदीप-लेले यांनी सोमवार, 01/10/2018 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
असे समुद्र अथांग, मन त्याहूनही खोल हिमालय जो उत्तुंग, मन त्याहूनही थोर वाहताना होते नदी कधी वाकडी वेल्हाळ मन जागच्या जागीच आणि तरीही नाठाळ लहरी वारा आणे पाण्यावरती तरंग मनी उठता तरंग लहरते अंतरंग वेगवान प्रकाशाला संथ काळाचीच साथ संथ जीवनी राहून मन धावते वेगात तारे टांगले ज्यावर त्यास म्हणती अंबर मन टिपते विश्वाला, मन विश्र्वाचे झुंबर मूल पाहताच मन लहानाहून लहान तेच तन तेच मन खरे तेव्हांच महान हाव भाव राग लोभ, मनी अगणित मिती देव धर्म पाप पुण्य, सारी त्याचीच निर्मिती अवकाश पोकळीत होय अंधाराची सीमा मनाच्या पोकळीला नाही कसलीच सीमा क्षण त्यास युगासम, युग कधी त्यास क्षण जगण्यास प्रेरक ते मन

कविता महाजन: शैलीदार लेखिका

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/10/2018 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे दिनांक 27-09-2018 च्या संध्याकाळी झी चोवीस तासवर ब्रेकींग न्यूज येत होती : लेखिका कविता महाजन यांचे न्यूमोनियाच्या आजाराने निधन. प्रचंड हादरलो. अस्वस्थ झालो. कवयित्री कविता महाजन यांच्याशी पहिली भेट झाली तेव्हा त्या पांढर्याड साडीत आणि गळ्यात रूद्राक्ष माळा घातलेल्या तरूणी होत्या. दुसरी भेट 2000 साली बडोद्याला भाषा केंद्रात झाली. कविता महाजनचं ‘वारली लोकगीबतं’ हे संकलीत पुस्तक आणि माझं ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन बडोद्याच्या भाषा केंद्राच्या कृतीसत्रात सोबतच झालं. यावेळी साहित्य आणि कवितेवर आमच्या अनौपचारिक गप्पा झाल्या होत्या.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ७

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 01/10/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक भाग १ https://www.misalpav.com/node/43088 भाग २ https://www.misalpav.com/node/43118 भाग ३ https://www.misalpav.com/node/43144 भाग ४ https://www.misalpav.com/node/43170 भाग ५ https://www.misalpav.com/node/43224 भाग ६ https://www.misalpav.com/node/43298 मागील प्रकरणात आपण म्हट

पितृ"पक्षी"

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 30/09/2018 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझा कावळा अजब जीवखड्याशी खेळतो इहलोकीच्या अंगणी परलोक धुंडाळतो माझा कावळा गणिती तेरा आकडे मोजतो आठ नख्यांच्या अष्टकी पंचप्राण मिळवितो माझा कावळा तत्वज्ञ गुह्य विश्वाचे जाणतो जे जे पिंडी ते ब्रह्मांडी पिंड फोडून सांगतो पैलतीरी कोकताना हळवा का होसी काऊ जीवखड्याची रे माझ्या आज नको वाट पाहू
काव्यरस

समाधान कुठे सापडेल हो ?

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 30/09/2018 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
समाधान कस कुठे सापडेल सांगता येत नाही राव. कधी ते निसर्गात सापडत तर कधी पार निर्मानुष्य नसलेल्या देवळात मिळत. हे समाधान खुप वेगळे असते. नाकात उदबत्ती धूप कर्पूर मिश्रीत सुगंध, डोळ्याला पार गाभारा भरून राहीलेली मूर्ती शितल, कानात येते वेळी वाजवलेल्या घंटेचा रेंगाळणारा नाद ब्रम्ह, मध्येच छेदणारा दूर कुठल्यातरी पक्षाच्या किलकिलाट अगदी अकृत्रिम, पायाला स्पर्शणारा दगडी फर्शीचा ठंड़ावा, जिभेवर कर्पूर मिश्रीत तीर्थाचा शिडकावा कान, डोळे, नाक, स्पर्श, चव सर्व एकाच वेळी सुखावतात.