हंपी आणि हंपी..भाग 2
गाडीने ४ तास घेणाऱ्या प्रवासाला रेल्वेने ६ तास घेऊन एकदाचे ताकारी ला येऊन पोहोचलो . बीबी एक तरफ और बीबी का भाई एक तरफ हे वाक्य सार्थ ठरवत गाडी घेऊन जिजाजी वेळेवर घ्यायला आले.
दुसऱ्यादिवशी ०६:३० ला सकाळी आमचा प्रवास सुरु झाला आणि बायको आणि बहिणीने उद्धार केला कि ०५:३० ला निघायचे होते आणि तब्बल एक तास उशिरा निघालो आहोत. आता ह्यावर आम्ही तोंड बंद ठेवायचे सोडून म्हटले अरे आमच टार्गेटच सकाळी ०६:०० वाजता च होत पण तुम्ही लवकर आवरावे म्हणून खोटी वेळ सांगितली . झाले तोंडाचा जो दांडपट्टा सुरु झाला की बापरे बाप.
मिसळपाव