Skip to main content

तुला चाहते रे नवी कोरी मालिका

Published on शनीवार, 29/12/2018
तुला चाहते रे नवी कोरी मालिका मालिका सस्पेन्स प्रेम बदला प्रेमाचा त्रिकोण आदी मसाला ठासून भरला असून ती प्रत्यक्ष पाहण्यात मजा आहे साधारण गोषवारा असा आहे विक्रम पायमोजे ह्याच्या हजारो एकर चहा च्या बागा असतात उलाढाल साधारण पाच रे सहा हजार कोटीच्या घरात असते एकदा पायमोजे व त्यांच्या मातोश्री मळ्याची पाहणी करण्या साठी येतात शेतात कामगार काम करत असतात व त्याच मळ्यात ईशा हातमोजेा ना वाची अल्लड मुलगी काम करत असते तिच्या अनुपम सौंदर्या मुळे पायमोजेच तिच्या कडे लक्ष जाते व पायमोजे तिच्या प्रेमात पडतो ईशा मात्र "तुला चाहते रे तुला चाहते जरी आंधळी मी तुला चाहते " हे गाणे गुणगुणत चहाची पाने तोंडत असते ईशा २० वर्षांची वारुणी असते तर पायमोजे ४० वर्षांचा युवक असतो त्या मुळे त्याला प्रेम व्यक्त कसे करावे ते समजत नाही त्याच वेळी ईशा हातमोजे विक्रांत ला सजेशन देते की किलोमागे जर आपण चहाची किंमत दोन रु कमी केली तर टर्न ओव्हर वाढेल व नफा हि विक्रम ते मान्य करतो व त्याचा टर्न ओव्हर पाच हाजारावरून १५ हजार कोटीवर जाऊन पोहोचतो विक्रम ईशाला कंपनीत वरची जागा देतो पण तिची बॉस मायरा नावाची जुनी मैत्रीण असते मायरा ला ईशा आवडत नसते - इशाचे विक्रम स्तरावर प्रेम आहे असा तिला संशय असतो त्यातच विक्रम ची आई ईशाला टर्न ओव्हर वाढला म्हणून २५ लाख किमतीचा रत्नहार व चांदीचा टी सेट देते या मुळे मायराचा जळफळाट होतो शिवाय ती चकल्या करते व एक्स्पोर्ट करून कंपनीचा टर्न ओव्हर पाच हजार कोटीने वाढवते यशासारखे यश नसते त्यामुळे ती कॅलेंडर्स काढते व तिथे पण तीन हजार कोटीने टर्न ओव्हर वाढवते प्रेमाचा त्रिकोण असल्याने मालिकेत खलनायक अपहरण उसासे आदी मसाला खच्चून भरला आहे पाय मोजे चे ईशा वर प्रेम असते पण यशाच्या आईवडलांना पटवायचे असते त्या साठी विक्रम चहा च्या पानाच्या कोथिंबीर वड्या करतो ती अफलातून रेसिपी खाल्यावर दाम्पत्य लग्नास होकार देते विक्रम यशाचे लग्न होते कालांतराने ईशाला उषा नावाची मुलगी होते उषा वयात आल्यावर बिझनेस चा गाडा सांभाळत टर्न ओव्हर ३५ हजार कोटीवर नेते त्याच सुमारास राधिका मसाले मालकिणीचा मुलगा अथर्व इशाच्या प्रेमात पडतो अथर्व च्या मसाले कंपनीचा टर्न ओव्हर ४० हजार कोटी इतका असतो त्यांचे लग्न होते व अथर्व चहा मसालाची निर्मिती करतो उशाचा चहा व अथर्व चा चहा मसाला जगात फेमस होतो दोन हि कंपन्यांचे विलीनीकरण होते व टर्न ओव्हर ८० हजार कोटीवर जातो व सारे जण सुखाने नांदतात
लेखनविषय:

वाचन संख्या 5034
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

एक-दोन पिढ्यांची सोय झाली.

झकास!!! लेखाच्या प्रिंट काढून गावभर वाटल्या पाहिजेत..... तुम्ही झी मराठी ला मेल करून कळवा हि कथा.... मजा येईल....

In reply to by निनाद आचार्य

तुम्ही झी मराठी ला मेल करून कळवा हि कथा +१ 'चला हवा येऊ द्या' चा एक इपिसोड बनण्याइतका मसाला आहे या लेखात.

फक्त पुष्पे गप बस की आणि इशा चे बाबा हातात पेटी आणि पिशव्या घेऊन रस्त्यावर बसायला लागतात.