Skip to main content

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी मंगळवार, 23/04/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन १९९१ च्या आर्थिक सुधारणा आणि रुप्याचे अवमूल्यन याने , अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. प्राव्हेट कंपन्या भारतात येऊ लागल्या, रोजगार वाढू लागले, नोकरपेक्षा वर्ग कडे हळू हळू पैसे येऊ लागला. त्याकाळी मध्यम वर्ग गावाला जाऊन समाधानी असायचा, आता थोडी मोठी स्वप्ने बघू लागला. नवरा बायको दोघेही कमावते होते, मुले उच्चशिक्षण घायला लागली, काही भुर्रकन अमेरिकेत उडून गेली.

सैनिक आणि शोधक

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 23/04/2019 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
*मानसिकता : सैनिक आणि शोधक* जगात 2 तर्हेची मानसिकता असलेली माणसं पहायला मिळतात. तो फरक सांगणं सोपं व्हावं म्हणून एक उदाहरण किंवा रूपक मांडतो. सैन्याची वर्गवारी अनेक प्रकारे होऊ शकते. मला जे सांगायचंय त्यासाठी ती वर्गवारी सैनिक आणि शोधक (स्काऊट). सैनिक संरक्षण आणि आक्रमण या दोन्हीसाठी उपयोगी असतो. तर शोधक त्याला माहिती पुरवतो. सैनिक प्रत्यक्ष लढतो तर शोधक ब्रिजेस कुठे आहेत, जंगल कस आहे, जिथे हल्ला होणार तिथले लोक मदत करणारे आहेत का, अडचणी काय असणार, सोयीच्या गोष्टी कोणत्या वगैरे माहिती काढतो आणि सैन्याला पुरवतो. सैन्याला सैनिक आणि शोधक दोघांची गरज असते. ही रूपकं आता इतिहासातून समजून घेऊ.

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी मंगळवार, 23/04/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन साधारण मार्च महिन्यातील गोष्ट आहे, माझ्या मुलीला ( अदितीला) प्रोजेक्ट करायचा होता, विषय होता स्वतःच्या हाताने एक रोपटे लावणे, नेहमीच्या सवयीने मुलीने खूपच लवकर याबद्दल आम्हाला सांगितले, म्हणजे प्रोजेक्ट द्यायचा सोमवारी आणि सांगितले रविवारी दुपारी, मग काय तसेच दोघेही कॉलनी च्या बाहेर आलो, मला आठवत होते की एक माणूस हातगाडी वर विविध प्रकारची छोटी मोठी फुलझाडे ठेवतो, जरा पुढे गेल्यावर तो मनुष्य हातगाडी सहित दिसला, त्याच्या कडे जाऊन त्याला आमची निकड सांगितली, तसे तो बोलला काही काळजी नाही , या एरियात मीच सगळ्यांना प्रोजेक्ट साठी लागणारी झाडे देतो, मग काय आम्ही खुश, घासागीस करून ५० रुपयाल

बियर

लेखक सोन्या बागलाणकर यांनी मंगळवार, 23/04/2019 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: पाणी इतक्या बियरचे पेग बनवताना विचार करायचा भावा, शरीराला इतके झोके देताना उसंत घ्यायची भावा.... उसळून पुन्हा फेसाळते बियर बर्फ द्यायचा भावा... दोन पाय पुरत नाहीत बॉडीचा भार पेलताना... भावा, आता बार बंद करा अन् पिण्यातून मुक्ती द्या....

दिघी - आगरदांडा फेरी बोट

लेखक कंजूस यांनी सोमवार, 22/04/2019 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिघी - आगरदांडा फेरीबोट (श्रीवर्धन ते मुरुड ) आताच (१९ एप्रिल २०१९ ) श्रीवर्धन ते मुरुड जाण्यासाठी मधल्या फेरीबोटीने ( दिघी - आगरदांडा फेरीबोट ) गेलो. कोकणात सुटीत बरेच पर्यटक अलिबाग - श्रीवर्धन भागात पर्यटनासाठी जातात. अलिबाग - नागाव - रेवदंडा -कोरलई - बारशिव बीच - काशिद बीच - नांदगाव - मुरुड रस्ता आहे, मुरुड ते दिघी खाडी आहे. दिघी - दिवेआगर - श्रीवर्धन - हरिहरेश्वर रस्ता आहे. किंवा दिघी - बोर्ली पंचतन -श्रीवर्धन रस्ता आहे. मुरुड ते दिघी खाडी पार करण्यासाठी एक लाँच सर्विस पुर्वीपासून होती.

उत्पादन परिचय : झोप येण्याकरिता चहा

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 22/04/2019 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो.. अलीकडेच या अनोख्या चहाशी माझी ओळख झाली. आपल्याकरिता तिचा संक्षिप्त परिचय देवू इच्छितो. sleep tea या चहाचा खरेच उपयोग होतो असे जाणवले. माझ्या पत्नीला गेल्या काही दिवसांपुर्वी झोप न येण्याचा त्रास जडला होता , इतका की तिला डॉक्टरांनी काही दिवसांकरिता झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या.

ऍव्हेंजर आणि मी..

लेखक चिनार यांनी सोमवार, 22/04/2019 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऍव्हेंजर फॅन कोणी आहे का ? एक प्रश्न आहे गरिबाला... तो ऍव्हेंजर्स एन्ड गेम सिनेमा आलाय तो एकदम फायनल म्हणायचा का? म्हणजे विषय संपला का एकदाचा? पुढचं लिहीण्याआधीच सांगतो, वर्षभराने 'ऍव्हेंजर्स उरलंसुरलं' नावाने सिनेमा येणार असल्यास माझी काहीही हरकत नाही. मी ऍव्हेंजर्स विरोधी नाही. आणि मार्व्हल व्हर्सेस डीसी वगैरे फंदात तर मला मुळीच पडायचं नाही. आमच्यालेखी मार्व्हेल, डीसी म्हणजे शिवसेना-मनसे आहेत. म्हणजे एकाला झाका दुसऱ्याला काढा फरक नाही.

घोळ झाला घोळ

लेखक कहर यांनी सोमवार, 22/04/2019 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुला आठवता कागदावरी उतरून आली ओळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ स्पर्शता तुला विसरून गेलो करायची अंघोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुझ्या सयीने हृदयाच्या छिद्राचे झाले बोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ तुझ्या अदा टोमणे बहाणे मिसळून झाला कोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ झोप नाही रात्रीला सोबत घुबड नि वटवाघोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ पाहताच तू दुजाकडे उठतात आगीचे लोळ सखे गं घोळ झाला घोळ घोळ झाला घोळ सखे गं घोळ झाला घोळ कोरेगाव तू पार्क प

# राजे छत्रपती

लेखक sanket gawas यांनी सोमवार, 22/04/2019 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिवनेरी दारी तोफा कडाकल्या सह्याद्रीच्या कुशीत विजा चमकल्या.... जिजावुंच्या पोटी रत्न जन्मलं स्वराज्याच्या स्वप्नात राजे बाळ रंगल.... हाती घेऊन तलवार करी अन्यायाचा प्रतीकार प्रत्येकी जाहला देवाचा साक्षात्कार...... केली स्वराज्याची स्वारी घेऊनी आर्शिवाद भवानी मातेचा शत्रूंवर बरसला मस्तकी लावूनी टीळा भगव्या रक्ताचा ..... स्वधैर्याने गाजवले द्दिल्लीचेही तख्त कोणत्याही परिस्थितीत झुकले नाही मराठ्यांच रक्त .... जन्मभर फक्त आणि फक्त रयतेसाठी झिजला स्वराज्याच स्वप्न उरी बांधूनी तो एकटाच लढला.... शिव छत्रपती राजा प्रत्येकी मनी बसला असा एक शिवसुर्य रायगडी कुशीत निजला......

Coffee आणि ति २

लेखक sanket gawas यांनी सोमवार, 22/04/2019 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
#Coffee2 आपली भेट ,Coffee आणि बरच काही आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही... कारण आज नव्हतीस तू समोर फक्त भास होता मनाचा सोबत बसलोय तुझ्या हाच प्रयन्त होता स्वतःला समजवण्याचा... स्वतःला तुझ्यात हरवून खूप काही आज बोलायचं होत डोळे बंद करून तुझ्या गप्पांमध्ये स्वतःला गुंतवायच होत.... खरतर आज खूप तक्रारी करणार होतो तुझ्याकडे मागणार होतो स्वतःसाठी हक्काची अशी वेळ तुझ्याकडे... पण समोर होती रिकामी खुर्ची तीहि वाट बघत होती तुझी कदाचीत आज तिलाही परीक्षा घेऊन बघायची होती माझी... हातातला कॉफी चा कप मागत होता काही प्रशांची उत्तरे पुन्हा पुन्हा तुला आठवून मन मात्र आतून रडत होत बिचारे... म्हटल तू