Skip to main content

वजनदार!

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 24/06/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
(याच प्रेरणास्थानाला उद्देशून लिवलेली आधीची कविता "बिज्जी लेखिकेची आळवणी" ) हरपता ती लेखनस्फूर्ती हाटेले घालुनी पालथी ओरपी लेखिका मिसळ वर घेई मिठाई सुरती भिववितो तिला तनुभार स्वप्नि ते आकडे दिसती निर्धार प्रतिदिनी करिते 'करु उद्याच सुरु भटकंती' लेखिका म्हणे सुप्रहरी 'मैलाची मारू फेरी..' पण कुठुनी ते होण्याला कुणि दिसे तिज सखी प्यारी गप्पांना येता बहर गुपिते ती चावट कहर व्यायाम राही बाजूला वर वाया प्रातःप्रहर व्यायाम जरी तो इष्ट मैत्रीण तिची गप्पिष्ट करि कुलंगड्या गावाच्या 'हा लागट, तो तर शिष्ट' गप्पांतच घटिका सरती त्या माघारी मग फिरती घर

माझ्या पुणे गोंदवले प्रवासात टिपलेले काही क्षण

लेखक गीतांजली टिळक यांनी सोमवार, 24/06/2019 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल वर्षभराहून अधिक काळाने गोंदवल्याला जाऊन आले. समाधी दर्शनाबरोबरच मला काल काही खूप वेगवेगळ्या गोष्टी पहायला मिळाल्या. नेहमीचा माझा आवडता दुधेबावी घाट तर जाता येता मन भरुन पाहून घेतला. माझं सगळं लहानपण घाटातून प्रवास करण्यातच गेलं कारण कोकणात वास्तव्य. पण तो कुंभार्ली घाट महाप्रचंड अवाढव्य आहे. त्याची कायम भिती वाटली. पण तो तितकाच देखणाही आहे. पावसाळ्यात तर या घाटातून जाताना स्वर्गात आहोत असंच कायम वाटत आलं. पावसाने ओथंबलेल्या ढगातून जाणारी गाडी, त्यांच्या ओलाव्याचा शरिराला होणारा स्पर्श.

(मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 24/06/2019 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
जेष्ठ कविवर्य "अवधुत दादांना " विनम्र अभिवादन, आणि आमचे पेरणा स्थान श्री श्री श्री चामुंडराय यांना सादर प्रणाम, त्यांच्या काव्यप्रतिभेमुळेच आम्ही हे काव्यपुशप प्रसवू शकलो. टिप :- क्रूपया अक्षरास हसू नये मिपा हे दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे, विझलेल्या धाग्याला, डु आयडी ने फोडणी, प्रतिसादास्तव आसूसलेले, टुकार लेख अन चर्चा, मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे, लेखांच्या या बाजारातून प्रतिसांदांची दाटी, आणि म्हणावे दर्जा ठरवी शतकाच्या या गाठी, रोजच यावे, धागे चाळावे, धरुन आशा खोटी,

स्पिती घाटी , हिमाचल प्रदेश (Spiti Valley) - पहिली मराठी vlog series

लेखक व्लॉगर पाटील यांनी रविवार, 23/06/2019 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
सहयाद्रीच्या कुशीत भरपूर फिरून झाल्यानंतर , आपण पहिल्यांदाच जात आहोत प्रचंड हिमालयाच्या भेटीला .... स्पिती valley चा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तुमच्या साठी घेऊन येत आहे पहिलीच मराठी vlog मालिका. त्याच मालिकेचा हा पहिला भाग Roads of Himalaya - तुम्ही कधी इकडे भेट देणार असाल आणि गाडी स्वतः चालवणार असला तर हिमालयातल्या रस्त्याची माहिती असणे फार गरजेचे कारण तिथलं रस्ते फारच लहान एकावेळी शक्यतो एकच गाडी जाऊ शकेल असे. तसेच एक बाजूला हिमालय न दुसऱ्या बाजूला कठडे नसलेलं रस्ते न खोलवर दरी, खूपच थरारक अनुभव असतो.

डोह-१

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 23/06/2019 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
घनतमात पसरला ऐसा कभिन्न काळा देही आ वासून गगना पाही ... डोहकाळीमा डोहकाळिमा श्रांत क्लांत पांथस्थाला दो घोट जलाचे देई आयुष्य मागुनि घेई ..... डोहकाळीमा डोहकाळिमा किती प्रश्न चिरंतन साचे घेऊन उरावर जगणे निरखत हा तगमगणे... डोहकाळीमा डोहकाळीमा पैलतीर ना माहित कुठून कैसा दिसतो फुटता होडी गिळतो .... डोहकाळीमा डोहकाळीमा चिरंतन काजळ काळे सत्य भयाण कि भास हा वेटाळी सर्वांस ..... डोहकाळीमा डोहकाळीमा ©सागरलहरी

डोह

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 23/06/2019 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
पल्याड- एखादा कभिन्नकाळा राक्षस निवांत पहुडलेला असावा आणि केवळ त्याच्या अस्तित्वाच्या भीतीने कुणीही त्याच्या आसपास फिरकू नये असा तो गूढगर्भ डोह निवांत पसरला होता. वाटसरू ... वाटसरूच तो अनंत अंतर पायदळी तुडवून श्रांत झालेला पुढे तोडायच्या अंतराची कितिक गणती असेल या विचाराने विद्धसा, हळू-हळू डोहाच्या काठी आला. वाटसरू पाणी घ्यायला झुकणार इतक्यात गहन गंभीर आवाज निनादला ... ये, राजा... ये. सगळी राज्यश्री सोडून गेली, सगे सोयरेही सोडून गेले आता तुला माझी आठवण झाली ना ? ये ...

कुरबुर झाली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/06/2019 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुरबुर झाली (काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले.

धागा चालेना, धागा पळेना... धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 23/06/2019 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
कवी " बी " यांना विनम्र अभिवादन धागा चालेना, धागा पळेना धागा संथ चाली, काही केल्या पेटेना गेलो ट्यार्पीच्या बनी म्हंटली ट्रोलांसवे गाणी आम्ही सुरात सूर मिळवून रे गेलो डू-आयडीच्या बनी डूख धरला मी मनी ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे चल ये रे, ये रे ट्रोल्या टोचू उचकवू घालु काड्या टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक हे मिपाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे आयडी विषयाचे किडे यांची धाव प्रतिसादाकडे आपण करू शुद्ध "पिंक"पान रे धागा पेटला आला बहरून ट्रोलांनी दिला विषय भरकटून कोण मी - ट्रोल? कोठे डू-आयडी जण रे

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/06/2019 03:29 या दिवशी प्रकाशित केले.

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय!

कढी गोळे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 22/06/2019 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पावणे सात वाजले कि तो तयारीस लागायचा केसाचा झुपकेदार कोंबडा -जीन टी शर्ट -परफ्युम लावून आपली क्रुझर काढायचा मिनिटाच्या आत एक सिग्नल लागायचा तिथे तो थांबायचा त्याच वेळी ती पण होंडा वर यायची सुंदर होती दिसायला जीन टॉप मानेपर्यंत रुळणारे केस गोड्ड चेहरा सिग्नल सुटेपर्यंत ती त्याच्या कडे बघत असे त्याला खूप ऑकवर्ड व्हायचे असे वारंवार घडत असे त्याला वाटले ही आपल्या पाळतीवर तर नाही ना>? आणि नेमकी हि त्याच वेळी कशी येते ? - त्याने वेळ बदलायची ठरवले पाच वाजता तो निघाला -तेव्हा पण ती हजर त्याने अनेक वेळा वेळ ठिकाणे बदलली पण ती पाठलाग करतच होती - कोण असेल ती ? मीच का?