Skip to main content

किरण व संगीता --एक आंतर जातीय प्रेम कहाणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 07/07/2019 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
* १२ला टॉपर लिस्ट मध्ये आल्या मुळे तिचा सत्कार आयोजित केला होता संगीता व किरण हे बाल मित्र १२ वि पर्यंत एकाच महाविद्यालयात ते शिकत होते संगीता प्रचंड बुद्धिमान मुलगी होती अक्युमन ची दैवी देणगी तिला लाभली होती ती दिसायला रूपवान होती पण रूप गर्विता नव्हती किरण मास्क-या होता कुठून कुठून तो माझे मजेचे प्रकार शोधात असे त्याच्याशी गप्पा मारताना संगीता भान हरपून जात असे संगीताला किरण खूप आवडायचा रुबाबदार स्नार्ट तरुण होता पण तिला कधी त्याच्या बद्दल तसे वाटे काही वेळा मैत्री वाटे या बाबत मात्र ती कायम गोंधळलेले असे ती करियर माईंडेड मुलगी होती तिचे ध्येय तिने निश्चित केले होते आ ए एस ऑफि

देशमुख काका ,

लेखक Sanjay Uwach यांनी रविवार, 07/07/2019 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी पहाटे फिरायला जाणे,हा माझ्या जीवनातील एक आनंददाई भाग आहे .या वेळी आपण नेहमीच्या आयुष्य पेक्षा , कांहीतरी वेगळ्या वातावरणात ,वेगळ्या जगात गेल्याचा भास, आपल्याला नेहमीच होत असतो . मस्त पैकी स्पोर्ट्स शूस घालून ,स्पोर्ट्स ड्रेस घालून त्या अंधुक प्रकाशात चालत जाणे व परत येताना घरा शेजारी असणाऱ्या बागेतील बाकड्यावर कांही काळ विसावणे,हा माझा नित्यनियमचा अनेक वर्षाचा कार्यक्रम आहे ,इतर वेळी मुंग्या प्रमाणे पळणारी हि माणसे ,कर्कश आवाज करीत ,धूळ उडवीत जाणारी अनियंत्रित वाहने, या पासून जीवाला थोडी सुटका मिळते .

कधी शांत, कधी उसळते !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 07/07/2019 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
पित्तखडे आणि पित्ताशयदाह तेल आणि तूप हे आपल्या आहारातले प्रमुख मेद पदार्थ. स्वयंपाक रुचकर होण्यात त्यांचे मोठे योगदान असते. मात्र हे मेद पचण्यास तसे जड असतात. त्यांचे पचन सुलभ होण्यासाठी आपल्या पचनसंस्थेतील पित्ताची (bile) खूप गरज असते. पित्त हा पाचकरस मुळात यकृतात तयार होतो आणि नंतर तो पित्त्ताशयात साठवला जातो. पित्तरसामध्ये अनेक घन पदार्थ असतात. त्यातील काही घटकांचे एकमेकाशी असलेले तुलनात्मक प्रमाण हे महत्वाचे असते. जर काही कारणाने यात बिघाड झाला तर पित्तखडे निर्माण होतात. त्यातून पुढे अन्य काही समस्या निर्माण होऊ शकतात.

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 07/07/2019 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
या मालिकेतील मागील लेख: चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार हीच मालिका युट्युबवर दृकश्राव्य माध्यमात : Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला लांबलचक प्रवास करायचा होता.

पावसाविषयी असूया

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/07/2019 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाविषयी असूया पाहून माझे खुप हाल झाले पावसाने केले तुझे केस ओले गवतावर पडताच पाऊल शहारले अंग भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली ओली करून साडी पाऊस मातलेला बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले पाषाणभेद ०७/०७/२०१९
काव्यरस

तर्काच्या सीमेवर तेव्हा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 06/07/2019 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्थलकालाचे ताणेबाणे जटिल, चिवट पण तटतट तुटले घालित अवघड नवे उखाणे जडातुनी चैतन्य उमलले सप्तरंग लवथवले, मिटले सप्तसूर झंकारुन शमले भवतालाला भारून काही पुन्हा निवांत झाले तर्काच्या सीमेवर तेव्हा अतर्क्य भेटुनी गेले
काव्यरस

आभाळ पडलंय खड्ड्यात ; खड्डा पार आभाळात !

लेखक इरामयी यांनी शनिवार, 06/07/2019 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
"... कोणताही प्रश्न आपला स्वत:चा असतो, आपलं त्याबद्दल काहीतरी इंटरप्रिटेशन असतं आणि आपण ते लोकांवर थापत असतो. Why? एकमेव कारण म्हणजे आपल्याला आतून त्या उत्तराबद्दल Recognition आलेलं नसतं, म्हणून तीच गोष्‍ट आपण बाहेर सांगून बाहेरुन Recognition मिळण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन कुणी दिलेलं रेकग्नीशन, तुमची दुसर्‍याने तयार केलेली कुठलीही ओळख बोगस असते. ..." Source: http://www.misalpav.com/node/21802 (धन्यवाद, यकूजी) :::: खूप दिवस / वर्षं झाली या गोष्टीला. तेंव्हा माझा ईश्वराच्या अस्तित्त्वावर विश्वास नव्हता. देवळात जाणं मला पसंत नसे.

सोलापूरची आंध्र (मिरची) भजी by Namrata's CookBook :७

लेखक Namokar यांनी शुक्रवार, 05/07/2019 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
-- सोलापूर मध्ये ही भजी आंध्र भजी या नावाने प्रसिध्द आहेत त्यामुळे हे नाव रेसिपीला दिले आहे लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: मोठी मिरची मिरचीसाठी मिश्रण : धणे+जिरे पुड / जिरे पुड शेंगदाण्याचे कूट चिंचेचा कोळ मीठ भजीसाठी : १ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ) २ चमचे तांदळाचे पीठ (२५ग्रॅ) १ छोटा चमचा हळद १ छोटा चमचा ओवा कोथिंबीर (optional) चवीनुसार मीठ १/४ चमचा सोडा तेल पाणी चाट मसाला / काळे मीठ बारीक चिरलेला कांदा क्रमवार पाककृती: १. मिरची धुवून,पुसून घ्या २.

सर्पणाला एकदा पालवी फुटली

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 05/07/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
सर्पणाला एकदा पालवी फुटली त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली सर्पणच ते चुलीत जळायचेच होते इतरांसारखेच राख होऊन वर जायचे होते प्रेतांच्या ढिगाऱ्यात असेच पडून होते स्वगत सर्पणाचे == फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ? कधी राख होईन , हि भीती मनात पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ जगावे वाढावे ते कोणा प्रित्यर्थ ? उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी कुणी तोडे पान, कुणा आवडे फुल कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल किती देऊ फळे , जरी आमुची बाळे तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे आम्ही वाढतो देण्यासाठी ते श्वास ते श्वास घेता घेता घेती आमचाच घास गतजन्मी असणार