तर्काच्या सीमेवर तेव्हा
लेखनविषय:
काव्यरस
स्थलकालाचे ताणेबाणे
जटिल, चिवट पण तटतट तुटले
घालित अवघड नवे उखाणे
जडातुनी चैतन्य उमलले
सप्तरंग लवथवले, मिटले
सप्तसूर झंकारुन शमले
भवतालाला भारून काही
पुन्हा निवांत झाले
तर्काच्या सीमेवर तेव्हा
अतर्क्य भेटुनी गेले
वाचने
2355
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
सुंदर आणि अफाट आहे हे!
विस्कटून सांगताल का भाऊ ?
छान!
In reply to छान! by राघव
राघव,