Skip to main content

गंदीकोटा आणि बेलम गुहा - १

लेखक एक_वात्रट यांनी सोमवार, 14/10/2019 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मला फिरायला प्रचंड आवडतं. आणि फिरण्याखालोखाल मला काही आवडत असेल तर ते प्रवासवर्णनं वाचणं. हाताशी भरपूर रिकामा वेळ असावा, एखाद्या सुंदर जागेचं रसाळ भाषेत केलेलं प्रवासवर्णन समोर असावं, आणि हातात कॉफीचा कप असावा, अहाहा, क्या बात है! असाच एकदा मी (ऑफिसात काम करण्याऐवजी) प्रवासवर्णनं धुंडाळत बसलेलो असताना अचानक एक वेगळं प्रवासवर्णन समोर आलं. ‘गंदीकोटा आणि बेलम गुहा’ या दोन जागांचं. ही नावं तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकत होतो. मी ते फोटो पाहिले आणि वेडाच झालो. अशा काही जागा आपल्या भारतात आहेत यावर ते फोटो समोर नसते तर मी विश्वासच ठेवला नसता. तेव्हा लगेच सुरू झालं त्यांची माहिती काढायचं काम.

गुण्या-गोविंदा

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/10/2019 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भाऊ होते. एक मोठा होता, आणि दुसरा धाकटा होता. कारण ते जुळे नव्हते. अगोदर जन्माला आलेला भाऊ सुरुवातीला काही दिवस मोठा भाऊ होता. नंतर धाकटा भाऊ म्हणाला, आता मी मोठा भाऊ! मोठा म्हणाला, ठीक आहे. मग या वेळी मी धाकटा!... अशा रीतीने दोघे भाऊ गुण्यागोविंदाने रहात होते. पुढे काही वर्षे गेली आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करावयास हवे असे दोघांनाही वाटू लागले. पण दोघेही स्वतंत्र विचाराचे आणि स्वाभिमानी बाण्याचे असल्याने, आपला निर्णय आपणच घ्यायचा हे दोघांनीही ठरविले होते.

समीक्षा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 14/10/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक 13-10-2019 च्या ‘महाराष्ट्र टाइम्स, संवाद’ पुरवणीत डॉ. सयाजी पगार यांनी लिहिलेले ‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीवरचे परीक्षण: व्यापक मनोविश्वाची प्रायोगिक कादंबरी - डॉ. सयाजी पगार एकविसाव्या शतकाच्या प्रारंभ काळात प्रयोगात्मक मूल्यांच्या बंदिस्त जोखडात जखडलेल्या कादंबरी लेखनाला नवा आयाम देत नव्याने क्रांती करत डॉ. सुधीर देवरे यांनी ‘मी गोष्टीत मावत नाही’ ही कादंबरी सिद्ध केली आहे. या कादंबरी लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीत ‘यमुनापर्यटन’ या पहिल्या कादंबरीपासून ते आजतागायत ज्या कादंबर्यात लिहिल्या गेल्यात त्या सर्वच सलग लेखनात आहेत; त्याला ही कादंबरी अपवाद ठरते.

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 13/10/2019 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले (जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला.

कोजागिरी

लेखक मायमराठी यांनी रविवार, 13/10/2019 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
आतुरली यामिनी ही उमलुनी पाकळ्यांना मातलेल्या चांदण्याही योजती बाहुपाशांना ।।१।। गोडी जणु अमृताची प्रसवे नभातुनी या जोडी झुरे चातकांची प्राशण्या ती शुभ्रमाया ।।२।। अपूर्णता साहवेना शश शोभे शशीदेहीं काया छायेत मावेना पूर्णता ये तिथीलाही ।।३।। पौर्णिमेचा चांद भोळा मनामनां मोहणारा लाजताना तोळातोळा कोजागिरी लुटणारा ।।४।।

India Deserves Better - ६. हसदेव अरण्य, कोळसा खाण, पर्यावरणाचा ह्रास आणि अदानी.

लेखक गणेशा यांनी रविवार, 13/10/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
नोटः शेती आणि समस्या या विषयावर लिहिताना, शेतकर्‍यांच्या बेसिक प्रश्नांनाही सरकार विरोधी अजेंडा, शहरी लोकांच्या करावर चाललेला बाजार अश्या आशयाच्या टीका थोड्याफार प्रमाणात ऐकाव्या लागल्या, परंतु त्यामुळेच शहरी नागरीकाची माणसिकता आणि व्यथा यावर लिहायला घेतले होते, आजपर्यंत मध्यमवर्गीय नोकरदार आणि शहरी नागरीक यांच्या वर जास्त काही लिहिले गेले आहे असे माझ्या वाचनात कधी आले नाही.

कानोसा पाकिस्तानचा १ - दि १२ ऑक्टोबर २०१९

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 13/10/2019 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, भारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अतर्गत घटनांचा आपल्या रजकारणावर काही प्रभाव पडतो का? यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर.

निनावी कथा

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 11/10/2019 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग निवांतपणे ती टिव्ही लावून बसली. बातम्यांवर नेहमीचे राजकारणी पडसाद उमटत होते. या अश्या बातम्या सुरु झाल्या की तिला जबरदस्त कंटाळा येत असे. काही तरी सोबत राहिलं म्हणून तिने रेडिओ असल्यासारखा बाजूला टीव्ही चालूच राहू दिला आणि मघाशीच्या शोधाशोध सत्रात पसरलेले घर आवरण्याचा प्रपंच सुरू केला. सर्दीकरता काढलेल्या टॅब्लेटसची स्ट्रीप आवरताना तिला माईची आठवण आली. आज माई इथे असती तर नक्की म्हणाली असती, 'अगं शिंकल्यावर माणसाने घराबाहेर पडू नये. सांग सुशांताला....