बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
======================================
मंडळी,
युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली.
गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे.
या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली. इतके दिवस सगळे व्यवस्थित चालू असताना या अचानक उद्भवलेल्या अडचणीने मी पण वैतागलो.
मिसळपाव