जाज्वल्य राष्ट्राभिमान, थोरा मोठ्यांचे पुण्यस्मरण वगैरे...
या देशात जरा चुकीच्याच काळात आपण जन्माला आलो हि भावना आजकाल फार बळावते. स्वातंत्र्यानंतरची बहुदा दुसरी पिढी असावी आमची. येता जाता म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अगोदरच्या पिढीने केलेला अभ्यास, स्वतंत्र भारतात जन्माला आल्याचे भाग्य, वगैरे गोष्टी कानावर आदळत असत. स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलनात घेतलेली उडी, आसुडाचे फटके, नखं उपसून काढणे, दगडी घाण्याला जुंपून घेणे, फाशी जाणे अशा शिक्षा भोगणे असे सहन केलेल्या लोकांनाच राष्ट्राभिमानी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असे कुठे तरी वाटायचे.
हे कमी म्हणून कि काय, त्या वेळेस अभिनव असणारी गोष्ट म्हणजे परदेशी वास्तव्य.
मिसळपाव