रायगडाच्या घेर्यात
६ एप्रिल १६५६ चा दिवस. एन आषाढ वणव्यात एका बलदंड आणि प्राचीन गडाच्या पायथ्याशी फौजा पोहचल्या आणि बघता बघाता त्यांनी गडाला मोर्चे लावले, मोक्याच्या जागा रोखल्या, गडाला वेढा पडला. अर्थात गडाचा फास हा असा आवळल्यानंतर गडावर कैद झालेला सरदार, त्याच्या दोन मुलांसह लगेचच शरण आला. हा जहागीरदार होता चंद्रराव मोरे आणि बरोबर होती त्याची दोन मुले कृष्णाजी व बाजी. अर्थात चंद्रराव हे याचे खरे नाव नव्हते, हि होती पदवी. जावळीच्या दुर्गम प्रदेशावर राज्य करणार्या मोरे घराण्याच्या राजपुरुषाला हि उपाधी लावली जात असे.याचे खरे नाव येसाजी मोरे.
मिसळपाव