विराणी- गझल
लेखनविषय:
गझल एक संवेदनशील काव्यप्रकार ! ज्याची मोहिनी जितकी गझलकाराला असते तितकीच तिचा आस्वाद घेणाऱ्याला असते. जेव्हा गझल लिहिण्याचा प्रयत्न करायचं ठरलं तेव्हा खुपच जुजबी माहिती होती. म्हणजे गझलेत प्रामुख्याने विरोधाभासी प्रतिकांचा वापर केला जातो. उदा.भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, सुगंधी जखमा,लाघवी खंजीर यांसारख्या. पण अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी गुगलुन बघितलं तर ब्रह्मांडच हाती आलं.
गझल इतकी तंत्रशुद्ध असते याची कल्पनाच नव्हती. गझलेत पाच ते सतरा द्विपदी असतात. त्यातील पहिल्या द्विपदीला मतला असे म्हणतात तर बाकीच्यांना शेर. शेर हे जरी आधीच्या किंवा नंतरच्या शेराशी जोडलेले असले तरी ते स्वतंत्र पण अर्थाच्या दृष्टीने पूर्ण असतात.
प्रत्येक द्विपदी ही मात्रावृत्तात ( गझलेच्या प्रत्येक ओळीतील मात्रांची एकुण संख्या समान,जी माझ्या गझलेत 28 आहे) किंवा अक्षरगणवृत्तातच (लघु गुरु अक्षरांचा क्रम प्रत्येक ओळीत समान )असायला हवी. अक्षरछंदवृत्तात (केवळ अक्षरांची संख्या समान) गझल कधीच नसते.
मतल्यामध्ये रदीफ़ (एकाच शब्दाचा,शब्दसमुहाचा दोन्ही ओळींमध्ये वापर) नसेल तरी साैंदर्याच्या दृष्टीने फरक पडत नाही, तिला गैरमुर्रद्दफ़ गझल म्हणतात. मात्र काफ़ियाशिवाय गझल असूच शकत नाही. काफ़िया म्हणजे यमक जे स्वराने,अक्षराने किंवा शब्दाने साधले जाते. ज्याचे यमक योजिले असते, त्याला आधीच्या स्वराशी जोडल्यास अलामत म्हणतात. उदा.माझ्या रचनेत ना हा काफ़िया; जो सर्वच पदांच्या अंती समान आहे तर अलामत प्रत्येक द्विपदीसाठी भिन्न आहे. सोसवेना-पोसवेना यात तर ए हा स्वर म्हणजे अलामत ) जो गझलेला अधिक साैंदर्य देतो.
हे झालं गझलेचं मला समजलेलं तंत्र.गझलेतुन प्रामुख्याने जरी प्रेम,विरह,व्यथा,सामाजिक दृष्टिकोन यावर जरी भाष्य केलं जात असलं तरी तिचं साैंदर्य मात्र वेदनेचा सोहळा करण्यात आहे.
वाचने
8689
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान माहिती..
छान.
छान माहिती.
खूप सुरेख.
आवडली गझल..
वाईट मानू नका, वृत्तदुष्ट आहे. माझा प्रयत्न खाली देत आहे
In reply to वाईट मानू नका, वृत्तदुष्ट आहे. माझा प्रयत्न खाली देत आहे by धष्टपुष्ट
वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही.
In reply to वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही. by मी-दिपाली
जसं तर्कदुष्ट असतात असा
In reply to वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही. by मी-दिपाली
खरं तर शेवटच्या ओळी मध्ये
स्वागत!
In reply to स्वागत! by सत्यजित...
अलामत बाबतीतला नियम माहिती
अजून थोडे!
In reply to अजून थोडे! by सत्यजित...
धन्यवाद, सुरेश भटांची बाराखडी
In reply to धन्यवाद, सुरेश भटांची बाराखडी by मी-दिपाली
संक्षेपतः
सर्वांच्या अभ्यासासाठी....
गझल छान
गझलेच्या तंत्राविषयी केलेलं विवेचन आणि आपली गझल
छान लेख, छान गझल
गझल आवडली.