Skip to main content

मी आणि माझा न्यूनगंड

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 26/11/2020 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते. कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले. माझे आयुष्य नेमके किती असेल, मी आयुष्यात काय मिळवले पाहिजे हा पहिला प्रश्न.. आजूबाजूला बघता बघता हे लक्षात आले के आयुष्य फारच क्षणभंगुर आहे, कोणत्याही क्षणी तुमचा ग्रंथ आटोपु शकतो. हा माझ्या आयुष्यातील पहिला न्यूनगंड..

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 26/11/2020 12:00 या दिवशी प्रकाशित केले.

मजसी भेटवा...

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी गुरुवार, 26/11/2020 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मजसी भेटवा.... कुणी असो सोवळा, कुणी तो बावळा, विठ्ठल सावळा, सर्वांना प्रिय.. कृपेची साऊली, उभी असे राऊळी, ती विठू माऊली, सर्वांना प्रिय.. क्षण जाई वाया, निरवी "तो" माया, ऐसा विठुराया, सर्वांना प्रिय.. वाजवू मृदुंग, गाउनी अभंग, मनी पांडुरंग, सर्वांना प्रिय.. मकरकुंडलांचा साज, डोळाभर पाहू आज, उभा केशीराज, सर्वांना प्रिय.. धरूनिया हात, करी जो सनाथ, असा पंढरीनाथ, सर्वांना प्रिय.. सोडवी आसक्ती, देई जो विरक्ती, तो रखुमापती, सर्वांना प्रिय... जिथे नामाचा गजर, तिथे जातीने हजर, सखा रखुमावर, मजसी भेटवा...!! जयगंधा.. २६-११-२०२०.

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 25/11/2020 12:25 या दिवशी प्रकाशित केले.

गोष्टी सांगेन अंतरीच्या

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 25/11/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
"काय हो मास्तर, जर ११ वी १२ वी पालकांवर चित्रपट काढायचा ठरला तर नाव काय द्याल" रामदास विचारते झाले. मुकी बिचारी कुणी हाका किंवा lambs for slaughter आणि हो त्यात l s capital मध्ये लिहायचे नाही. ............. "प्रभू सर मी अबक बोलतोय. रामदासांनी तुमचा नंबर दिला" बोला. "एक अडचण होती. माझ्या मुलीच्या बाबतीत मला तुमची मदत पाहिजे" इथे कनेक्शन तुटले. मी नंबर लावला पण स्विच ऑफ येऊ लागला. डोक्यात काहूर उठले. मनातल्या मनात "ते" नसले तर मिळवली म्हणून गप्प राहिलो. अर्ध्या तासाने पुन्हा फोन आला. "माझ्या मुलीला ९४ टक्के मिळाले आहेत दहावीला" अभिनंदन. माझ्याकडून काय मदत हवी.

सुब्रमण्यपुरम् - एक थरारपट!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 25/11/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख मिपाकरांसाठी ---------------------------------------------------------- सिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे. लेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार कलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार संगीत - जेम्स वसंतन् हा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते. सिनेमा सुरु झाल्यावर पहिल्याच दृश्यात आपल्याला दिसतं की तुरुंगातून एक गुन्हेगार शिक्षेचा काळ संपल्याने बाहेर पडतो आहे.तो बाहेर पडताच तुरुंगाच्या आवारातच एक व्यक्

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी मंगळवार, 24/11/2020 17:58 या दिवशी प्रकाशित केले.

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 23/11/2020 18:04 या दिवशी प्रकाशित केले.

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 23/11/2020 13:08 या दिवशी प्रकाशित केले.

पत्रकारितेतला दिप्स्तंभ

लेखक शूकरोपम यांनी सोमवार, 23/11/2020 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो. या यशस्वी मानसाने साध्या रिपोर्टर मह्नून सुरुवात केली. पन कोणत्याही प्रामानिक मानसाला त्याचे काम वर घेउन जात असते. तसे त्याने मोठमोठ्या टिव्हि चानेल्स साठी काम केले आहे.