जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते.
कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले.
माझे आयुष्य नेमके किती असेल, मी आयुष्यात काय मिळवले पाहिजे हा पहिला प्रश्न.. आजूबाजूला बघता बघता हे लक्षात आले के आयुष्य फारच क्षणभंगुर आहे, कोणत्याही क्षणी तुमचा ग्रंथ आटोपु शकतो. हा माझ्या आयुष्यातील पहिला न्यूनगंड.. माझे आयुष्य मला हवे तसे मी जगू शकत नाही.. मला माझ्या आयुष्यासाठी जगातल्या अनेक शक्यशक्यतांवर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात माझ्या आयुष्याचा मार्ग मी आखून घेईन तसाच राहील याची शाश्वती नाही. म्हणजेच मी कधीही कंफोर्ट झोन मध्ये राहू शकत नाही.
मग पुढे काय? मला तर माझ्या कंफोर्ट झोन मध्ये राहायचे आहे.
मग मी काय केले पाहिजे?
अश्या वेळेस बुद्ध मदतीला आला. तो म्हणतो जगातल्या सगळ्या समस्यांचे मूळ अपेक्षांमध्ये आहे. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला मान सन्मान, गाडी बायको मुले मिळाली पाहिजेत, नव्हे तर माझ्या मनाप्रमाणे मिळाली पाहिजेत. जिथे अपेक्षा आहे तिथे अपेक्षाभंग आहे आणि मग दुःख आहे किंवा कंफोर्ट झोन मधून बाहेर पडणे आहे.
मग याला पर्याय काय? अपेक्षा नसतील तर मग काम होणार कसे? वासना नसतील तर जग चालणार कसे? मग गीता आली सांगायला -
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन
मा कर्मफल हेतुर्भु मा ते संगोस्तु अकर्मणि
मा ते संगोस्तु अकर्मणि, म्हणजे मला हवे ते फळ मिळणार नसेल तर मग मी कार्य करायचेच नाही का? नाही, जगायचे असेल तर कर्म झालेच पाहिजे , पण ते ग्रेटर गुड साठी करा. तसं हे झिरपायला कठीण आहे , किंबहुना गीतेतील काही श्लोक जर नुसते एकेकटे अभ्यासले तरी संपूर्ण ज्ञान होईल. पण अर्थात मला काही ते ज्ञान झाले नाही, आणि सुरू झाला अकर्मकडे एक प्रवास. काही वेळा मी जिंकतो, काही वेळा अकर्म जिंकते. काही वेळा गीता जिंकते, काही वेळा अहंकार जिंकतो. काग येतो एक न्यूनगंड.
कारण तुम्ही चांगले माणूस असाल तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी सिद्धी तुमच्याकडे येईलच. पण तो प्रवास संपत नाही..
पुढचा टप्पा येतो तो वेगळेच प्रश्न घेऊन येतो. गीता म्हणते,
समम् पश्यन हि सर्वत्र, समवस्थितमीश्वरम
न हिनस्ति आत्मना आत्मानं ततो याति परां गतिम
म्हणजे जो सर्वत्र सम बुद्धीने पाहतो, किंवा सर्वत्र ईश्वरच पाहतो, तो कधीच स्वतःचा स्वतःच घात करत नाही, आणि तो मुक्त होतो..
आता स्वतःच स्वतःचा घात म्हणजे काय? मी कॉलेजला असताना रॅगिंग ला घाबरत असे, एक दिवस विचार आला, रॅगिंग करणारी मुले म्हणजे देखील मीच, आणि रॅगिंग होणारा म्हणजे देखील मीच, मग कोणी कोणाला घाबरायचे? झालं माझी भीती पळाली..
म्हणजे असे मला वाटले.. जेव्हा रॅगिंग व्हायची वेळ आली तेव्हा मात्र मी गजो मिथ्याचा आधार घेऊन घाबरलो होतो.. पण त्यातून हे कळलं की केवळ पुस्तकी पांडित्य उपयोगाचं नाही.
परवा बोलताना मी कोणाला तरी म्हणालो, मला तत्वज्ञान सांगायची गरज नाही, ते माझ्याकडे भरपूर आहे. अनुभवाच्या बाबतीत मात्र आपण कोरडे पाषाण आहोत.. म्हणजे अनुभव गाठीशी आहेत , पण ते पहिल्या पायरीवरचे.
सत्याचा एव्हढा मोठा डोंगर चढायचा, आणि वाटेतले सगळे मोह टाळायचे म्हणजे तितके सोपे काम नाही, रोज काहीतरी मोह समोर येतो आणि तो जाणवून देतो की बाबारे अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अहंकाराचा वारा अजून लागतंच आहे, क्रोधावर ताबा अजूनही येतं नाहीच आहे, आणि मोठेपणा तर मिळाला तर हवाच आहे.
पण सत्याचे ते दुरून होणारे दर्शन कायम हुरूप देते, काही नाही तरी मी तुझ्याबरोबर आहे असे परंपरा सांगते, आणि समाधी पेक्षा आनंदाकडे ओढा अधिक असल्यामुळे प्रवासाचा शीण पण जाणवत नाही.
माझा न्यूनगंड कधी जाईल माहीत नाही, कदाचित त्या न्यूनगंडातच माझा आनंद लपलेला आहे?
तुमचा आनंद कशात आहे?
(कदाचित क्रमशः)
वाचने
13920
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्रोटक पण विचारप्रवर्तक लेख!
वा,
धन्यवाद अथांग आकाश आणि कुमार
In reply to वा, by हेमंतकुमार
संपूर्ण समजला नाही लेख
+१
In reply to संपूर्ण समजला नाही लेख by उपयोजक
फारच सुरेख आणि प्रांजळ कथन अवडले
मस्त आहे!! जी अवस्था विकल्प
In reply to फारच सुरेख आणि प्रांजळ कथन अवडले by ज्ञानोबाचे पैजार
माझ्या अल्पाकलनाप्रमाणे
वरील वाक्य असे हवे होते का
In reply to माझ्या अल्पाकलनाप्रमाणे by उपयोजक
सारा अजून काड्या
In reply to माझ्या अल्पाकलनाप्रमाणे by उपयोजक
तुमचा आनंद कशात आहे?
इथे ज्याला न्यूनगंड म्हटले
In reply to तुमचा आनंद कशात आहे? by टर्मीनेटर
आनंद कशात आहे..
मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा
हॅ हॅ
In reply to मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा by सुबोध खरे
@ सुबोध खरे : आपले विचार प्रबोधक प्रतिसाद
In reply to मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा by सुबोध खरे
`मी बोटीवर होतो तेंव्हा वारा वहात होता 'हे आपले आवडते गाणे म्हणायचे टाळून लोकांचा वेळ वाचवला, तरीही यात लपलेला आपला चाणाक्षपणा आमच्या लक्षात आलाच. असे कायम नाविन्यशून्य प्रतिसाद लिहीतांना आपला हुरुप कायम राहतो हे एक `रटाळ आणि रुटीन आयुष्य सुद्धा' किती मजेत जगता येते हे आपण लोकांना दाखवण्यासाठी करत आहात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्यात सुद्धा आपली चिकाटीच दिसते असे नम्रपणे नमूद करतो.लष्करात आयुष्य रटाळ आणि रुटीन
In reply to @ सुबोध खरे : आपले विचार प्रबोधक प्रतिसाद by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : सध्या आपण लष्करात आहात काय ?
In reply to लष्करात आयुष्य रटाळ आणि रुटीन by सुबोध खरे
असं नाही काही..
In reply to मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा by सुबोध खरे
सकाळी केंव्हातरी मस्टर वरती
In reply to असं नाही काही.. by आनन्दा
असे म्हणतात कि
In reply to सकाळी केंव्हातरी मस्टर वरती by सुबोध खरे
हा हा
In reply to मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा by सुबोध खरे
शेम टू शेम ....
हम्म
हे करा
In reply to हम्म by सॅगी
हाहा
In reply to हे करा by आनन्दा
परवा बोलताना मी कोणाला तरी
सध्याच्या क्रिकेट फीवरमुळे ,
नशीब,
In reply to सध्याच्या क्रिकेट फीवरमुळे , by सिरुसेरि
किती नेमकेपणाने मांडलंय !!