Skip to main content

सोडुन गाव मी माझा ...

Published on 14/12/2007 - 04:16 प्रकाशित मुखपृष्ठ
सोडुन गाव मी माझा उडून आलो यैसा पश्चिम स्वप्न उराशी अन डोळ्या समोर पैसा प्रफुल्ल रान ते हिरवे अन २० घरांची वाडी विसरून पार ते गेलो भरधाव हाकतो गाडी बेधुंद रांगडा पाउस कस्तुरी गंध मातीचा ते हरवून बसलो सगले आवडे श्वास येसीचा त्या पारावरच्या गप्पा जोश्यांची सुन्दर पारू मिटउन टाकले सारे जोडीला डिस्को अन दारू ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी
लेखनविषय:

याद्या 8047

शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! ..१

Published on 14/12/2007 - 01:43 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, ख्याल गायन, ज्याला 'ख़याल गायन' असेही म्हटले जाते हे आपल्या भारतीय अभिजात संगीताचं, विशेष करून हिंदुस्थानी रागदारी संगीताचं एक प्रमूख अंग आहे. मैफलीत गाताना गवयाकडून ख़याल (यापुढे ख्याल) गायला जातो, तसाच तो श्रोत्यांकडून ऐकलाही जातो. आता ख्याल किंवा ख़याल म्हणजे विचार. 'आपका क्या ख़याल है', किंवा 'आपका क्या विचार है' हे संवाद आपण नेहमी ऐकतो. मग मंडळी, आता दोन मुख्य प्रश्न असे पडतात की, १) अभिजात संगीतातला 'ख्याल' म्हणजे काय? २) आणि जर तो 'ख्याल' असेल तर तो कसा मांडतात?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 18271

----- वारं --------

Published on 13/12/2007 - 21:12 प्रकाशित मुखपृष्ठ
खट्याळ वारं केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होत माझ मन मात्र उगाचच जळत होत * ब्लोग वर आहे
लेखनविषय:

याद्या 5074

दारू एके दारू... :)

Published on 13/12/2007 - 12:45 प्रकाशित मुखपृष्ठ
दारुचा पाढा! दारू एके दारू, बैठक झाली सुरू दारू दुणे ग्लास, मजा येई खास! दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन! दारू चोक बियर, टाका पुढचा गियर! दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला! :) एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे. आपला, (ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.
लेखनविषय:

याद्या 10100

विसरून जायचे तुला

Published on 13/12/2007 - 03:30 प्रकाशित मुखपृष्ठ
*(शुध्दलेखनाच्या चुका बद्दल माफी) विसरून जायचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेच घेतो कळते माला ही सारे साराच भास आहे समजाऊ कसे मनाला कसली त्या आस आहे डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविन भासते गे आयुष्य रेघ मोठी विसरून जायाचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेचा घेतो....

याद्या 6546

नळ आणि सुंदरी

Published on 13/12/2007 - 02:35 प्रकाशित मुखपृष्ठ
नळावरच्या लायनीत काल जावच लागलं पुरषासारखा पुरुष असुन .. त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी र्‍हाली तीचं करुन करुन माय कमरंत वाकली आज मग बाबुला उदबत्या विकाया धाडलं आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं इतक्यात ती समोरुन जणू तरंगत आली... मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता.. सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत... हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळलं व्हतं... पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता.. काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला हो
लेखनविषय:

याद्या 7582
Taxonomy upgrade extras

घरटे..

Published on 13/12/2007 - 00:46 प्रकाशित मुखपृष्ठ
घर ते माझे बालपणीचे रंगबिरंगी आठवणीचे.. आईबाबांच्या पंखाखाली मांडलेल्या भातुकलीचे.. प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी वेल जुईची बहरली होती.. सैरवैर त्या अंगणी माझी इवली पाऊले नाचली होती.. झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.. एकेक पायरी यशाची ती चढले ज्याच्या बळावरी.. घर ते माझे उभे पाठीशी उनपाऊस घेत शिरी.. कधी न वाटे मला एकटे घर ते माझे सखा सोबती.. कितिक गुपिते दोघांमधली जपून त्याने ठेवली होती... जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. त्या मायेच्या आठवणीने उर दाटून येई कोण.. घरट्यावरूनी
लेखनविषय:

याद्या 10780
Taxonomy upgrade extras

शहार...

Published on 12/12/2007 - 20:40 प्रकाशित मुखपृष्ठ
नको जगाची पर्वा, हसू द्या त्यांना... --गुंडोपंतांमुळे स्फूर्ती आलेला एक कवडा...सा! शहार!! मनाच्या मैदानावरल्या मोहोरलेल्या नंदनवनात शब्दांचे ताटवे डोकावतायत फुलून डोलायच्या तयारीत... वा-याच्या ओंजळीतून ओसंडत्या सुगंधासोबत सांडलेले शब्द झेलायला टपली कभिन्न कुत्री मोकाट... केसाळलेल्या शेपट्या सावरत डोळे लावून हिरवे हावरट कवितांच्या रोपट्यांकडे वखवखून लाळ घोटतायत... लचके तोडायला कधीतरी सापडतील दातात कोमेजलेल्या शब्दांची लोंबकळती लक्तरं समीक्षकाच्या हेकट थाटात... कवींचा थवा आता शहारलाय ताटव्यांचं चित्तपण था-यावर नाही...
लेखनविषय:

याद्या 2859

विनोद

Published on 12/12/2007 - 13:17 प्रकाशित मुखपृष्ठ
एक गाव असत. त्या गावाच्या बाजूलाच एक जंगल असत. त्या जंगलात एक वाघ राहत असतो. तो वाघ रोज रात्री गावात येऊन एका बकरीला खात असतो, तसेच गावात हिंसा माजवत असतो. मग गावातले लोक एक सभा घेतात आणि ठरवतात की त्या वाघाला मारायचे... पण मारणार कोण??? मग एक शिकारी येतो तो म्हणतो मी त्या वाघाला मारीन पण मी मागेल ते तुम्ही मला द्यायचे. गावकरी खुश होतात आणि ठरवतात की तो जे मागेल ते देवूया, वाघ मेल्याशी कारण........ तो शिकारी म्हणतो आज रात्री मी त्या वाघाला मारायला जंगलात जाणार. रात्री एक वाजेपर्यंत तुम्हाला 3 गोळयांचा आवाज येईल .
लेखनविषय:

याद्या 18073

माहिती हवी आहे

Published on 11/12/2007 - 23:33 प्रकाशित मुखपृष्ठ
कृपया या दुव्यावरील बातमी वाचा या बातमीत नमूद केल्यानुसार पुण्यात झालेल्या या परिषदेत कोणी उपस्थित राहिले असेल, तर तेथे कोणत्या विषयांवर चर्चा / प्रात्यक्षिके / मार्गदर्शन इ. झाले, याबाबत माहिती / सविस्तर वृत्तांत हवी / हवा आहे. आगाऊ धन्यवाद.

याद्या 3170