Skip to main content

जोधा अकबर

लेखक कोलबेर
मंगळवार, 18/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो.

मजेशीर वाक्ये

लेखक सचिन
सोमवार, 17/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"मनस्वी" यांच्या "मजेशीर नावे" मधे खूपच मजा आली... तशीच काही मजेशीर वाक्ये : १. नातू, त्या ना. तु. नातूंचा नातू ना तू ? २. पण जी पणजीला राहाते, ती पणजी माझी पणजी नाही ! किंवा उलटसुलट वाली १. तो गजानन जागतो २. तो कवी डालडा विकतो ३. तो कवी सामोसा विकतो ४. भाऊ तळ्यात उभा ५. भाऊ शिपायापाशी उभा ६. रामाला भाला मारा ७. चिमा काय कामाची अशी अनेक आपल्याला माहीत असतील. संग्रह करूया का ?

"नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"च्या निमित्ताने

सोमवार, 17/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री "नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"हा यंदाचा ऑस्करविजेता सिनेमा पाहिला. चित्रपट परिणामकारक वाटला असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नकोच. (उलट "यात तुम्ही काय नवीन सांगताय् राव ! " अशी कुणी खिल्ली उडवेल ; आणि ती योग्यच ठरेल ! असो. ) थोडी चित्रपटाची ओळख करून देतो. पुढील परिच्छेदामधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये. चित्रपट १९८० सालातील पश्चिम टेक्सास मधे घडतो. अमली पदार्थाच्या व्यापारातील एका मेक्सिकन गॅंगमधे एका व्यवहारामधे भीषण हिंसा घडलेली आहे.

एक गाणे॑

सोमवार, 17/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक गाणे बरेच शोधून राह्यलोय पण नाही मिळत. कोणी मदत करेल काय? गाणे - 'अभिनेत्री' (१९७०) चित्रपटातले 'ओ घटा सावरी..थोडी थोडी बावरी..' (लक्ष्मीका॑त-प्यारेलाल) मी पुढील वेबसाईटवर शोधले..esnips, cooltoad, mp3hungama, onesmartclick etc

मिसळपावचे वॉलपेपर

सोमवार, 17/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावकरिता बनवलेले हे वॉलपेपर.आपणही यात हातभार लावू शकता. कृपया आपणा कोणाकडे स्वतःच्या मालकीची असलेली छायाचित्रे(निसर्ग,प्राणी,पक्षी वगैरे) असल्यास व ती मिसळपावच्या वॉलपेपरकरिता वापवरावयास द्यायची असल्यास vinayak(dot)anivase(at)yahoo(dot)com या पत्त्यावर विरोपाने पाठवा.

चाळ ही हदरून जाते

सोमवार, 17/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना चांदणे शिंपित जाशी चाळ ही हदरून जाते चालता तू चंचले देह हा हलवीत जाशी हालती पाळेमुळे वाटते पाहून तिजला ही कटी की कंबरा काल थोडीशी पळाली दार अमुचे मोडिले वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले

पांढरा रस्सा

लेखक विजुभाऊ
सोमवार, 17/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे उल्लेख जरी आले तरी काही पुस्तके आठवतात्.किंवा काही लेखकांचे उल्लेख आले तरी काही आठ्वणी ताज्या होतात्.काही उत्सुकता चाळवल्या जातात... उदा: त्याने घोडा झाडाला बांधला आणि दश्म्या सोडल्या हे वाक्य हम्खास गुरुनाथ नाइकांच्या गोलंदाज कथे मधे यायच्या. तसेच बाबा कदमांच्या कादंबरीत " पांढरा रस्सा " हा हमखास असतोच.त्यांच्या कोणत्याही कादंबरीचा तो अपरीहार्य भागच जणू. दश्म्या माहीत होत्या पण अस्सल पांढरा रस्सा मी कोल्हापूर ला जाउन चाखला. मला "पांढरा रस्सा" ची पाक क्रुती हवी आहे.
Taxonomy upgrade extras

महत्वाचे..मदत हवी आहे

सोमवार, 17/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या एच.डी.एफ.सी बँकेकडून आत्ताच एक विरोप आला. तो विरोप जसाच्या तसा खाली देत आहे. इंग्रजीत आहे पण कृपया मह्त्वाचा आहे म्हणून तसदीबदल क्षमस्व.
Important Notice : In the last few weeks, our Online Banking Security team has observed multiple logons on your Internet Banking Account, from different Blacklisted IP's, therefore been blocked, to prevent further unauthorized access for your safety.