महत्वाचे..मदत हवी आहे
मला माझ्या एच.डी.एफ.सी बँकेकडून आत्ताच एक विरोप आला. तो विरोप जसाच्या तसा खाली देत आहे. इंग्रजीत आहे पण कृपया मह्त्वाचा आहे म्हणून तसदीबदल क्षमस्व.
Important Notice : In the last few weeks, our Online Banking Security team has observed multiple logons on your Internet Banking Account, from different Blacklisted IP's, therefore been blocked, to prevent further unauthorized access for your safety. we have decided to put an extra verification process to ensure your identity and your Internet Banking Account Security. Click on for your NetBanking Online Access. http://www.hdfcbank.com/1/2/securityaccess/precaution/internet-banking/ Security Advisory, HDFC Online Banking *Important* Please update your records on or before 48 hours, a failure to update your records will result in a temporary hold on your funds - it's one more way that HDFC makes your online banking experience better.. @2008 All Rights Reservedहा विरोप मिळाल्यावर पहिली प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मी त्यातल्या दिलेल्या दुव्यावर टिचकी मारली. आता मी नेहमी ह्या दुव्यावरून व्यवहार करताना हा दुवा वापरते. आणि या आलेल्या दुव्यावर टीचकी मारली असता जे पान उघडले त्याचे ऎड्रेसबार मध्ये असलेले युआराय(URI/URL) पाहून मला काहीतरी संशयास्पद असल्याची भावना निर्माण झाली.माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही बॅंकेची साइट https:// ने सुरू होते. तसे इथे नव्हते. शिवाय १२८ बिट एन्क्रिप्शन म्हणून न्याहाळकाच्या स्टेट्स बार मध्ये कुलुपाची खूण दिसते तशी ती या दुव्याच्या पानावर नव्हती. कोणी सांगू शकेल का याबद्दल अधिक काही ? ता.क. : हा विरोप ज्या पत्त्यावर आला तो मी दोन दिवसापुर्वीच बॅंकेकडे फोन मार्फत नोंदवला होता. पण अजूनही तो बदल नोंदवला गेलेला दिसत नाहीये. त्या बदलाचा या दुव्याशी काही दुवा असू शकतो का ?
वाचने
5869
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
ताबडतोब हे करा
माझ्या
In reply to माझ्या by धमाल मुलगा
फिशि॑ग
स्वतः बँकेत जाउन
सहकार्याक
अशा विरोपांकडे
शुभकामना..
हे नक्की करा.
हा प्रकार
In reply to हा प्रकार by हर्शल
सायबरसेल
फिशि॑ग