Skip to main content

विज्ञान लेखक सर आर्थर क्‍लार्क यांचे निधन

लेखक सागर
बुधवार, 19/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एक ब्रेकींग न्यूज पाहिली. विज्ञान लेखक सर आर्थर क्‍लार्क यांचे निधन स्त्रोत : http://www.esakal.com/esakal/03192008/TajyabatmyaInternational342E13C29… ------------------------------------------------------------------ नवी दिल्ली - अवकाश आणि विज्ञान विषयांवर प्रदीर्घ काळ लेखन करणारे जागतिक किर्तीचे लेखक सर आर्थर सी. क्‍लार्क यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

प्रार्थना..

बुधवार, 19/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच पुण्याला अण्णांची ख्यालीखुशाली विचारण्याकरता फोन केला असता अण्णांना पुण्याच्या 'सह्याद्री' रुग्णालयात दाखल केले असल्याचे कळले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असेही समजले. डॉक्टरांच्या प्रयत्नास यश येवो व हिंदुस्थानी अभिजात संगीताचे अध्वर्यू, अनभिषिक्त सम्राट, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम वाटो, हीच संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे विधात्याच्या चरणी प्रार्थना! तात्या.

उपक्रम

लेखक हर्शल
बुधवार, 19/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हर्शल उपक्रम ह्या मराथि ब्लोगबद्दल माहिति किन्वा त्या साइटचा पत्ता मिळेल का?

मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात

लेखक विजुभाऊ
बुधवार, 19/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करुया असा एक विचार प्रवाह येतोय. पुण्याच्या मि पा संमेलनात या बाबत उहापोह होइलच्..तुम्हाला काय वाटते.? या बाबत काय / कसे करता येईल सांगा हे साहीत्य खरोखर्च मिसळ पाव प्रकारचे आहे...पोटही भरते/ जिभेचे चोचले ही होतात / वेगवेगळ्या स्वरूपात मिळु शकते. कथा/ काव्य/ विडंबन / खादाडी / सल्ले/माहीती/चारोळ्या/ आरोळ्या सगळे प्रकार आहेत .......................साहीत्य मिसळ चरणारा साहीत्य खादाड विजुभाऊ.

"झेंडूची फुले" परंपरा

मंगळवार, 18/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)यांचा "झेंडूची फुले" हा विडंबन काव्य संग्रह १९२५ साली प्रकाशित झाला.त्यानंतर अनेक कवींनी विडंबन कविता लिहिल्या आहेत.प्राचार्य राम डोके यांच्या "शतकातील विडंबन काव्य" ह्या पुस्तकात त्यापैकी काहींचा परामर्श घेण्यात आला आहे. "झेंडूची फुले" नंतर फारच मोजके विडंबन काव्य संग्रह आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत.विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा.

((कुणि जाल का, सांगाल का..))

मंगळवार, 18/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना कुणि जाल का, सांगाल का..आणि कवी चतुरंगशेठ यांचे सुरेख विडंबन..(कुणि जाल का, सांगाल का..) कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कविजना ?

स्पिन अ यार्न

लेखक विजुभाऊ
मंगळवार, 18/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्पिन अ यार्न हा ईंग्लीश मधला धमाल प्रकार आहे.यात एक कथा सूत्र घेतले जाते आणि वेगळे वेगळे लोक त्या कथेत स्वतः रंग भरतात्.सूत्रधार कथेला मार्गावर आणण्याचे काम करत असतो......( एकता कपूर असेच करत असावी) मला वाटते यात धमाल्या. सगळे डॉन , डांबीस काका प्राजु तात्या वरदा सगळे विवेक इनोबा सगळे डॉ. सर्वाना जोरदार वाव आहे..आपण्ही असा एखादा प्रयोग करुया.पुणेरी,कोल्हापुरी,मालवणी ,गोयची कोकणी ,वैदर्भी ,नागपुरी भाषेची मस्त मिसळ चालेल चला रेडी का? करू सुरुवात?

श्वानराजाधिराज

मंगळवार, 18/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
pashmina लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली आहे. त्यांना पश्मीना हे नाव देण्यात आले आहे. हे कुत्रे अतिशय लढवय्ये असून त्यांची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा उत्तम आहे. मात्र ते महाग आहेत. पण मूळ कुत्रे ज्यांचा संकर करून ही जात निर्माण केली गेली ते धनगर कुत्र्यांमधून शोधून काढण्यात आले होते.