Skip to main content

कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी :कामाचा ताण :एक आसन

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 27/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी...........कामाचे ओझे जास्त असल्यास खालील आसनाचा प्रयोग करुन पहा....कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल १) प्रथम टेबलावरील काम थोडे बाजुला करावे... २) ते जमत नसल्यास तुमची खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्या.. ३) डोळे मिटा..हात डोक्या मागे घ्या ४) दीर्घ श्वास घ्या ५) श्वास हळू सोडा ( असे पाच वेळा करा) ६) पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या ( डोळे बंदच राहु द्या ७) या वेळी श्वास जोरात सोडा ८) श्वास सोडताना हात झटका ९) हात झटकताना तेव्हढ्याच त्वेशाने पुट्पुटा .............( खड्ड्यात जाउदे कंपनी.....) कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल सू्: हे आसन वरीष्ठ मुकदामासमोर करु नये........

बीटाची कोशिंबीर

लेखक मनस्वी यांनी गुरुवार, 27/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : मध्यम आकाराचे बीट - २ मध्यम आकाराचा बटाटा - १ दाण्याचा कूट - १ चमचा (optional) दही - ८-१० चमचे साखर - १/२ चमचा कोथिंबीर मीठ फोडणीसाठी - तूप - २-3 चमचे जिरे - १/२ चमचा हिरवी मिरची - १ बारीक चिरून कृती : (१) बीट आणि बटाटा कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. साले काढून एकत्र कुस्करावे. (२) त्यात दाण्याचा कूट, दही, कोथिंबीर, साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकसारखे करावे. (३) दुसरीकडे कढईत तूप, जिरे, हिरवी मिरची यांची फोडणी करावी. (४) फोडणी थोडी थंड झाली की मिश्रणावर ओतून मिश्रण परत एकसारखे करावे. मनस्वी
Taxonomy upgrade extras

शिवरायांचे "८" वावे रूप

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 27/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक वाचकही , "सप्रे"म नमस्कार ! या लेखाचं शिर्षक वाचून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल्.काहींच्या मनात असंही आलं असेल की आजच्या या संगणक युगात ई-मेल मधे लिहितात तसंच हे पण काही शॉर्ट कट वगैरे आहे की काय? पण माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांना मी अत्यंत विनम्रपणे हे सांगू इच्छितो की "या शिर्षकात वापरलेला"८" ह्या आकड्याला शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्व आहे" हे कळावे म्हणूनच हा एव्हढा ऊहापोह !

ऑपेरा ब्राउजर

लेखक गंधार यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन फक्त इन्टरनेट एक्स्प्लोरर सपोर्ट करतो का? मला मिपावर ऑपेरा ब्राऊजरमध्ये टाईप करायला (अगदी लॉगिन करतानाही) बर्याच अडचणी येतात. वाचायला मात्र काही अडचण नाही. कोणाला याबाबत काही माहिती आहे का?

संडे स्पेशल (खांडवी)

लेखक स्वाती राजेश यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खांडवी (हा एक कोकणातील खाद्यप्रकार आहे.) साहित्यः २ वाट्या तांदळाचा रवा (इडली साठी आपण विकत आणतो तो रवा घ्यावा) २ वाट्या भरून गुळ ४ वाट्या पाणी १/४ टी.स्पून मीठ १ टे.स्पून तेल १/२ टी.स्पून वेलची पूड १/२ वाटी ओल्या नारळाचा चव १ मोठा तुकडा आलं किसून २ टी.स्पून साजुक तूप ताटाला लावून घ्यावे. १.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो गार होऊ द्यावा. २.पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे.
Taxonomy upgrade extras

विडंबन सम्राट

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मनोमिसळवर विडंबनाची लाट आली आहे (ज्यात आम्ही वाहून गेलेलो आहोत, नाकातोंडात पाणी गेल्याने हातपाय झाडतोय कसेतरी). पण सगळ्या विडंबनकारांचा गुरु आणि माझा आवडता एक आणि एकच. जसपाल भट्टी. ज्याच्या फ्लॉप शो, उल्टा पुल्टा ने एकेकाळी लोकांना वेड लावले होते.

दररोज सकाळी सायंकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी दुसर्‍या दिवसापासुनच

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या सरानी (डॉ. अरोरा ) एक प्रार्थना शिकवली होती. त्यावेळी त्यानी मला सांगितले होते की ही प्रार्थना तू रोज दोनदा अर्थ लक्षात घेउन म्हंटली तर तू सर्व त्रासांमधुन मुक्त होशील आनन्दी होशील्...मला त्याचा अनुभव आला आहे.

अकबर द ग्रेट.....मग राणा प्रताप कोण?......गुरु गोविंद सिंग कोण? देशद्रोही?

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
चित्तोड चा राणा प्रताप अकबराकडुन पराभुत झाला. आयुष्यभर तो परागंदा होता.रानोमाळ भटकत त्याने स्वतन्त्र चित्तोड चे लढाइ चालु ठेवली जुलुमी सत्तेविरुद्ध त्यांचा लढा होता..... गुरु गोविंद सिंग ज्याच्याशी लढले....ज्याच्या जुलुमी सत्तेविरुद्ध ते लढले तो अकबर द ग्रेट....... मग राणा प्रताप कोण? गुरु गोविंद सिंग कोण? देशद्रोही?

धुन्दी - विडंबनाचा एक प्रयत्न

लेखक चेतन यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
केशवसुमरांपासुन प्रेरणा घेवुन माझा हा एक विडंबनचा प्रयत्न मूळ लेखन : "पाउस पडुन गेल्यावर" (गारवा) पाउस ही संकल्पना बदलुन धुन्दि (अर्थात दारुची) ही संकल्पना धरुन हा विडंबनचा प्रयत्न धुन्दी डोक्यात गेल्यावर, तन हलके हलके झाले स्वर्गाच्या वाटेवरती, नभात तरंगत गेले बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, हे विचार मस्त मोहाचे मेंदुला डावलून आल्या, त्या सुप्त अंनंत इच्छांचे सोडुन लाज सारी, पाउले ही लडखडति धुन्दी डोक्यात गेल्यावर, त्या ओजाड रस्त्यांवरती धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी भ्रांत चित्त हरपले

उघड "बार" देवा आता , उघड "बार" देवा

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
देहाची तिजोरी.....मूळ गीताचे विडंबन्.....उदय सप्रे-ठाणे दे हाती तू थोडी शक्ती नाही देवां उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा पिते रोज डोळे मिटुनी जात बेवड्यांची तनी थरथराटापायी भिती सांडण्याची "सरावल्या" हातांनाही कंप का सुटांवा? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा आर्त जणू गुत्त्यांवरची बोंब ही "टपोरी" "आपुलीच" प्रत्येक वाटे पाजणारी पोरी "सुष्ट" सज्जनांच्या ओठी का पडे हा मेवां? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा उजेडात बायको बघते अंधारात बाप कसे जावे यांच्या पोटी एका पेग चे माप? अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी तोल सावरावा? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा
Taxonomy upgrade extras