Skip to main content

जाईन विचारीत रानफुला...

लेखक कोलबेर यांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
...नाही नाही कोणत्याही गाण्याचे रसग्रहण नाही हे! तेवढी (चौफेर) प्रतिभा आमच्या असती तर आम्ही 'विसोबा खेचर' नावाने नसते का लिहिले? :) तेव्हा आता तुमच्या उपसलेल्या तलवारी म्यान करा आणि शांतपणे ही प्रकाशचित्रे बघा... नुकतेच येशु ख्रिस्ताची पुण्यतीथी जोडून आलेल्या विकांताला थोडीशी भटकंती केली आणि वसंत आगमना बरोबर येणारी हे रानफुले टिपाविशी वाटली..

मांचुरियन आणि शेजवान !

लेखक मीनल यांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा व्हेज मांचुरियन आणि शेजवान फ्राईड राईसचा भाग्यश्रीने पाठवलेला फोटो पाहून ह्या लेखाला प्रेरणा मिळाली. चीनच्या उत्तरेकडला एक पदार्थ तर एक दक्षिणेकडचा. म्हणजे दिल्ली राईस आणि सांबार यासारखा. मंगोलिया हा चीनचा उत्तरेकडला भाग.मुख्यत्वे Noprth East side.मांचू हे तिथले रहिवाशी. त्यांच्याशी संबंधित म्हणजे मांचुरिअन.म्हणजे मांचुरियन फूड ,कपडे ,कार्पेट्स्,बूट ,टोप्या वगैरे. मांचुरियन झाले विशेषण.`इंडिअन` सारखे. फार उत्तरेकडला भाग हा.तिथे हिवाळ्यात खूप खूप थंडी असते .त्यामुळे थंडीचा बचाव करण्यासाठी कच्च्या मांसाचे अन्न खाल्ले जाते.मांस कमी शिजवून क्रंची ठेवलेले असते .तसेच भाज्या ,फळे या

नाकावर झाली ही सर्दी बहाल

लेखक मीनल यांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मैत्रिणीला हिवाळ्यात खूप सर्दी होते. सोबतीला ताप ,खोकला ही असतो कधी कधी. तिच्या त्या त्रासाचे वर्णन ऐकून मला चेष्टा कराविशी वाटली . ती देते आहे ह्या विडंबनात. मूळ गाण्याबद्दल लिहायची जरूरी वाटत नाही. नाकावर झाली ही सर्दी बहाल नाकावर झाली ही सर्दी बहाल , जरा सोडून जा हो ,मोठा रूमाल ॥ धॄ॥ औषधाची गोळी ठेऊन जिव्हेवरती , ती कडू रिचविते, पाकिटातली पुरती, डोक दुखाव, नाक गळाव ,पुशित रहाव खुशाल ॥१॥ फुरफुर अशी की ओढ म्हणे अन सोड, भरे इंच इंच की आत येतसे फोड, घसा जाळिता कसा ताप ही पसरी काया हाल ॥२॥ जाडे जाडे पांघरूण घेता गरम ते बाई, सरदीचा ओसरला रोग तो सर्वा ठायी ,

इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 02/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल. (तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले मेहता प्रकाशन, पुणे ) त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्‍या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.

मोहरवणी..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 02/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्‍या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक! मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्‍याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्‍यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे!

.............एक गूढ

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 02/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो.आम्हाला आता तुमच्या येउन चांगली ६ पेक्षा जास्तवर्षे झाली. तुमच्यातलेच होउन आम्ही आलो.तुमच्या जिवनाचा एक भाग झालो. तुमचे बरेचसे कार्यक्रम आमच्या वर अवलंबुन असतात हे ठौक आहे आम्हाला. मनोरन्जन आणि ऍडीक्षन यातली सीमा रेषा अस्पष्ट आहे हे ओळखून आम्ही सुरुवात केली.एका घरातल्या कहाणीने. त्याला जोड मिळाली सासुबाईची.

मिसळाख्यान

लेखक शैलेश यांनी बुधवार, 02/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय मिसळपावा । तूझी किर्ती अमर्यादा । गुणानुक्रम तुझे वर्णीता । विद्वज्जनही थकती ।। १ ।। टोपीकरांचा* प्रभाव पडूनी । कैसे कैसे जन वर्तती । चिंताक्रांतले थोर ज्ञानी । अंतराळी सभेसी ।। २ ।। इतालियन चायनीज भक्षती । नटमोग-या मालिका बघती । आणिक मिरवती फ्याशनी । तयांसी शहाणे करावे ।। ३ ।। मजसी तेथ पाचारण करोनी । मिसळीचे गुण वर्णुनी । वेवस्थित काव्य रचोनी । मिसळपावी प्रकाशना सांगितले ।। ४ ।। त्यांची आज्ञा शिरोधर । मी तो केवळ आज्ञाकार । कवितेचा गंधही ना ठाव । परि प्रयत्न करीतो ।। ५ ।। अहो ही मिसळ अलौकिक । तेणे साधली ओवी मज । आणि श्रोते आपण विद्वान । म्हणूनी धारिष्ट्य करीतो ।। ६ ।। अंतःकरण करावे कुशाग
Taxonomy upgrade extras