Skip to main content

कॅलिडोस्कोप...

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 24/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
विजभाऊंनी धमालच्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यातील एक एक पात्रे डोळ्यासमोरून तरळून गेली. इथे मिसळपाव वर काही सदस्यच एकमेकांना प्रत्यक्ष ओळखतात. पण काही नुसतीच कल्पना करतात. कोण कसा असेल? त्याच्या लिखाणावरून, दिलेल्या प्रतिक्रीयेवरून आपण त्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणतो. त्यातील एक गंमत म्हणजे त्यांची मि.पा. वर असलेली नावे. काय एक-एक भन्नाट आहेत. त्यावरून सुद्धा मनात एक त्याची छबी उमटते...कि हा असा असेल, ही अशी असेल.... तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल ना? मग लिहा ना? कृपया, कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही.

~विजुभाऊ द-रसिकलाल 'चहा' आणि व्यंकटराव ह्या दोघांना....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा~

लेखक धमाल मुलगा यांनी गुरुवार, 24/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आपले विजुभाऊ, द-रसिकलाल, 'चहा'टाळ, मिपाच्या सुगरण ताईलोकांच्या अबाधित पाककृती विभागात घूसखोरी करुन त्यांच्यातील एक 'सुगरण्या' म्हणून वावरणारे, आमच्यासारख्या पोरासोरांमध्ये आमच्यापेक्षासुध्दा जास्त दंगा दंगा करणारे असा हा हरहुन्नरी 'मराठी शाळेत शिकलेला गुजराथी ख्रिश्चन' विजुभाऊ शॉ ! आज विजुभाऊंचा वाढदिवस! विजुभाऊ......वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!! अहो काय योगायोग पाहा. आज व्यंकटराव ह्यांचा पण वाढदिवस आहे. तेव्हा त्यांनाही खूप खूप शुभेच्छा!

* सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा *

लेखक मनस्वी यांनी गुरुवार, 24/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
* सचिनला ३५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा *
सचिन उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्या व्यतिरिक्त सचिनबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असल्यास जसे काही किस्से / त्याचा स्वभाव / आठवणी असल्यास कृपया इथे शेअर कराव्यात.

अपयशाचे व्यवस्थापन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.

औरंगझेब - एक (बर)बादशहा !

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 23/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी : "औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर" वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला !

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 23/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला आहे आणि कला, क्रीडा क्षेत्राला बरे दिवस यायला लागले आहेत..गल्लोगल्ली निघालेले नृत्य वर्ग, वाद्यवृंद, नाट्यसंस्था , मॊडेलिंग एजन्सीज यातून नक्कलवाले अभिनेते, किंचित गायक, अर्धेमुर्धे नर्तक, मॊडेल तयार होत आहेत पण या सार्‍यांची तक्रार एकच आहे की व्यासपीठ उपलब्ध होत नाहीये.....शिवाय काही छंदवाली मंडळी आहेत, काही व्यावसायिक मंडळी आहेत , त्यांना त्यांच्या व्यावसायिक कलेचे प्रदर्शन मांडायला व्यासपीठ नाहीये...