Skip to main content

मला मनाचे पटले नाही

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शनिवार, 26/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला मनाचे पटले नाही वाद आमचे मिटले नाही मला नेहमी ऐकू येते मनातही जे म्हटले नाही राग तुला याचाच असावा नाव तुझे पुटपुटले नाही मला भेटल्या जखमा सुंदर कुणात मन गुरफटले नाही? अभिलाषेचे वादळ आले पाय काधी लटपटले नाही फक्त ठेवले नावा पुरते नाते मी विस्कटले नाही शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही तुझे एवढे कर्ज उरावर या श्वासांनी फिटले नाही नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही अनिरुद्ध अभ्यंकर

मधु.....

लेखक वर्षा यांनी शनिवार, 26/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
या बाईसाहेबांना मूर्तिमंत कागदावर उतरवणं निव्वळ कठीण आहे! तिचा सर्वात सुंदर क्लोज-अप मिळवण्यासाठी प्रत्येक शॉटला पॉज घेत घेत मुगल-ए-आजम अथ पासून इतिपर्यंत मनसोक्त चाळला. सर्वात सुंदर माझ्या मते ती 'मोहे पनघट पे' च्या 'नैनोंसे जादू किया' च्या या दृष्यात दिसल्ये. :) Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil -वर्षा
Taxonomy upgrade extras

एका माणसाची कथा....

लेखक वाटाड्या... यांनी शनिवार, 26/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एका माणसाची कथा.... मिपावरचा पहीलाच प्रयत्न...प्रचंड धाकधुक चालू आहे. आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा. आज मी तुम्हाला एका माणसाची कथा सांगणार आहे. विलक्षण स्वाभिमानी, करारी, निर्मळ, प्रामाणिक आणि प्रसंगी रागीट सुद्धा. मी असा एक माणुस पाहिलाय जो अतिशय तत्त्वशील, बुद्धीमान पण तरीही प्रसिद्धी पासून प्रयत्नपुर्वक दूर. ========================================================================================== स्वातंत्र्यापुर्वीचा काळ. कोल्हापुर पासून जवळ जवळ ३०/४० कि.मी. आत चिकोडी जिल्ह्यात संकेश्वर नावाचं एक गाव आहे. तिथे पुर्वी एक अण्णा सरंजारदार होते.

मित्राच्या मजेशीर गोष्टी

लेखक शितल यांनी शनिवार, 26/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र आहे, तो ज्या लग्ना स॑ब॑धी कार्यक्रमात जाई तेथे काही तरी गडबड ही निश्चित होते. त्यातील काही मजेशीर गोष्टी. एकदा त्याच्या मोठ्या भावाला मुलगी पहायला माझा मित्र, त्याचा भाऊ, आणि त्याचे आई,वडिल असे सगळे गेले, मुलगी अतिशय देखणी, माझ्या मित्राचे तर डोळे दिपलेच .

संवयी

लेखक हेरंब यांनी शुक्रवार, 25/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल. सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर.

मिपा, पुणे कट्टा...अचानक!!!

लेखक धमाल मुलगा यांनी शुक्रवार, 25/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
|| ॐ मिसळाय नमः|| ॐ मिसळपावाय नमः|| ॐ वाडेश्वरी मिसळपावाय नमः||
मंडळी, तुम्हा सर्वांना २२ मार्च रोजी झालेला पुणे कट्ट्याचा कार्यक्रम आठवत असेलच, नाही का? ज्यांना येणं जमलं त्यांना तर नक्कीच.

चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक?

लेखक अनामिका यांनी शुक्रवार, 25/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आय पी एल ने भरवलेल्या २० षटकांच्या चेंडुफळीच्या सामन्यांत प्रत्येक षटकार आणि चौकारावर तसेच संघाने मिळावलेल्या खेळाडुंच्या बळींवर अंगप्रदर्शन करत नाचणार्‍या चिअर गर्ल्सची खरच कुठ्ल्याही खेळामधे निदान भारतात तरी गरज आहे का? नाही !असे निदान माझे तरी मत . खेळाडुंची खरेदी विक्री देखिल गैरच ,पण निदान त्यामधे अगदी हालाखीच्या परिस्थितितुन आलेल्या गुणी खेळाडुंना आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यास हातभार लागतो आहे हीच काय ती जमेची बाजु. पण खेळाडु व प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्याच्या नावाखाली तो़कड्या कपड्यात नाचुन (थैमान घालुन) पुर्ण क्रिडांगण डोक्यावर घेणार्‍या चिअर गर्ल्सचा खेळामधिल वापर खरच अनावश्यक