Skip to main content

प्रशस्तपाद भाष्य

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शुक्रवार, 12/02/2021 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार दोस्तांनोतुमचा माझ्या ब्लॉग्सना उदंड प्रतिसाद असतो, प्रेम असते (प्रेम वगैरे विषयांवर न लिहिताही! ) याबद्दल आभारी आहे.  आईन्स्टाईन वगैरे संबंधी गोष्टी लिहायला सुरुवात झाल्यानंतर आता सलग पणे १९-२०व्या शतकातल्या फिजिक्सविषयी लिहायला लाईन लागेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही.

कविता - कविराज

लेखक Arun V.Deshpande यांनी गुरुवार, 11/02/2021 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षरछंद वृत्त- देवद्वार ------------------------------- (६-६-६-४) कविराज --------------------- कविता लेखन असोशी मनास करिते प्रयास लेखनाचा    ।। अभ्यास करावा करावे वाचन त्यावरी चिंतन गरजेचे         ।। सांगणारे कुणी सोबत असेल लेखन वाटेल सुलभसे         ।। प्रतिभा प्रतिमा विश्वची आगळे असती वेगळे कविराज        ।। -------------------------------- कविता -कविराज -अरुण वि.देशपांडे -पुणे 9850177342 ----------------------------------- ----------------------------------
काव्यरस

आधार कार्ड

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 11/02/2021 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
मे भी एक बाप हूँ........ वो था तो कोई गम न था। नही है तो आँखे नम होती है। उसकी यादोमे अक्सर राते गमगीन होती है। नसीहत जो कभी मुसीबत लगती थी। आज वही मुसीबत मे नसीहत लगती है। रोकता था टोकता था। अक्सर मन सोचता था ये ऐसा क्युं है। आज नही है तो दिल उसीको खोजता क्युं है। बरगद का साया था। हर राझ सिखाया था। परवरीश मे जिसने अपना तन मन धन गवांया था। था वो तो हर मुकाम मुक्कमल हुआ। जिंदगी के हर पादान पर पहाड सा खडा हुआ। बाप बनके देखो बाप क्या चिज होती है। उसकी यादोमे आज भी आँखे नम होती है। मै भी एक बाप हूँ। आज भी कमी महसुस होती है। कभी अकेला होता हूँ तो अटलजी की कवीता याद आती है

कानभट्ट , हलाला आणि दशक्रिया

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 11/02/2021 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
कानभट्ट , हलाला आणि दशक्रिया मराठी मध्ये गेली काही वर्षे आशयघन चित्रपट निघतात हे सर्वश्रुतच आहे ... आणि हिंदू धर्मातील वाईट चालीरीती या विषावर मोकळेपणाने लिहिले जाते ( नाटकेही आली त्यात ) / निर्माण केले जाते हे हि सुधृढ समाजाचे आणि पुरोगामी समाजचे लक्षण आहे ( मराठी समाज घाशीराम आणि नथुराम दोन्ही नाटके पैसे देऊन बघतो यात हि परिपकवता दिसून येते ) असाच काहीसा विषय घेऊन एक नवीन मराठी चित्रपट येताना दिसतोय तो म्हणजे "कानभट्ट " लहान मुलाला आवडत नसतांना वेदविद्या शिकवयाला पाठवलं जातं आणि त्याचा ओढा शास्त्राकडे किंवा प्रयोगांकडे कल असलेल्या एका माणसाकडे जातो आणि त्यातून काय घटना घडतात असा

पुनवेचं चांदणं

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 10/02/2021 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुनवेचं चांदणं उतरलं अंगणी अंधार गेला शुभ्र रंगात न्हाऊनी हरवून गेलं झाडांचं हिरवं रूप पाखरांच्या डोळ्यात भरली झोप गगनाच्या भूमीत तारे पेरले रातराणीचे हृदय हळूच फुलले वाऱ्याचे पाऊल देई चाहूल उजळले रानात काजव्याचे फूल नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश धरती सजली काळोखाचे तोडून पाश
काव्यरस

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?

लेखक Shantanu Abhyankar यांनी बुधवार, 10/02/2021 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात? एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच का करतात?’, असा प्रश्न ‘लेकुरे उदंड झाली’, या नाटकात एका जोडप्याला पडलेला असतो. अर्थात यांचे रीतसर लग्न झालेलेच असते. याच चालीवर, ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?’, असा प्रश्न विचारता येईल. आस्तिकांच्या मते देव आहेच, आपले अस्तित्व तो विविध लीलांनी दाखवून देत असतो आणि नास्तिकांच्या मते देवाचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही सबब तो नाहीच. तेंव्हा देव आहे का नाही ह्याची चर्चा फारशी उद्बोधक ठरणार नाही.

आमचा Valentine Week - आँखोंकी गहराइयाँ |

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/02/2021 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' कि लगाए न लगे और बुझाए न बने | . . . म्हणजे नक्की काय हे खरंतर आपल्यातल्या निम्म्या होऊन जास्त लोकांना कळालेलं नसतं. काही लोकं तर हा शेर ऐकून 3 idiots मधल्या प्रोफेसर सारखा "अरे कहना क्या चाहते हो?" असा चेहरा देखील करतात. पण एक तर 'ग़ालिब' आहे आणि इश्क सुद्धा आहे म्हणजेच काहीतरी जोरदार काम असणार इतकं आपल्याला कळतंच की. ऐकायला भारी वाटतंय, "दिल से" मधली काळ्या - पांढर्‍या कपड्यांत नाचणारी मनीषा कोईराला आठवतीये - वाईट काय त्यात? चांगलंच आहे की. आणि कळत अथवा झेपत नसलेल्या गोष्टी आवडू नयेत असं थोडंच आहे? आता नाही आम्हाला चेस मधलं काही कळत.