प्रशस्तपाद भाष्य
नमस्कार दोस्तांनोतुमचा माझ्या ब्लॉग्सना उदंड प्रतिसाद असतो, प्रेम असते (प्रेम वगैरे विषयांवर न लिहिताही! ) याबद्दल आभारी आहे.
आईन्स्टाईन वगैरे संबंधी गोष्टी लिहायला सुरुवात झाल्यानंतर आता सलग पणे १९-२०व्या शतकातल्या फिजिक्सविषयी लिहायला लाईन लागेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. याला कारण झाले प्रशस्तपाद भाष्य या पुरातन भारतीय ग्रंथाचे माझे पुढे थोडे झालेले वाचन आणि माझी एक जुनी इच्छा.
वैशेषिक दर्शन ही भारतीयांची पदार्थविज्ञान किंवा रूढार्थाने फिजिक्स जाणून घेण्याची विचारपद्धती होती असे मी डोंगरे सरांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचले होते. डोंगरे सरांविषयी माझ्या ब्लॉगवर मी लिहिले होते. फिजिक्स आणि संस्कृत या दोन्हींवर पांडित्य असल्याने त्याला महत्व. पण त्यांनी ज्या प्रशस्तपाद भाष्याचे संदर्भ दिले होते तो ग्रंथ अतिदुर्मिळ(आता विकीवर आहे! ) पण सारंच संस्कृत. म्हणजे आउट ऑफ बाउन्ड. पण त्याचेही इंग्लिश मध्ये भाषांतर झाले होते हे नेटवर कळले आणि पुढचा शोध सुरु राहिला.
वैशेषीक परंपरेतील मूळ विचारवंत म्हणजे कणाद ऋषी इसपू ३००-४०० वगैरे . पदार्थ धर्म संग्रह किंवा प्रशस्तपाद भाष्य हा ग्रंथ (अंदाजे) ४थ्या -५व्या शतकात लिहिला गेला. प्रशस्तपाद यांनी तो लिहिला. त्या वैशेषीक परंपरेत त्यावर नंतर अधिक भाष्ये झाली. त्यावर १९१५ साली काशीचे पंडित महामोपाध्याय गंगनाथ झा यांनी त्याचे भाषांतर केले (त्यासोबतच न्याय कंदली आणि किरणावली यांच्या टीकेचेही भाषांतर त्यांच्या पुस्तकात आहे ). हे इंग्रजी भाषांतर बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या लायब्ररी मध्ये होते आणि संस्थान खालसा झाल्यावर तो ग्रंथसंग्रह बडोद्याच्या हंसा मेहता लायब्ररी मध्ये ट्रान्सफर झाला. त्यांच्या 'रेअर बुक कलेक्शन' मधला तो ग्रंथ कोण्या पुस्तक प्रेमी माणसाने स्कॅन करून नेटवर अर्काइव्ह वर अपलोड केला आणि आमच्या`हाती लागला.(अजूनही आहे अर्काइव्ह वर. ज्यांना स्कॅन केलेल्या कॉपीची PDF कॉपी पाहायची असेल त्यांनी पुढील लिंक वर जावे आणि हवे असल्यास डाउनलोड करावी. हेवी फाइल आहे!!https://archive.org/details/prashastapadabhashya) असो. या अर्काइव्ह च्या कृपेनेच मला घरबसल्या ही कॉपी मिळाली!!!
पण एवढा अट्टाहास का? मी तुम्हाला का सांगतोय? तर संस्कृत पंडित/डेक्कन कॉलेज वगैरेंना त्यातल्या संस्कृत किंवा इंडॉलॉजी मध्ये रस. इंडॉलोजि मध्ये काहीच माहिती नसल्याने त्यात फिजिक्स कसे बसते वगैरे पूर्णच अज्ञान आहे माझे. फिजिक्स एक्स्पर्ट कडे जावं तर त्यांनी ही 'बॉर्डर लाईन केस आहे. डोन्ट वेस्ट युअर टाइम ' असं सांगावं. मग हे पुस्तक वाचणार कोण आणि त्यात लॉजिक/फिजिक्स आहे हे बघणार कोण? ज्या दयानंद सरस्वतींनी त्यांच्या काळात या ग्रंथाची स्तुती केली होती त्यांच्या एका आर्य समाजी अनुयायाला विचारलं तर 'हे पुस्तक वाचून काय करणार आहात? काय उपयोग करणार आहात? ' असाच प्रश्न विचारला गेला. अर्थात ही मंडळी चांगल्या मनाचीच असून त्यांना हातातल्या कामांतून फुरसत नसल्याने किंवा या विषयात रस नसल्याने तसे म्हट्ली असतील. नो हार्ड फिलिंग्स!!!
म्हणून मग शेवटी पुस्तकाचे भाषांतर मूळ संस्कृत श्लोक (विकिस्रोत) - पंडित गंगानाथ झा यांचे श्लोकानुसार इंग्रजी भाषांतर(वर दिलेल्या फाइलमधून घेऊन) आणि मला जसे कळले तेवढे मराठी अशी भाषान्तरे मी ब्लॉग वर टाकली. अजूनही नंतरच्या काही धड्यांची भाषांतरे टाकायची आहेत. तेव्हा म्हणले हे तुमच्या समोर आणावे आणि मांडावे. माझ्या ब्लॉग च्या लिंक खाली देत आहे.
हेतू हाच की संस्कृत पंडित आणि फिजिक्स एक्स्पर्ट यापैकी आपण कोणी असाल तर आपण पहा. फिजिक्स एक्स्पर्ट असाल तर विशेषत्वाने पाहावा आणि या ग्रंथांतल्या विचारांचा आधुनिक फिजिक्स मध्ये किती रेलेव्हन्स आहे हे पाहावे. माझ्या मते प्री-न्यूटन फिजिक्स मध्ये तो आहे आणि न्यूटन ज्या पदार्थावर 'एक्स्टर्नल फोर्स ' लावतो तो पदार्थ समजून घेण्यात या विचार पद्धतीचा उपयोग करण्यासारखा आहे. आपण शिक्षक असाल तर मुलांना फिजिक्स मध्ये न्यूटन शिकवण्याआधी यातील 'रेलेवंट' आणि जोडलेल्या अपडेटेड गोष्टी शिकवल्या तर न्यूटन कळायला मदत होईल. पुढचं फिजिक्स समजेल. विजुअलाइज होइल. आपण इंडॉलोजिस्ट वगैरे असाल तर याचे समीक्षण त्या पद्धतीने करू शकता. बडोद्यात असाल तर या हंसा मेहता लायब्ररीत ही प्रत आहे की नाही, कशी दिसते..गायकवाड महाराजांच्या पुस्तकांच्या खजान्यात अजून अशी किती आणि कोणती दुर्मिळ रत्ने आहेत हे पाहू शकता.
आपण यापैकी काहीच नसाल(म्हणजे माझ्यासारखे!) तर आपण एक पुरातन भारतीय पुस्तक आणि त्यातील फिजिक्स संबंधी विचार तुम्हाला कसे वाटतात आणि ते फिजिक्स संबंधी कितपत वाटतात, कितपत लॉजिकल वाटतात असा स्वतः:पुरता आनंद घेऊ शकता. त्यावर कॉमेंट्री - टीका किंवा स्तुती - करू शकता. यातून होईल इतकेच की अनेक नष्ट झालेल्या पुस्तकांमधील एका पुस्तकाचे विचार तरी आपल्यापर्यंत पोहोचतील. (टीका करण्या आधी किंवा स्तुती करण्याआधी पुस्तक वाचले तर बरे!) तुम्हाला काही त्यात करावे वाटल्यास अडचण यायला नको म्हणून सारे संदर्भ दिले आहेत.
अर्थात मी म्हणतो म्हणून ऐकण्या पेक्षा आपण थेट भाषांतर पाहून ठरवावे. तर ही पाहा भाषांतरे खालील लिंक्स वर.
(भाषांतर जोडणीचे काम पूर्ण)
प्रशस्तपाद भाष्य - पुस्तकाविषयी
प्रकरण १ - ग्रंथारंभ आणि उद्देश
प्रकरण २ - पदार्थाची ६ अंगे
प्रकरण ३ - पदार्थाच्या ६ अंगांमधील सारखेपणा आणि वेगळेपणा
प्रकरण ४ - द्रव्यपदार्थ निरूपण आरंभ
प्रकरण ४.१ पृथ्वी किंवा स्थायूंविषयी
प्रकरण ४.२ आप किंवा जला विषयी
प्रकरण ४.३ तेज किंवा उष्णते विषयी
प्रकरण ४.४ वायू विषयी
प्रकरण ४.५ महाभूते - निर्मिती आणि विनाशाची प्रक्रिया
प्रकरण ४.६ आकाश तत्वाविषयी
प्रकरण ४.६ काल तत्वाविषयी
प्रकरण ४.८ दिक तत्वाविषयी
प्रकरण ४.९ आत्मा तत्वाविषयी
प्रकरण ४.१० मन तत्वाविषयी
प्रकरण ५. १ गुणपदार्थ निरूपण - द्रव्यांच्या गुणांविषयी परिचय
(भाषांतर जोडणीचे काम अपूर्ण)
प्रकरण ५. २ द्रव्यांच्या गुणांविषयी सविस्तर
प्रकरण ६ : कर्म पदार्थ अर्थात पदार्थांच्या हालचालींविषयी
प्रकरण ७ : सामान्य पदार्थ अर्थात पदार्थांचे वर्गीकरण
प्रकरण ८ : विशेष पदार्थ अर्थात पदार्थांचे विशेष गुण
प्रकरण ९ : समवाय पदार्थ अर्थात पदार्था-पदार्थातले संबंध
कळावे लोभ असावा.
अनिकेत
याद्या
19625
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
तुमचा छंद आवडला.
वैशेषिका ≠ अध्यात्म
In reply to तुमचा छंद आवडला. by कंजूस
आत्मा आणि मन यांनाही द्रव्य म्हटले आहे..वैशेषिकात..
In reply to तुमचा छंद आवडला. by कंजूस
केपलर चे विचार
In reply to आत्मा आणि मन यांनाही द्रव्य म्हटले आहे..वैशेषिकात.. by अनिकेत कवठेकर
वैशेषीक परंपरेतील
खरंय
In reply to वैशेषीक परंपरेतील by निनाद
माहिती बद्दल धन्यवाद
धन्यवाद
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
मनापासून भौतिकशास्त्र विषयी तुम्हाला आवड आहे
तुमची ज्ञानलालसा चांगली आहे...
In reply to मनापासून भौतिकशास्त्र विषयी तुम्हाला आवड आहे by Rajesh188
घाई नाही..
In reply to तुमची ज्ञानलालसा चांगली आहे... by मुक्त विहारि
भौतिकशास्र हे जगण्यासाठी महत्त्वाचे आहे..
In reply to मनापासून भौतिकशास्त्र विषयी तुम्हाला आवड आहे by Rajesh188
भौतिकशास्र हे जगण्यासाठी महत्त्वाचे आहे..
In reply to मनापासून भौतिकशास्त्र विषयी तुम्हाला आवड आहे by Rajesh188
प्रयत्नांना यश लाभो
आदर्श डोंगरे सरांनी प्रस्थापित केला आहे..
In reply to प्रयत्नांना यश लाभो by गामा पैलवान
उत्तम काम करत आहात. शुभेच्छा
धन्यवाद बाप्पू
In reply to उत्तम काम करत आहात. शुभेच्छा by बाप्पू
+१
In reply to उत्तम काम करत आहात. शुभेच्छा by बाप्पू
++१
In reply to +१ by मूकवाचक
उत्तम कार्य करत आहात सर
धन्यवाद ज्ञानोबाचे पैजारजी
In reply to उत्तम कार्य करत आहात सर by ज्ञानोबाचे पैजार
जबरदस्त माहिती.
धन्यवाद चौथा कोनाडाजी
In reply to जबरदस्त माहिती. by चौथा कोनाडा