नफिसा यादव
नफिसा यादव
राजसच्या शाळेला दिवाळीची सुट्टि.. आणि त्यात शनीवार असल्यामुळे नवरोबाही घरात्..तसा दर शनीवारी मला त्याचा फार हेवा वाटतो पण आज जरा जास्तच वाटत होता. त्यात त्याची शेषशाही मुद्रा.. आणि चिरंजीवांची मस्ती.. त्यांच्या भोवती घुटमळणार्या मला टुकटुक करुन वाकुल्या दाखवत होती. ऑफिसल दांडि मारावी अस मनात शंभरदा येताना आवरा-आवर करणारी मी.. घरात सगळेच सैलावलेले.. माझी ही जरा अळम-टळमच चाललेली.. तस फारस काम नव्हत थांबाव का घरी.. म्हणता म्हणता माझी तयारी झालिही..चला आता थांबून चालणार नाही माझ मलाच सांगत समजावत बेटूचा पापा घेऊन निघाले.. तोवर बहाद्दुर दारात हजर झाला..
मिसळपाव