आमचे अविवाहित स्नेही श्रीयुत. अंत्या अंतरकर
मी माझ्या एका अविवाहीत स्नेह्याना म्हणालो,समजा क्षणभर आपण विवाहित आहात असं समजू.
आपल्याला सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधान पत्नी असती तर तिच्या सहवासात राहून,
आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम, वृत्तिला थोडा आळा बसला असता.
आपण लग्न बंधनात एकदाचे पडल्याने आपल्या आईला पण सुटकेचा निश्वास देता आला असता.
आपल्याला एक दोन मुलगे आणि एक दोन मुली असत्या तर एखाद्दा मुलाने आपल्यात असलेले संगीताचे कौशल्य आत्मसात करून आपला वारसा कायम ठेवला असता.दुसर्याने आपला व्यवसायाचा अभ्यास करून आपल्याला हातभार लावला असता.
मुलीने आपल्या सुंदर गळ्याचा वारसा घेऊन प्रख्यात गायीका झाली
मिसळपाव