Skip to main content

नको लावूस पारिजात दारी

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 22/09/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
नको लावूस पारिजात दारी ==================== नको लावूस पारिजात दारी..! बावळा, फुलतो रोज नव्यानी..!! कळी-कळीत, मोती-पवळी.. वेंधळा, सांडत राहतो अंगणी..! टप-टप बरसती गंधीत सरी.. कोवळा, भिजतो श्रावण राती..! आकाशी विझती चांदणं जोती.. सोवळा, रचतो निर्माल्य राशी..! चौकटीत पाखरे गलबलती.. सावळा, ऐकतो निरव वाणी..!!! ==================== स्वाती फडणीस.......... १६-०९-२००८
Taxonomy upgrade extras

सुविचार- कल्पना शक्तिला वाव

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 22/09/2008 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज शाळेत कार्यक्रमासाठी गेलेलो असताना केबिन बाहेरच्या फळ्यावर सुविचार वाचले. ३७ वर्षापुर्वी माझ्या शाळेत हाच फळा वाचला होता. मागिल वर्षी हाच फळा वेगळ्या शाळेत वाचला होता. मुख्याध्यापकाना सुविचार आवड्ले असे म्हणताच त्यांनी एक निनावी पत्र काढुन दाखवले. ते येणेप्रमाणे. वेळेला महत्व द्या - असतो कोणाला? संकटाला तोंड द्या- मी ** दाखवतो बुडत्याला आधार द्या- पोहोता येत नसेल तर पाण्यात उतरु नये. घाबर्णायाला धीर द्या - सोसेल तेव्ढेच भयपट पहावेत. गुरुजनाना मान द्या- ती कायम त्यांच्याच हातात असते.

महाप्रयोग बिग बॅंग (सौजन्य : साप्ताहिक सकाळ, लेखक : डॉ. पंडित विद्यासागर )

लेखक नाम्या झंगाट यांनी सोमवार, 22/09/2008 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
एक चांगला लेख मिपावर दिल्याबद्दल आभार परंतु हे लेखन मिपाच्या धोरणात बसत नाही म्हणून नाईलाजाने येथून काढावे लागले. कृपया सहकार्य करा. जमल्यास सकाळमधल्या डॉ विद्यासागरांच्या लेखाचा दुवा येथे द्यावा.. आणिबाणीचा शासनकर्ता.

६ ओळीत बाबुजी

लेखक मंदार धारप यांनी सोमवार, 22/09/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मामांनी म्हणजे श्री.अशोक गोडबोले ह्यांनी केलेली कविता. प्रत्येक ओळीचे पहिले अक्शर जोडले की सुधीर फडके हे नाव बनते. सुरात सात गात गात विहरला जगी विहंग धीर रंगवी रणात जीवनसमिधा अभंग रसपावन रामकथागान करी अजरामर फलमंगल यशयुत नवजीवन हो शिवसुंदर डमरू वाजे दिगंत विजयाचे सामगान केवळ मम शब्दचि रे तव मधुरालाप तान मंदार

गणेशोत्सव जपानमधला भाग -२

लेखक गणा मास्तर यांनी सोमवार, 22/09/2008 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागे तोक्योतील गणेशोत्सवाची काही छायाचित्रे इथे डकवली होती, पण क्रमशः लिहायला विसरलो. मिपाच्या समृद्ध क्रमशः परंपरेचा पाईक होण्यासाठी हा पुढचा भाग तोक्यो मराठी मंडळ गेल्या काही वर्षांपासुन तोक्योमध्ये गणेशोत्सव साजरा करते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतातुन एखाद्या कलाकाराला आमंत्रित करुन कलास्वाद घेण्याची अपूर्व संधी दर वर्षी उपलब्ध करुन देते. या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त सध्याचे लोकप्रिय कवी संदीप खरे यांच्या कवितांचा ' सरीवर सर' हा कार्यक्रम अनंत चतुर्दशीच्या दिवशी आयोजित करण्यात आला होता.

क्षितीज (कविता)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 22/09/2008 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
दूर क्षितीजावर सूर्य ढगात लपला केशराची रांगोळी नभी फ़ेकून चालला उंच उडते पाखरू पाही रंगांची लीला सय ये पिल्लाची प्राण पंखात आला आकाशी केशर मंद किरमिजी झाले उडणारे पाखरु पंख मारून थकले दाटला अंधार दोन ठिपक्यांचे डोळे पाही मनात पिल्लू दूर घरी थांबले घरट्यात भुकेले मूक घाबरून शुष्क चोंच आं वासून वासून मी आणिला न दाणा शोधून पिल्लू बघे बाहेर आससून चित्र मनोहारी ह्या क्षीतिजी राही दाद जग देई पाखरू त्राही त्राही बेरंगी रंगातून कसे भूक साही दूर क्षीतिजी पिलू वाट पाही भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद नको ते क्षीतिज नको ते मंदरंग भुकी जीवाला एक घासही उदंड

मैत्रीचं नातं

लेखक सन्दिपरे यांनी सोमवार, 22/09/2008 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई वडिल, भाऊ-बहिण यांशिवाय एक नातं असतं मित्रत्वाचं जीवाभावाच्या मैत्रीचं. झाडाला स्थिरावण्यासाठी गरज असते मुळांची समाजात जगण्यासाठी गरज असते खर्‍या मित्राची. मुळाच्या आधारावरच वृक्ष विस्तारतो विश्वासाच्या आधारावरच मैत्री विस्तारते. असंच नातं प्रत्येकानं जपावं मायभूमीचं नवं रूप साकारावं. विश्वासाचं ते नातं गळ्यातलं ताईत बनतं मात्र केवळ विश्वासघातामुळे फाशीचा ते दोर बनतं. आता
Taxonomy upgrade extras