गणेशोत्सव जपानमधला भाग -२
मागे तोक्योतील गणेशोत्सवाची काही छायाचित्रे इथे डकवली होती, पण क्रमशः लिहायला विसरलो.
मिपाच्या समृद्ध क्रमशः परंपरेचा पाईक होण्यासाठी हा पुढचा भाग
तोक्यो मराठी मंडळ गेल्या काही वर्षांपासुन तोक्योमध्ये गणेशोत्सव साजरा करते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतातुन एखाद्या कलाकाराला आमंत्रित करुन कलास्वाद घेण्याची अपूर्व संधी दर वर्षी उपलब्ध करुन देते. या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त सध्याचे लोकप्रिय कवी संदीप खरे यांच्या कवितांचा ' सरीवर सर' हा कार्यक्रम अनंत चतुर्दशीच्या दिवशी आयोजित करण्यात आला होता. खरे तर संदीप सलील कुलकर्णीसोबत 'आयुष्यावर बोलु काही' या नावाने कार्यक्रम करतो. हा कार्यक्रम आधी ३ वेळा पाहुन झालेला, त्यामुळे सलील नसताना, वाद्यवॄंदाची सोय नसताना संदीप कसा कार्यक्रम करतो याची थोडीशी भिती आणि थोडीशी उत्सुकुता लागुन राहिली होती. आणि संदीपने बिलकुल निराशा केली नाही.
वाद्यवॄंदाची साथ नसतानाही त्याच्या ठेवणीतली गाणी त्याने अत्यंत सहजतेने आणि सुंदरतेने सादर केली. सरीवर सर, अग्गोबाई ढग्गोबाई, तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाउसही, लवलेटर अशा एकाहुन एक रचना त्याने सादर केल्या. वाद्यवॄंदाची साथ नसल्याने काही गाणी सादर नाही करता आली, पण ती कसर त्याने अनेक न ऐकलेल्या कविता ऐकवुन भरुन काढली. कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. अगदी बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यागॄहामध्ये बसल्याचा भास करुन देणारी ही अवस्मरणीय मैफील झाली.
कार्यक्रमापूर्वी श्रींची आरती आणि अथर्वशिर्षपठण झाले. आरतीनांतर प्रसाद आणि अल्पोपहार आणि गाण्याच्या मैफिलीनंतर स्नेहभोजन झाले त्यामुळे गाण्याबरोबरच खाण्याचाही आस्वाद घेता आला.
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे
श्रींची मुर्ती
लहान मुलांच्या या कार्यक्रमामुळे एक मराठेमोळे वातावरण तयार झाले होते
आम्ही आमच्या लाडक्या कवीसोबत

वाचने
9142
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
छान,फारच छान!अप्रतिम !
व्वा खुपच छान...
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
वा मास्तर! फोटूत आपण छान दिसताय बरं का! :)
असो,
सुंदर लेख, सुरेख फोटू...! :)
जियो....!
तात्या.
In reply to वा मास्तर! by विसोबा खेचर
>>वा मास्तर! फोटूत आपण छान दिसताय बरं का!
तुम्ही नीट ओळखलेत ना मला , तो काळा शर्ट घातलेला स्मार्ट मुलगा मी नाही बरं तो संदीप खरे आहे
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
In reply to धन्यवाद by गणा मास्तर
तो काळा शर्ट घातलेला स्मार्ट मुलगा मी नाही बरं तो संदीप खरे आहे
हो, ते माहित्ये. पण आपण संदिपपेक्षा छान दिसताय! :)
असो,
तात्या.
आवो तुमचा तं नशिब उगाडला बगा... आगदी तुमच्या द्यावासोबत फ़ोटू...
आनी फोटू येकदम भारी हाय !!!
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
In reply to गना मास्तर... by फटू
>>आवो तुमचा तं नशिब उगाडला बगा... आगदी तुमच्या द्यावासोबत फ़ोटू...
त काय, वर आम्ही आमच्याकडच्या 'मौनाची भाषांतरे' या त्याच्या पुस्तकावर त्याची सही आणि दोन ओळीपण लिहुन घेतल्या.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
In reply to खर हाय by गणा मास्तर
>> त काय, वर आम्ही आमच्याकडच्या 'मौनाची भाषांतरे' या त्याच्या पुस्तकावर त्याची सही आणि दोन ओळीपण लिहुन घेतल्या.
झकास!
एकूण मजा चालली आहे तर जपानात!
छान रे गणा !!
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
मास्तर वळख र्हाउं द्या. स्वप्नात जपानमदी येउ तव्हा वळख दाखवा.
(अप्रवासी)
प्रकाश घाटपांडे
In reply to मास्तर by प्रकाश घाटपांडे
कवाबी या. गाववाल्यांना विसरुन कसं चालल?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
मस्तच की...
लेख पण नि फोटो पण...
In reply to अरे वा! by पद्मश्री चित्रे
धन्यवाद आनंदयात्री, फुलवा
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
सहि हो ..गणा मास्तर!!!
श्री पावलेत हो तुम्हाला...
करा माहोल असाच...!!!
छान फोटो आणि छोटासा वृत्तांत,दोन्ही आवडले.
स्वाती
वृत्तांत, छायाचित्रे - दोन्ही आवडले.
छान फोटो आणि छोटासा वृत्तांत,दोन्ही आवडले.
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
छान वृतांत....तोक्यो मराठी मंडळाचं काम भारी चाललयं....
आणि संदीप बरोबर फोटो छान आलाय...
बाकी फोटो पणा मस्तच...
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
फोटू झकास
आमच्या आवडत्या कविचा फोटू पाहून बरं वाटलं.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
तोक्योच्या मराठी मंडळाचा वृत्तांत,फोट्टो मस्त !!!
छान.