सुविचार- कल्पना शक्तिला वाव
आज शाळेत कार्यक्रमासाठी गेलेलो असताना केबिन बाहेरच्या फळ्यावर सुविचार वाचले. ३७ वर्षापुर्वी माझ्या शाळेत हाच फळा वाचला होता. मागिल वर्षी हाच फळा वेगळ्या शाळेत वाचला होता. मुख्याध्यापकाना सुविचार आवड्ले असे म्हणताच त्यांनी एक निनावी पत्र काढुन दाखवले. ते येणेप्रमाणे.
वेळेला महत्व द्या - असतो कोणाला?
संकटाला तोंड द्या- मी ** दाखवतो
बुडत्याला आधार द्या- पोहोता येत नसेल तर पाण्यात उतरु नये.
घाबर्णायाला धीर द्या - सोसेल तेव्ढेच भयपट पहावेत.
गुरुजनाना मान द्या- ती कायम त्यांच्याच हातात असते. वेगळी द्यायला आणखी एक उगवावी लागेल.
मित्राना स्नेह द्या- त्याना दिला तर मैत्रिणीचे काय?
जीवनाला गती द्या- अधोगती मध्ये सुद्धा गती असते.
देशाला सर्वस्व द्या- ५४० देत आहे ते पुरे नाही का? परत आम्हा भिकारी लोकांकडे मागताय.
इथे देशाची पिढी वाया चालली आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. उलट अशा सुविचारांनी मुलांच्या कल्पनाशक्तिला वाव मिळुन ती प्रगल्भ होतात. त्यातला एखादा समुदेपशक पण होण्याची धनदाट शक्यता असते.
आता शिक्षक मंडळीनी नविन सुविचार काढावेत. तेच तेच परत परत रिसायकल करु नयेत.
वाचने
8244
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
:)
कलाकार
शेजा-यावर
खुन के
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
खरां
उद्याचे
शत्रुवर
In reply to शत्रुवर by विजुभाऊ
झ़कास
केल्याने होत आहे रे
मित्राना
(विषय दिलेला नाही)
हे देवा,