मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

६ ओळीत बाबुजी

मंदार धारप · · काथ्याकूट
माझ्या मामांनी म्हणजे श्री.अशोक गोडबोले ह्यांनी केलेली कविता. प्रत्येक ओळीचे पहिले अक्शर जोडले की सुधीर फडके हे नाव बनते. सुरात सात गात गात विहरला जगी विहंग धीर रंगवी रणात जीवनसमिधा अभंग रसपावन रामकथागान करी अजरामर फलमंगल यशयुत नवजीवन हो शिवसुंदर डमरू वाजे दिगंत विजयाचे सामगान केवळ मम शब्दचि रे तव मधुरालाप तान मंदार

वाचने 3187 वाचनखूण प्रतिक्रिया 9

विसोबा खेचर 22/09/2008 - 09:31
सुंदर काव्य! गोडबोले मास्तर हेदेखील मिपाचे सभासद आहेत! :) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती 22/09/2008 - 09:55
अरे वा छान आहे कविता! (अवांतरः अशोक काकांकडून याबद्दल कधी ऐकलं नव्हतं!)

भडकमकर मास्तर 22/09/2008 - 17:34
कविता छान... फक्त धाग्याचे शीर्षक जरा .... :) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

राघव 22/09/2008 - 21:07
वाहवा..सुंदर कविता! गोडबोले काकांस आमच्या शुभेच्छा नक्की कळवा. :) मुमुक्षु

प्राजु 22/09/2008 - 21:09
सुरेख आहेत सगळेच शब्द.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 23/09/2008 - 15:06
फारच सुरेख कविता.. >>>>> मदनबाण "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

केशवराव 23/09/2008 - 15:34
मंदार, आमच्या गोडबोले सरांचे अतिशय सुंदर काव्य तू ईथे दिलेस. खुपच छान!