Skip to main content

ख. फ. बंद होनार ??? काय :O :''( !!!

लेखक छोटु यांनी गुरुवार, 25/09/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
सगळया मिपा करां साठी !!! ख. फ. बंद होनार ??? काय :O :''( !!! असे कसे होउ शकते !!! प्लिज आपल्या प्रतिक्रीया द्या !!!! :*

लघुपाककृती स्पर्धा निकाल

लेखक गणा मास्तर यांनी गुरुवार, 25/09/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लघुपाककृती स्पर्धेचा निकाल रविवार दिनांक २८ सप्टेंबर २००८ रोजी जाहीर करण्यात येईल. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. प्रथम पारितोषिक विजेत्याच्या खरडवहीत 'लघुपाककृती स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेते' असे ठळक अक्षरात लिहिण्यात येईल. आम्ही पुण्यात परतल्यावर त्याला एक मस्त पार्टी देऊ.

सखाराम गटणेंचे हर्दिक अभिनंदन व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 25/09/2008 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, मिपाचे एक सन्माननीय सदस्य सखाराम गटणे यांनी स्वत:चा खरडफळा सुरू केला आहे त्याबद्दल मी समस्त मिपाकरांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा देतो! हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते. आणि म्हणूनच गटण्यांचे मला व्यक्तिश: विशेष कौतुक वाटते. कारण मीही एक बंडखोरच मनुष्य आहे आणि मिपाचा जन्मदेखील बंडाळीतूनच झाला आहे! असो, नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा! :) तात्या.

आठवण

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 25/09/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यापरी तु निघुन गेलीस,नजरे पुढुनी बघता बघता इथे-तिथे मी शोधीत असतो तुझ्याकडे येणार्‍या वाटा... दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन... दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....
Taxonomy upgrade extras

'ढापलेली' गाणी

लेखक राहूल यांनी गुरुवार, 25/09/2008 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी. इच्छा असूनही कामाच्या गडबडीत गेल्या काही दिवसात 'मिसळपाव'ची चव घेता आली नाही. म्हटलं जरा वेळ मिळाला की मिसळीच्या ३-४ प्लेटी मस्त उडवून येऊ. आत्ताशी कुठं जरा सवड मिळाली. गिऱ्हाइकांची वर्दळ बघून बरं वाटलं. आता जरा विषयाकडे वळू. सर्वप्रथम सभ्य लोकांसाठी खुलासा: ढापलेली = चोरलेली. तर विषय आहे चोरलेल्या किंवा उचललेल्या गाण्यांचा. जगात अनेक भाषांमधले संगीतकार गाणी चोरतात हे जरी खरे असले तरी तूर्तास हा विषय सगळ्यांच्या लाडक्या अशा 'हिंदी चित्रपटसंगीता'पुरता मर्यादित ठेवला आहे. (अस्मादिकांचे ज्ञान एवढ्यापुरतेच आहे).

"सतीश आळेकर" : डीव्हीडी उद्घाटन

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 25/09/2008 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांच्या नाट्यप्रवासाचा आढावा घेणारी " नाटककार सतीश आळेकर" या नावाची डिवीडी लवकरच प्रकाशित होत आहे. एका प्रतिभावान नाटककाराच्या प्रवासाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातल्या आणि मराठी भाषेच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या बदलत्या सामाजिक आलेखाचे दर्शन या फिल्ममधे घडावे ; या बदलांचा परिणाम लेखकाच्या जडणघडणीवर कसकसा झाला हे आपल्याला यातून पहायला मिळणार आहे. आळेकरांच्या नाटकातील आशय , भाषा आणि वेगवेगळ्या प्रयोगक्षम घटकांचा आढावा घेतानाच , एकूण मराठी नाटकाच्या परंपरांशी त्यांचे काय नाते आहे तेही या फिल्ममधे पहायला मिळेल.

खैरलांजी आणि न्याय

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 25/09/2008 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
म टा च्या बातमीतून >>> देशाला हादरवणार्‍या खैरलांजी हत्याकांडप्रकरणी अखेर न्याय झाला असून प्रियंका, सुधीर आणि रोशन भोतमांगे यांना ठार केल्याप्रकरणी सकरू बिंजेवर, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, रामू धांडे, जगदीश मंडलेकर आणि प्रभाकर मंडलेकर या सहा दोषींना न्या. दास यांनी फाशीची शिक्षा फर्मावली. >>> ही घटना म्हणजे आपल्या समाजाला भेडसावणारी जातीपातीची भुते अजूनही कार्यरत असल्याची निशाणी होती. या दृष्टीने , या प्रकरणात शिक्षा होणे याला प्रतीकात्मक महत्त्व होते.

चंचुपात्र आणि सुरई

लेखक धनंजय यांनी बुधवार, 24/09/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एका गझलेच्या संदर्भात चतुरंग म्हणाले :
परीक्षानळी आणि चंचुपात्रातून गजलेचा प्रवास लवकरच नक्षीदार सुरईकडे होईल ही खात्री आहे!
पुढे -
परीक्षानळीतून, छानशा किटलीत गजल प्रवेशकर्ती झाली आहे! (मला गालिच्याच्या कडेला नाजुक सुरई अंधुकशी दिसते आहे!)
त्यावरून मला ही दोन लिपी-चित्रे सुचली : १. सुरई suraaii शब्द : हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पी ली है डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की है आणि हे : २.

आत्मक्लेश४

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी बुधवार, 24/09/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
निवार्‍यासाठी पावसानं माझंच घर शोधलं, मग स्वागतासाठी त्याच्या मी अंथरलं पातेलं. डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. ढगाच्या सावलीला डोंगर समजला डाग, पेटून उठला वणवा जेव्हां ढग म्हणाला फुलतेय बाग.