(अनुवादीत. कवी--मिश्रा)
अंजली अंजली पुष्पांजली
फुले देवून देतो ही पुष्पांजली
पायी तुझ्या ही स्वरांजली
गीतात गातो ही गीतांजली
प्रिय वाटे ही कवितांजली
प्रीतीने भरलेले तुझे भोळे मन
तुला पाहूनी सजणी धडके हे मन
जेव्हां मनी माझ्या वाजे प्रीतीची बांसुरी
तेव्हां स्वप्नी माझ्या खुलते एक चांदणी
जीवनाची बहार मिळे मला
प्रीतिचे शिखर मिळे मला
अंजली अंजली तूच माझी रागिणी
संगीतलहरीने डोले माझे मन
प्रीतिरागिणीने डोले माझे तन
भासे मला कशी जादू जाहली
दिसे मला गोड स्वप्ने मनी छपली
गोड गोड धुने सरगमची
धुंद धुंद लहरी सुरांची
प्रीतिच्या पुजनी सुरांच्या जीवनी
फुलानी भरलेली ही पुष्पांजली
लहरीची तुला नृत्यांजली
गीताने भरलेली ही गीतांजली
कवीना माझी ही कवितांजली
पाहिले तुला तेव्हां झालो तुझा
प्रीति कशी होईल तुजविणा
कविता कशी होईल तुजविणा
चंद्रमाच्या चांदणीसम तू सजणी
फुलांच्या फुलदाणीसम तू सजणी
अंजली अंजली तूच माझी रागिणी
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2781
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली आहे
आभार
In reply to चांगली आहे by विसोबा खेचर
अंजली अंजली पुष्पांजली हे 'वर्जिनल' गाणे, त्याचे हे भाषांतर?
वर्जिनल...
In reply to अंजली अंजली पुष्पांजली हे 'वर्जिनल' गाणे, त्याचे हे भाषांतर? by बेसनलाडू
होय बरोबर
In reply to वर्जिनल... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
मीनाक्षी शेषाद्री...
In reply to होय बरोबर by बेसनलाडू
अगदी बरोबर
In reply to अंजली अंजली पुष्पांजली हे 'वर्जिनल' गाणे, त्याचे हे भाषांतर? by बेसनलाडू
सामंतकाका,
नावात काय आहे?
In reply to सामंतकाका, by विसोबा खेचर
आणि मला
In reply to नावात काय आहे? by श्रीकृष्ण सामंत