Skip to main content

समुद्रपक्षी (प्रकाशचित्रे)

लेखक लिखाळ यांनी शनिवार, 27/09/2008 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! मध्यंतरी जर्मनीच्या उत्तर किनार्‍यावर फिरायला गेलो होतो. त्या बाजूला लहान लहान अशी काही बेटे आहेत आणि त्या बेटांवरील खारी हवा श्वसनाच्या आजारांवर लाभदायी असल्याने बरेच लोक मुक्कामासाठी येत असतात. तेथे फिरताना सर्वप्रथम आपले स्वागत करतो तिथला दीपस्तंभ.
मला तिथे समुद्रपक्ष्यांची काही चित्रे काढता आली. या पक्षाचे सामान्य इंग्रजी नाव आहे हेरिंग गल.

सोलापुरची आणखी एक खासीयत

लेखक पांथस्थ यांनी शनिवार, 27/09/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाजलेले मटण सोलापुरला भाजलेले मटण म्हणुन एक खाद्य प्रकार मिळतो. खाटिका कडुन मटण विकत घ्यायचे. त्याला सांगायचे की भाजुन घेण्यासाठी हवे आहे. म्हणजे तो मटणाचे थोडया वेगळ्या प्रकारे तुकडे करतो आणि चिरा मारुन देतो. बोनलेस पाहिजे असल्यास तसे सांगावे. हे मटण घेउन भाजणार्‍याकडे जायचे. ते लोक मटणाला त्यांचा पारंपारिक घरगुती मसाला लावुन काहि वेळ मुरत ठेवतात (मटणाला चिरा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जाण्यास मदत होते - अर्थात खाल्ल्यावर आग किती लागली पाहिजे हे सांगितल्यावर त्यानुसार मसाला लावला जातो).

छोटीची आई

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 27/09/2008 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
छोटीची आई ========================= समस्या खूप आहेत.. अगदी सकाळी उठल्यावर; दात घासण्यापासून.. रात्री झोपताना; शू करून आणण्यापर्यंत. हात थकतात ! पाय लटपटतात! डोळ्यापुढे अंधार.. तरी होती उभारी!!! तिच निरागस असणं.. तिच निष्पाप हसणं.. बघितलं की; सार भरून पावायचं! आजही ती तशीच असते.. आ़जही ती तशीच हसते.. बघितलं की;रडूच फुटत! म्हातार्‍या डोळ्यांना.. तापदायक असती.. कंटाळता आलं असत! सोडव विनवता आलं असत! पण नाही... हात जोडले तरी .. ओठ हालत नाहीत..! डोळे मिटायला आलेत.. आणि झोपच येत नाही..!! माझी लाडी अजून छोटीच आहे. देवा तिला गोठवलंस..
Taxonomy upgrade extras

कुंपणावरच्या मित्रांसाठी....

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 26/09/2008 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीच्या घोळक्यात एकट्यासम शाप नाहि मित्रत्वाने पाठीवरती आपुलकीची थाप नाहि. जिंकलीस तू लंका सारी, साता समुद्रा पार रे ओल्याचिंब मिठीसाठी जवळ उरला बाप नाहि. धावताना जगण्यासाठी, गाठले पैलतीर रे विसरलास जगणे मागे, उरली फक्त धाप नाहि? दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही. आठवते शेणमाती, मनात तोच गंध रे मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि. आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि. -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

हे वेड माझे सांग रे! साजणा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 26/09/2008 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--मलिक) झाली जर प्रीति तुजवरती राहूनी बाहुपाशात तुझ्या निद्रेत जाईन मी सत्वरी हे वेड माझे सांग रे! साजणा कमी कसे होईल याउप्परी सांगती ह्या नशाधुंद नजरा अन फूलांचे ते ताटवे क्षण एक ही घालवू कसे तुझ्या विना रे! एकटे सारीच प्रीत उधळून तुजवरी जादू करूनी जाईन तुजवरी विसरूनी ती सर्व संकटे क्षण ते पळ ते जाईन स्वपना सम विसरून परतव माझी सारी स्मृती मलाच तू फिरून जाईन दूर तुझ्या दुनियेतून स्मरूनी तुला मन जाईल क्षीणून हे वेड माझे सांग रे! साजणा कमी कसे होईल याउप्परी श्रीकृष्ण सामंत

संयमाची रेघ..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/09/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही मीलनाची ओढ होती संयमाची रेघही ओठ नाही त्या गुलाबी दोन होत्या पाकळ्या चुंबताना होत काटेरी जरासा स्पर्शही कामिनीचे रूप पाहू दे मला गे सुंदरी रोखले मी श्वास आणी सोसला आवेगही तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चंद्रही पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही - प्राजु
Taxonomy upgrade extras

नागीण आणि काही कविता.

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 26/09/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजच्या दिवसात लिहीलेल्या या कविता आहेत.माझ्या कॉलेज मध्ये दिलीप मालवणकर नावाचा एक चळवळ्या मुलगा होता. त्यानी एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशीत केला होता. त्या संग्रहातल्या या माझ्या कविता आहेत.
Taxonomy upgrade extras

फोन हरवला ...आहे

लेखक नि३ यांनी शुक्रवार, 26/09/2008 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. आज सकाळी ऑफीस ला जात असतांना लोकल ऑटो रिक्शा मधे माझा नोकिया एन गेज क्युडी हा फोन हरवीला आहे.. पोलीस मधे तक्रार नोंदवीली आहे...IMEI NO.. नोट करुन ठेवला होता तो पण दीला पोलीसांना ....विचारल काही चान्सेस आहे का परत मिळ्ण्याचे...म्हणाला सायबर शाखेकडे पाठ्वतो तक्रार बहु... तुम्हाला काय वाट ते फोन पुन्हा मिळेल आता पर्यंत जे एक्त आलो त्यानुसार एकदा हरवीला की गेला.... महाग नव्हता...पण खुप भावना जुड्ल्या आहेत त्यासोबत माझ्या आईने भेट म्हणुन दीलेला माझा पहीला-वहीला मोबाईल फोन होता तो.... मि माझ्याक्डून आणखी काही करु शकतो काय तो फोन ट्रेस करायला???