Skip to main content

आपल्याला वृद्धाश्रम का आवडत नाहीत?

लेखक मृदुला यांनी रविवार, 28/09/2008 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी मुलांनी घ्यायची की नातेवाईक-मित्रमंडळींनी?
या तात्यांच्या एका प्रतिक्रियेतून ही चर्चा सुरू कराविशी वाटली. जीवशास्त्रीय दृष्टीने बघता, आईवडिलांनी, इतकेच नव्हे तर आजी आजोबा, काका, आत्या, मामा, मावश्या अश्या सगळ्या नातेवाईकांनी बाळाचे संगोपन करणे माणसाच्या जातीला नैसर्गिक आहे. आईवडील आणि आजीआजोबा हे यात महत्वाचे.

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 27/09/2008 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता "जर्मनीला" येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला. नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " .... फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता. असो.

कांदा-कोलंबी-कैरीच कालवण

लेखक लवंगी यांनी शनिवार, 27/09/2008 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझ्या आईची पाककृती. पावसाळी दिवसात गरम मऊ भाताबरोबर खाल्ल्यावर हमखास पांघरूण घेऊन ताणून देताय की नाही पहा!! २ मोठे कांदे उभे चिरून घ्यावे. १ मोठी कैरी सोलून उभ्या चिरा करून घ्याव्या. २ वाट्या कोलंबी सोलून घ्यावी. छोटे ३-४ चमचे लसूण-आले -हिरवि मिरचि पेस्ट करून घ्यावी. भांड्यात २ मोठे चमचे तेल गरम करून घ्यावे. तेलात आल-लसूण पेस्ट टाकून कोलंबी टाकावी. कोलंबी लालसर झाली की चिरलेले कांदे टाकून अर्धवट गुलाबी परतून घ्यावे. नंतर त्यात कैरी टाकून थोडे पाणी टाकावे. थोडी लाल मिरची पावडर, मालवणी मसाला असेल तर १ चमचा आणि थोडे मीठ टाकावे. एक चांगली उकळी आणून कैरी शीजली की बंद करावे.

राव गेले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 27/09/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
"रावसर" म्हणून प्रसिद्ध असलेला हा माणूस खरच मनाने आणि ह्र्दयाने पण "राव" होता.

सर्किटची मेख (अर्थात लघुकथास्पर्धा)

लेखक आंबोळी यांनी शनिवार, 27/09/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
हे विडंबन नाही. आम्ही फक्त प्राजुच्या संयमाची रेघ या सुंदर कवितेवरुन प्रेरणा घेतली आहे. आदितीचा 'पाय' होता 'ब्रह्मकुमारी' विप्रंची आंबोळ्याची 'नाडी' होती मनिषची 'लक्ष्मी' कर्णाची 'थंडी' होती होती जरी अजब ती धनंजयाचा 'कंस' तो करी किती 'हाराकिरी'! आत्महत्या करुन गेला ऋषिकेशाचा शेतकरी आयुष्यातून उठून गेला पेठकरांचा टॉमीही मासेमारीचे गूज सांगे टारु हा माउंटब्युकी मारतो माणसे आता चतुरंगाचा बिबटाही! बाजी मारली पार्टनरनी पुरस्कारही घेतला मिपाकरांची परिक्षा घेत आहे सर्किटही! ------------------------------------------- कंदीलसुमार २७-०९-२००८
Taxonomy upgrade extras

साधा माणुस

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 27/09/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
साधा माणुस हे बरं आहे कि लोकं मला साधा म्हणतात साधे असण्याचे बरेच फायदे असतात मी मुद्दामुनच साधा रहातो येडा बनुन बरेच पेढे खातो आहो लोकं माझ्या साध्या बोलण्याला फसतात माझ्या बेशरम कबुलीला ते प्रांजळपणा म्हणतात मी स्वत:वरच टीका करतो लोकं म्हणतात किती प्रामाणिक आहो सांगुन फसवता येतं काय पाहिजे आणिक..? लबाडांचे पाय घेउन मी साधेपणाने वावरतो लबाडांच्या दुनियेत मी असाच रहातो मी असा रहातो म्हणुन पोट भरतो तुम्हिही भरा नाहीतर मरा

डोक्यात जाणार्‍या जाहिराती

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 27/09/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
शितलनी मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती हा धागा सुरु केला. त्याचबरोबर अशाही काही जाहिराती असतात ज्या अगदी डोक्यात जातात. समोरचा प्रेक्षक मुर्ख आहे, त्याला काही समजत नाही हे गृहीत धरून केलेल्या जाहिराती. मी मला आठवणार्‍या अशा जाहिराती सांगतो; तुम्ही पण तुमच्या डोक्यात जाणार्‍या जाहिराती सांगा. १) हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) डोकं फिरवतात. नेमकी ती जाहिरात जेव्हा जेवायला बसलेलो असतो तेव्हाच लागते २) विसा पॉवर: शंकर-एहेसान-लॉयनी केलेली अतिशय टुकार जाहिरात.

(आज मी बसून आहे _)

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 27/09/2008 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना ! केरसुणी मी धरावी, नुसतेच तू बघावे ! मी काम करताना , रोजचेच तू नटावे ! ते काम का करावे, समजूनही कळे ना दमलो अती श्रमाने, की पाय चालवेना ! ना घेतली विश्रांती, कामात व्यस्त आहे घरातला नेहमी चा नोकर दूर राहे? धुणे अटीतटीचे, घासता भांडी संपेना चुकवीन बायकोला, ऐसी युक्ति मिळे ना ! की सूड घेई काळ, भलता च हा तुरुंग देण्यास खोल घाव, छळण्यात गुढरंग ? फसलो असा कसा हा, ते आजला कळेना ? आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना ! --------------------------------------------- मुळ गाणे - अजुन