Skip to main content

(आज मी बसून आहे _)

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 27/09/2008 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना ! केरसुणी मी धरावी, नुसतेच तू बघावे ! मी काम करताना , रोजचेच तू नटावे ! ते काम का करावे, समजूनही कळे ना दमलो अती श्रमाने, की पाय चालवेना ! ना घेतली विश्रांती, कामात व्यस्त आहे घरातला नेहमी चा नोकर दूर राहे? धुणे अटीतटीचे, घासता भांडी संपेना चुकवीन बायकोला, ऐसी युक्ति मिळे ना ! की सूड घेई काळ, भलता च हा तुरुंग देण्यास खोल घाव, छळण्यात गुढरंग ? फसलो असा कसा हा, ते आजला कळेना ? आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना ! --------------------------------------------- मुळ गाणे - अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे मी हास सांगताच, रडताहि तू हसावे ते आज का नसावे, समजावणी पटे ना धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ? चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना ! की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! गीत - आ. रा. देशपांडे ’अनिल’ संगीत - कुमार गंधर्व
लेखनविषय:

वाचने 1400
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

विडंबन ठीक! तात्या.