Skip to main content

उमेद

लेखक फटू यांनी सोमवार, 06/10/2008 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुझ्या जगात उलथापालथ होताना कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही, तुला आधाराची नितांत गरज असताना निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही, कातरवेळी दूर जाणा‍र्‍या वाटेकडे पाहूनही मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही, नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही, जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं, निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं, माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरू
Taxonomy upgrade extras

नाडी ग्रंथ पुरावा आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 06/10/2008 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
नाडी भविष्य आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य 'नाडी भविष्यावर आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.' पुन्हा पुन्हा: नुस्तं "जाऊन पहा" असं म्हणण्यापेक्षा काही पटेलसं लिहिलंत तर "जाऊन पहा आणि मग बोला" असं म्हणण्याची वेळच येणार नाही. लोकं जातील, बघतील आणि स्वतःच प्रतिसाद देतील की "हो, या गोष्टींवर माझा अमुक-तमुक कारणांमुळे विश्वास बसला." पण मुळात ओळख करुन देणारं लिखाणच एवढं त्रोटक किंवा अविश्वसनीय वाटलं तर त्या लिखाणाचं, कदाचित विषयाचंही वर्णन तसंच होणार, आणि लोकांचं मतही!

मध्यान

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 05/10/2008 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
वय तुझे होता चाळीस पाहून आठवते मज ते मध्यान पाहता मागे वळून डोकावते मन चार दशकातून पहीले दशक गेले अल्लड्तेतून दूसरे गेले अध्यापनातून तिसरे दशक निघून गेले विश्वाच्या रहस्याला उलगडण्यातून चवथ्या दशका मधून जाईल तो समय अनुभवण्यातून नंतर येवोत अनेक दशके एकामागून लिहीली जातील पाने इतिहासाची भुतकाळाला निश्चीत स्मरून श्रीकृष्ण सामंत

भांगेचे प्रयोग आणि परिणाम

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली.... भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते. मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे.... ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते... आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे.

मी काय केले असते ?(फक्त प्रोढाकरीता)

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 05/10/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/3884 http://www.misalpav.com/node/3525 सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट नक्की कळली आहे की माझी लेखनाची शैली क्लिष्ट आणि काही जणांना अगम्य वाटली आहे.मनोरंजक नक्कीच वाटली असावी.माझीसुद्धा करमणूक झाली. असो.

सोबत

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
नाना भटजी हे गावाच्या पंचक्रोशीतले एकमेव भटजी... तसे भिक्षुकी करणारे आणखी एक दोन जण होते.. पण नाना हे जुनेजाणते आणि स्वभावाने अत्यंत गरीब त्यामुळे त्यांना मागणी फार.. वर्षभर काहीनाकाही धार्मिक कृत्ये चालू असल्यामुळे नानांना अजिबात वेळ नसे. त्यातून गणेशोत्सवात तर बघायलाच नको. सकाळी जे पहाटे ४वाजता बाहेर पडत ते संध्याकाळी दमूनभागून घरी परतत.

मिपा कट्टा, पुणे.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 05/10/2008 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
होणार होणार म्हणता म्हणता काल दिनांक ४ ऑक्टोबर २००८ रोजी 'शांग्रीला हॉटेल', पुणे इथे मिपा कट्टा संपन्न झाला. विशेष म्हणजे ह्या कट्ट्याला वरूण राजांनीही आपली उपस्थिती देऊन आम्हा सर्वांना उपकृत केले. अर्थात, रहदारीचा गोंधळ आणि त्यातल्या त्यात पुण्याचा कट्टा म्हंटल्यावर सदस्य वेळेवर पोहोचू शकले नाहीत आणि बापुडवाण्या चेहर्‍याने बसलेल्या आयोजक, श्री. सखाराम्_गटणे ह्यांना सर्व मंडळी जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न पडला. पण लवकरच त्यांच्या जोडीला मी, अभिज्ञ, मनोबा वगैरेंनी येऊन मिपाच्या सुधारलेल्या दर्जाबद्दल एक उद्बोधक चर्चा आणि विचारांचे आदान प्रदान सुरू केले. प्रत्यक्ष उत्सवमुर्ती श्री.

Indian Idol

लेखक मीनल यांनी रविवार, 05/10/2008 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
कालच परवाच टि.व्ही वर Indian Idol हा कार्यक्रम पाहिला.त्यावर लिहावस वाटलं. म्हणजे मी कार्यक्रमावर लिहिणार नाही.तर त्यातील माणसांबद्दल लिहिणार आहे. सध्या या कार्यक्रमात ऑडिशन चालू असलेली दाखवली आहे.म्हणजे सुरवातीची निवड फेरी. भारतातल्या विविध रंग ढंग असलेल्या देशात विविध ठिकाणी ही Indian Idol ची बस जाऊन निवड फेरी घेताना दखवली आहे. यातील काही निरीक्षण --- खूप मोठाल्या रांगा दिसल्या. तिथे किती वेळ जात असेल याचा सहज अंदाज बांधता येतो.मागे एकदा रात्री २ वाजता गवतावर गोलाकार बसून डब्बा उघडून खाताना काही तरूणांना पाहिले.शर्थ वाटली चिकाटीची. `बस!