मिपा कट्टा, पुणे.
लेखनप्रकार
होणार होणार म्हणता म्हणता काल दिनांक ४ ऑक्टोबर २००८ रोजी 'शांग्रीला हॉटेल', पुणे इथे मिपा कट्टा संपन्न झाला. विशेष म्हणजे ह्या कट्ट्याला वरूण राजांनीही आपली उपस्थिती देऊन आम्हा सर्वांना उपकृत केले. अर्थात, रहदारीचा गोंधळ आणि त्यातल्या त्यात पुण्याचा कट्टा म्हंटल्यावर सदस्य वेळेवर पोहोचू शकले नाहीत आणि बापुडवाण्या चेहर्याने बसलेल्या आयोजक, श्री. सखाराम्_गटणे ह्यांना सर्व मंडळी जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न पडला. पण लवकरच त्यांच्या जोडीला मी, अभिज्ञ, मनोबा वगैरेंनी येऊन मिपाच्या सुधारलेल्या दर्जाबद्दल एक उद्बोधक चर्चा आणि विचारांचे आदान प्रदान सुरू केले.
प्रत्यक्ष उत्सवमुर्ती श्री. तात्यासाहेब अभ्यंकरांचे आगमन झाले आणि इतर सदस्यही भराभर जमू लागले.
सर्वश्री प्रकाश घाटपांडे, विजुभाऊ, वरद, धमाल-मुलगा, इनोबा, नीलकांत, आनंदयात्री, विकास, पुण्याचे पेशवे आदी सदस्यांनी हजेरी लावून मैफिलीत रंग आणि उत्साह भरण्यास सुरूवात झाली. सुरुवतीच्या झालेल्या किंचित उशीराच्या कंटाळवाण्या भावना विस्मूतीत जाऊन जो तो हिरीरीने चर्चेत भाग घेऊ लागला. सुरूवातीलाच पोलीस 'खाते' ह्या विषयावर श्री. प्रकाश घाटपांडे ह्यांनी 'अधिकार वाणीने' काही किस्से, विनोद सादर करून रंग भरायला सुरुवात केली. विजूभाऊंनीही काही विनोद त्यांच्या पोतडीतून काढल्यावर तात्यांना राहवेना. त्यांनी फक्त प्रौढांना श्रवणीय असे विनोद तर सांगीतलेच पण त्याच बरोबर अंगावर काटा आणणारा, प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रसंगही सांगितला. बाकी आम्ही बहुतेक सारे श्रोते होतो तसेच मधे मधे एखाद दुसरे वाक्य टाकून, फूंकणी मारून, चूलीतील निखारे धगधगते ठेवण्याचे काम करीत होतो. तात्यासाहेब, विजूभाऊ आणि श्री. प्रकाश घाटपांडे ह्यांच्या आयुष्यात आत्ताच, ह्या वयातच 'माझे आत्मवृत्त - भाग पहिला' प्रकाशित करण्या इतपत 'मसाला' तयार आहे. श्री. विकासरावांना घाई असल्यामुळे त्यांनी आणि घरी काही कार्यक्रम असल्या कारणाने श्री. पुण्याचे पेशवे ह्यांनी हजर सदस्याकडे दिलगीरी व्यक्त करत रजा घेतली. आणि मैफील पुढे सुरू झाली.
हॉटेल सेवकानी तरतर्हेची पेये आणि खाद्यपदार्थ आकर्षक ठंगात सादर केली आणि मंडळी विशेष रंगात येऊ लागली. माननिय आचार्य अत्र्यांचे विनोद आणि हजरजबाबी वृत्ती ह्यावरही मजेशीर चर्चा होऊन सदस्यांनी हास्यरसाचा पुरेपुर आस्वाद घेतला. विजुभाऊंनी बांसरी वादनाचा छोटेखानी कार्यक्रम सादर केला आणि कट्टा हळूहळू आपल्या मुळ उद्देशाकडे सरकू लागला. विषय शास्त्रीय संगीताकडे वळला. आपल्या 'कोर्टात' आलेल्या चेंडूवर एक आकर्षक फटकार लगावणार्या, त्याहून आकर्षक सानिया मिर्झा प्रमाणे, तात्या सरसावले. एव्हाना तानपुरा सज्ज झालाच होता. तात्या 'यमन' रागाची थोरवी, गोडवा, व्याप्ती आदी समजावून सांगतानाच वेगवेगळ्या गायकांची, एकच राग गातानाची, वेगवेगळी शैली संमजावून सांगत होते. अगदी साध्या आणि सोप्या भाषेतील वर्णन आणि सोबतीला माझ्यासारख्या ह्या विषयातील मठ्ठ माणसालाही 'यमन' रागाचे सौंदर्य सहजी लक्षात यावे म्हणून 'गाना मेरे बसकी बात नही, सुर और तालका मेल नही' ही ओळ वेगवेगळे गायक कसे गातील हे प्रत्यक्ष गाऊन दाखविले. मलाच खूप मजा आली, तेंव्हा तिथे हजर असलेल्या शास्त्रीय संगीतातील दर्दी सदस्यांना जो अवर्णनीय रसस्वाद घेता आला असेल त्याची मी कल्पना करू शकतो. एव्हाना मघाशी गेलेले पुण्याचे पेशवे पुन्हा परत येऊन मैफिलीत सामील झाले.
श्री. प्रकाश घाटपांडे ह्यांनीही एक गाणे सादर केले आणि 'आपल्या कलासक्त स्वभावावर पोलीसी दडपशाहीचा प्रभाव आपण पडू दिला नाही' हे कृतीने शाबित करून दिले. त्यानंतर पुन्हा शास्त्रीय संगीतावर चर्चा झाली. हॉटेलचे सेवक सेवेत तत्पर होतेच. मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. मिपासदस्यांची सेवा करता करता हॉटेल सेवकही मैफिलीचा आनंद लुटत होते. मध्येच एका सेवकाची आणि माझी एका कोपर्यात भेट झाली असता तात्यांक्डे हळूच अंगूलीनिर्देश करून तो मला म्हणाला,'वो साहब का सूर बहोत अच्छा है|' मी त्याला तेवढ्याच हळू सांगितलं , 'वो एक बहोत बडे गायक कलाकार है|' तो भारावला.
मैफील पहाटे पर्यंत चालावी अशी आमची इच्छा होती पण वेळेचे बंधन होतेच. हळू हळू मंडळींना जेवणाकडे वळावे लागले. सुप पासून सुरू करून चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत घेत चर्चा विनोद चालूच होते. शेवटी आईस्क्रिमचा आस्वाद घेऊन तृप्त पण जड अतःकरणाने आम्ही 'शांग्रीला' बाहेर पडलो. बाहेरील वातावरण नुकत्याच जोरदार पडून गेलेल्या पावसाने विशेष थंड झाले होते.
पुढचा कट्टा ठाण्यात भरवू असे तात्यांनी सर्वांना आश्वासन दिले.
सर्वांनी श्री सखाराम_गटण्यांचे, इतका सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल, आभार मानले.
आणि 'पुन्हा भेटूच' ह्या शब्दात एकमेकांची रजा घेतली.
ह्या कट्ट्याचे काही फोटो सादर आहेत.......
उजव्या बाजूला श्री. आनंदयात्री आणि डाव्या बाजूला चौकडीच्या 'पिसांचा' श्री. डोमकावळा.
श्री. विजुभाऊ ह्यांचे सुश्राव्य बांसुरीवादन.
ई हमार बिटुवा 'पुनाका पेसवा' है, और कौनु नाही.
डाव्या बाजूला आयोजक श्री. सखाराम_गटणे उजव्या बाजूला पिवळ्या चहा-सदर्यात मितभाषी श्री. वरद.
'येऽऽ दोऽऽऽसती' श्री. आनंदयात्री आणि श्री. नीलकांत (मिपा तंत्रज्ञ)
गाणे सादर करताना श्री. विजुभाऊ.
आणि....
मिपासदस्यांना 'यमन' राग आणि शास्त्रीय संगीताचे सौंदर्य विशद करतानाच्या श्री तात्यासाहेब अभ्यंकर ह्यांच्या कांही भावमुद्रा...

उजव्या बाजूला श्री. आनंदयात्री आणि डाव्या बाजूला चौकडीच्या 'पिसांचा' श्री. डोमकावळा.
श्री. विजुभाऊ ह्यांचे सुश्राव्य बांसुरीवादन.
ई हमार बिटुवा 'पुनाका पेसवा' है, और कौनु नाही.
डाव्या बाजूला आयोजक श्री. सखाराम_गटणे उजव्या बाजूला पिवळ्या चहा-सदर्यात मितभाषी श्री. वरद.
'येऽऽ दोऽऽऽसती' श्री. आनंदयात्री आणि श्री. नीलकांत (मिपा तंत्रज्ञ)
गाणे सादर करताना श्री. विजुभाऊ.
आणि....
मिपासदस्यांना 'यमन' राग आणि शास्त्रीय संगीताचे सौंदर्य विशद करतानाच्या श्री तात्यासाहेब अभ्यंकर ह्यांच्या कांही भावमुद्रा...

वाचने
14727
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
कट्टा हुकला
आनंद झाला.
काका, मस्त
In reply to काका, मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
सांगतो....
In reply to सांगतो.... by प्रभाकर पेठकर
झकासराव
In reply to झकासराव by डोमकावळा
धन्यवाद....
In reply to धन्यवाद.... by प्रभाकर पेठकर
अहो राहु
In reply to अहो राहु by झकासराव
आणि हो
In reply to अहो राहु by झकासराव
खरेच की....
In reply to काका, मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्याबद्दल
रेकॉर्डिं
In reply to रेकॉर्डिं by यशोधरा
केलं आहे...
In reply to केलं आहे... by प्रभाकर पेठकर
अच्छा
In reply to अच्छा by चित्रा
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
रेकॉर्डिंग
मठ्ठ माणुस
In reply to मठ्ठ माणुस by प्रकाश घाटपांडे
तरी
In reply to मठ्ठ माणुस by प्रकाश घाटपांडे
पण घाटपांडे साहेबही काही कमी नाहीत.
वा!
In reply to वा! by ऋषिकेश
नाही...
In reply to वा! by ऋषिकेश
सहमत्स्
अरे वा !
अरे व्वा..!!
अरे वा,
सही
कट्टा जोरदार झाला असावा.
फोटो आहेत.
जियो
फोटोची॑ लि॑क जोडणे
In reply to फोटोची॑ लि॑क जोडणे by घासू
घासू, हे
कट्टा
पेठकरशेठ, क
हा पुणे
गोडी अपूर्णतेची
मस्त !!!
तात्या जरा बारीक झालेला दिसतोय?
पेठकर साहेब, तुम्ही दिसत नाही!
In reply to पेठकर साहेब, तुम्ही दिसत नाही! by सर्वसाक्षी
हेच म्हणतो
कट्ट्याचे
सही..
जोरात
व्वा.......
माझा कट्टा
फोटो,
लै बेष्ट...
दिवाळी दसरा
In reply to दिवाळी दसरा by आनंदयात्री
ठीऽऽऽक आहे..
In reply to ठीऽऽऽक आहे.. by प्रभाकर पेठकर
गैरसमज..
In reply to गैरसमज.. by आनंदयात्री
डरपोक
In reply to डरपोक by ३_१४ विक्षिप्त अदिती
हि हा हा
In reply to डरपोक by ३_१४ विक्षिप्त अदिती
अभिनंदन आणि निषेध...
In reply to अभिनंदन आणि निषेध... by बिपिन कार्यकर्ते
पेठकर
In reply to गैरसमज.. by आनंदयात्री
(विषय
In reply to (विषय by विजुभाऊ
_/\_
In reply to _/\_ by आनंदयात्री
सगळे येतात
In reply to दिवाळी दसरा by आनंदयात्री
तात्याबां
सही!
कट्टा धमाल झालेला दिसतो आहे...
धमाल..
In reply to धमाल.. by स्वाती दिनेश
आमच्या
एकदम रापचीक कट्टा झालेला दिसतोय ....
In reply to एकदम रापचीक कट्टा झालेला दिसतोय .... by छोटा डॉन
अवांतर :
In reply to अवांतर : by धमाल मुलगा
नक्की काय प्रकार होता...
In reply to नक्की काय प्रकार होता... by बिपिन कार्यकर्ते
नक्की काय
In reply to अवांतर : by धमाल मुलगा
तसे नाही...
अजुन यौवनात मी....