आपण देव दर्शनाला का जातो?
आपण देवाला का जातो?
खरेच हा प्रश्न माझ्या मनात फार पूर्वीपासून आहे. लोक देवाला का जातात?
देवाला म्हणजे देव दर्शनाला, मंदिरात, वगैरे वगैरे - कुठेही, सर्वत्र. चोर लोक चोरी करायला, आंधळे, भिकारी, बैरागी भीक मागायला, विक्रेते विक्रीला, पुजारी पूजेला, कामगार कामाला इ. लोक सोडले, तर बाकी शेकडा ९० लोक देवाला दर्शनाला, नवसाला, दानधर्माला, कर्मकांडाला, जपतपादि साठी, मन्त्रपाठाला, अभिषेकाला वगैरे ढोबळपणे जातात. अनेक जण लग्नमुंज, इतर मंगल कार्याच्या निमित्ताने देव दर्शन, यात्रादि करतात. विविध धार्मिक स्थळाना, काशी आदि यात्राना वार्षिक, नैमित्तिक सहली करणारे कित्येक असतात.
मिसळपाव