आजच्या ग्लोबल युगात केव्हा, कुठे काय होईल, हे सांगने कठीन ! आपल्या ऑफिसात कुठल्या तरूण- तरूणीचे ईलू- ईलू सुरू असेल तर त्यात ते काय चुकीचे करीत आहेत. 'प्रेम' हे जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. ते फूल कॉलेजात तर कधी जॉब करत असलेल्या ऑफिसातही उमलते. कारण प्रेमाला कुणाचेही बंधन नसते.
ग्लोबलायझेशनमुळे शासकिय असो अथवा खाजगी कार्यालयात पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसतात. शिक्षण व आधुनिकतेने युगाचा पार चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आपल्या आजी-आजोबांच्या जमान्यात स्त्रीचं जीवन म्हणजे 'चूल आणि मूल' ऐवढेच होते. घराच्या चौकटीतून पाऊल बाहेर काढायचे नाही तर मुलींना गावात ज्या इयत्तेपर्यंत शाळा आहे त्या इयत्तेपर्यंत शिकविले जात होते. मात्र आजच्या आधुनिक स्त्रीने बुरसटलेल्या चालीरिती व परंपरेने मढवलेली घराची चौकट कधीच ओलांडून पुरूषवादी संस्कृतीला 'ओव्हर टेक' करत पुरषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्याच्यापुढे एक पाऊल टाकत जॉब करत आहे. आज प्रत्येक कार्यालयात तरूण-तरूणी सोबत काम करताना दिसतात. त्यामुळे ऑफिसातील वातावरणात कमालीचा बदल होत असतो.
आजच्या तरूणी घरातील वातावरणात जास्त वेळ घालवण्यापेक्षा घराबाहेरच जास्त वेळ राहणे पसंत करतात. फॅशनेबल राहणीमान, हातात मोबाईल ही आधुनिक तरूणीची ओळख झाली आहे. आज जवळ-जवळ सर्वच आधुनिक ऑफिसांमध्ये 'बॉसगिरी' नसल्याने तरूण- तरूणी बिंधास्त ईलू- ईलू सुरू असते. स्मार्ट वर्क व फॅशनेबल राहणीमाणाने तरूणी तर बॉसवर एक प्रकारची मोहिनी टाकतात. अगदी खिळीमिळीच्या वातावरणात कार्यालयीन काम सुरू असते. प्रेमासाठी तर हेच वातावरण पोषक असते. ऑफिसात युवा पीढी मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. समवयस्क सहकार्यामध्ये आकर्षण निर्माण होते व प्रेमाचे फूल ऑफिसाच्या चौकटीतच उमलायला सुरवात होते.
अशाच 'तो' आणि 'ती' यांचं ऑफिसातलं ईलू-ईलू....
'तो' आणि 'ती' एकाच शहरातील, मात्र यांनी कधी एकमेकांना पाहिलेले नव्हतं. एकदा ते दोघं मारूती शोरूममध्ये इंटरव्हूसाठी आले होते. जागा तशी एकच भरायची होती. मात्र दोघांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यांना थोडे थांबायला सांगण्यात आले होते. आणि आश्चर्य दोघांचे सिलेक्शन झाले. अन् झालं तेथेच ते एकमेंकांच्या प्रेमात पडले.
त्या दिवशी ते ऑफिसातून सोबतच बाहेर पडले.... अन् मग झालं गुटूर गू... सुरू! सोबत येणे, ऑफिस टायमिंग मधले फूरसतीचे क्षण वेचून इंटरकॉमवरून एकमेंकांशी गप्पा मारणं, लंचला सोबत तर ऑफिस सुटल्यानंतर एकाच बाईकवर कातरवेळी लॉंग ड्राव्हूवर जाणं, हा प्रोग्राम तर त्यांचा नित्याचाच ठरलेला असायचा! पण काम कुठल्याच प्रकारचा कामचूकार पणा ते करता नव्हते. मात्र, त्याचं प्रेमप्रकारण पार मॅनेजरपर्यंत पोहचलं, व त्यांना नोकरीवरून एके दिवशी त्यांना कमी करण्यात आलं आणि अन् दोन्ही पाखरं भुर्रररर उडून गेली...
खिळी