पहाट
दीप निवले रात्रीचे
पहाटही अशी फुले
केसातील मोगरयाचा
गंध अजून, अजून खुले
शब्द नव्हे ओठांवर
नाजुकसे चांदणे
टिपले जरी, परी ऊमले
ओठांच्या स्पर्शाने
लाजलीस जेव्हा तू
वेड मला लागले
श्वासातील गंधभान
स्पर्शातच जागले
पहाटेला भेटण्यास
रात्र परत आली
उगवली पुन्हा फिरूनी
क्षितीजावर चांदणी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
