परदेशात असताना नेहमीच चकलीची भाजणी मिळणे शक्य नसते, परवाच ही कृती एका मैत्रिणीकडुन मिळाली आणि चकल्या चांगल्या, झटपट व कुरकुरीत झाल्या.
साहित्य -
२ कप तांदळाचे पीठ, १ कप बेसन, १/२ कप बटर, १ छोटा चमचा तिखट, थोडासा ओवा, तिळ, हळद चवीनुसार मीठ
कृती -
दोन्ही पीठे एकत्र मिसळून घ्यावीत.
बटर थोडेसे वितळून घ्यावे व पिठात घालावे, बाकीचेही सर्व साहीत्य या पिठात घालणे.
एका भांड्यात गरम पाणी करुन ते बेताबेताने वरील पिठात घालुन, पिठ चांगले मळुन घेणे.
तेल कढईत चांगले गरम करावे.
सो-याला आतुन तेल लावुन एका प्लास्टीकच्या कागदावर ४-५ चकल्या पाडुन घ्याव्यात व लगेच एकीकडे तळायलाही घ्याव्यात.