मागे काही दिवस मिपा वर राज ठाकरे अन त्यांचे आंदोलन या विषयावर बर्याच गरमागरम चर्चा झाल्या. बरेच वेगवेगळे विचार अन मते समजली. एकंदरीत सर्व बाबतीत दोन गट पडले. एक गट राजचे आंदोलन हे योग्यच आहे असे म्हणत त्याला आपला पाठींबा दिला तर काहींनी हे आंदोलन योग्य आहे परंतु पध्द्त चुकिची असे मत नोंदवीले. काहींनी हे जे होतयं ते पुर्ण चुकीचं आहे, भारतात कुणालाही कुठेही जाण्याचा पुर्ण अधिकार आहे असे वाटते. या सर्व उहापोहात पध्द्त चुकिची असेल तर हे आंदोलन मराठी माणसाने कशा तर्हेने करावे यावर काहीही प्रतिक्रिया आल्या नाही. राजकीय वर्तुळातही रामदास आठवले सारखे नेते 'इट का जवाब पत्थर से दो' म्हणत राडे करायचे (फुकट्चे) सल्ले देउ लागले आहेत. माझ्या मते जर राज ची पध्द्त चुकिची असेल तर खालील काही विधायक (?) मार्गाने हे आंदोलन चालवता येउ शकते. .
१. गांधीगिरी चा प्रभावी मार्ग अनुसरत बिहार मधुन येणार्या प्रत्येक भैय्या ला एक गुलाब द्यावा. कार्यकर्त्यांनी प्रत्येक रल्वे स्थानकांवर बिहार मधुन येणार्या गाडीची वाट पहावी अन उतरणार्या प्रत्येक भैय्याला गुलाब वाटावेत. जमलेस तर त्याचे सामान उचलण्यास मदत करावी. काही दिवसांनी त्यालाच वाइट वाटुन हे भैय्ये महाराष्ट्रात येणार नाहीत.
२. रेल्वे भरती व इतर तत्सम परीक्षा घेण्यासाठी च्या जाहीराती मराठी पेपरातही द्याव्यात व भुमीपुत्रांनाही समान संधी द्यावी अशा आशयाचे एक निवेदन रेल्वे भरती बोर्ड, रेल्वे मंत्रालय व इतर विभागातल्या उच्चपदस्थ लोकांना द्यावे. तसे निवेदन दिल्याची बातमी आज तक वर प्रसारीत करावी. (त्या निवेदनाला ते उच्चपदस्थ प्रथेप्रमाने केराची टोपली दाखवतीलच, परंतु निराश न होता पुन्हा ते निवेदन द्यावे. व तसे दिल्याची नोंद करावी)
३. मंत्रालयासमोर साखळी उपोशन सुरु करावे.
४. भुमीपुत्रांनाही समान संधी मिळण्यासाठी कोर्टात जनहित याचीका दाखल करावी. (मग तारीख पे तारीख. . तारीख पे तारीख .. निराश न होता लढा चालु ठेवावा)
५. (कुठलेही आंदोलन वाइट असते. . भारतात कुनालाही कुठेही जाण्याचा पुर्ण अधिकार आहे म्हनुन) इतर प्रांतात नोकरीसाठी जावे. -- हे आवांतर
मला पामराला अजुन काही उपाय सापडले नाही. तुम्हाला काही सापड्ताय का जरा सांगा.
वाचने
4361
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरणभात
अत्यंत योग्य प्रतिसाद'
असेच म्हणतो . .
In reply to अत्यंत योग्य प्रतिसाद' by अनामिका
बिरबलाची खिचडी
१) भैय्ये
सहमत
In reply to १) भैय्ये by मयुरेशवैद्य
टाळ्या
In reply to सहमत by नेटकिडा
आंदोलनाचे विधायक मार्ग
राजसाहेबा
In reply to आंदोलनाचे विधायक मार्ग by चन्द्रशेखर गोखले
आपल्या
हम्म! ही
काही
साहेबाना 'जाणता राजा'
रामदास आठवले
अजून काहि उपाय
धन्यवाद
उपहास